Tensions raised as China expands military presence along Taiwans Borders
बिजिंग: अमेरिका चीनमधील शत्रूत्व जगासाठी काही नवे नाही. परंतु दोन्ही देशांतील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. दोन्ही देश एकमेकांवर मात करण्याची एकही संधी सोडत नाही. अमेरिका तर नेहमीच चीनचे प्रभुत्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. दरम्यान एकीकडे अमेरिका चीनवर टॅरिफ लावण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे चीनने तैवानसोबत मोठा डाव खेळला आहे. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चीनने तैवानच्या सीमारेषाजवळ मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. तसेच प्रशांत महासागरात सामर्थ वाढवण्यावरही भर दिला आहे. या सर्व घटना सुरु असताना दुसरीकडे चीनने अमेरिकेसोबत टॅरिफ युद्ध खेळत धोरणात्मक दृष्टीकोनातून मोठा डाव खेळला आहे.
न्यूजवीकच्या मीडिया रिपोर्टनुसार, चीनने पापुआ न्यू गिनीपासून ते समाओपर्यंत सैनिकांची मोठी तुकडी तैनात केली आहे. याशिवाय चीनने नागरी विकासाचा हवाला देत सैन्य छावण्या देखील उभारल्या आहे. या सैन्य छावण्या अमेरिकेच्या सीमारेषेपासून अवघ्या 40 किमी अतंरावर निर्माण करण्यात आल्या आहेत. यामुळए अमेरिकेला तैवानमध्ये प्रवेश करता येणे कठीण जाणार आहे.
तसेच तैवानच्या सीमेवर मोठ्या युद्धनौका देखील ड्रॅगनने तैनात केल्या आहेत. या युद्धनौकांच्या मदतीने चीन आपली सेना सहज उतरवू शकत आहे. चीनने समुद्रात एक प्रकारची घेराबंदी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या घेराबंदीमुळे तैवानला कोणतीही गुप्त माहिती मिळणे अशक्य झाले आहेत. तसेच अमेरिका देखील अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करु शकणार नाही असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. जगातील जवळपास 50% पाण्याचा साठा प्रशांत महासागरात आहे. हा महासागर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडाला वेगळा करतो. भारत, जपान, तैवान हे आशिया खंडातील महत्वाचे देश आहेत. या देशांचे अमेरिकेसोबत व्यापर आणि संरक्षण करार गुंतलेले आहे. यामुळे या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका आणि चीनमध्ये सतत संघर्ष सुरु असतो.
दरम्यान अमेरिका चीनवर टॅरिफ लावण्यात व्यस्त आहे. अमेरिकेने चीनवर 145% टॅरिफ लागू केले आहे, तर चीनने देखील अमेरिकन उत्पादनांवर 125% टॅरिफ लागू केले आहे. याच वेळी दुसऱ्या बाजूला चीन तैवानवर दबाव टाकण्यासाठी प्रशांत महासागरात सैन्य तैनात करत आहे. अमेरिका अद्यापही चीनवर टॅरिफ लावण्यात गुंतलेली असताना चीन तैवानवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
ही परिस्थिती पाहता तैवानसाठी हे अत्यंत धोक्याचे आहे. जर अमेरिका वेळेत हस्तक्षेप करू शकली नाही, तर चीनचा प्रभाव प्रशांत महासागरात वाढू शकतो आणि तैवानला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.