Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Great Green Wall 2.0 : चीनचा वाळवंटाला निरोप! आता झाडं नाही, ‘हे’ छोटे जीव वाळवंटात निर्माण करणार नंदनवन, वाचा कसे ते?

Great Green Wall 2.0 : चिनी शास्त्रज्ञ निळ्या-हिरव्या शैवाल (सायनोबॅक्टेरिया) च्या मदतीने वाळवंट हिरवे करत आहेत. हे तंत्र वाळूवर जैविक थर तयार करून ढिगाऱ्यांना स्थिर करते आणि वनस्पतींच्या वाढीस चालना देते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 01, 2026 | 01:47 PM
This is how China is turning deserts into greenery What is the Great Green Wall 2.0 project

This is how China is turning deserts into greenery What is the Great Green Wall 2.0 project

Follow Us
Follow Us:
  •  चिनी शास्त्रज्ञ आता झाडांऐवजी ‘निळ्या-हिरव्या शैवाल’चा (Cyanobacteria) वापर करून वाळवंटी जमिनीवर अवघ्या एका वर्षात सुपीक थर तयार करत आहेत.
  • ‘सायनोबॅक्टेरियल क्रस्ट’ नावाचे हे तंत्र वाळूच्या ढिगाऱ्यांना स्थिर करते आणि जोरदार वारे किंवा वादळातही वाळू उडण्यापासून रोखते.
  •  चीनचा हा यशस्वी पॅटर्न आता आफ्रिका आणि मंगोलियामध्येही राबवला जात असून वाळवंटीकरण रोखण्यासाठी हे जगातील सर्वात मोठे भू-अभियांत्रिकी (Geoengineering) पाऊल मानले जात आहे.

Great Green Wall 2.0 : वाढते वाळवंटीकरण हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला असताना, चीनने यावर एक अत्यंत स्वस्त आणि प्रभावी उपाय शोधून काढला आहे. चीनचा (China) महत्त्वाकांक्षी ‘ग्रेट ग्रीन वॉल’ (Great Green Wall) प्रकल्प आता २.० च्या टप्प्यात पोहोचला असून, यावेळी शास्त्रज्ञांनी निसर्गातील एका सर्वात जुन्या जीवाचा निळ्या-हिरव्या शैवालचा (Cyanobacteria) आधार घेतला आहे. केवळ झाडे लावून वाळवंट रोखण्याच्या पारंपारिक पद्धतीऐवजी, आता थेट वाळूवर ‘जैविक कवच’ चढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

काय आहे ‘ग्रेट ग्रीन वॉल २.०’ आणि सायनोबॅक्टेरिया तंत्र?

गेल्या ४ दशकांपासून चीन उत्तर भागात झाडांची भिंत उभी करत आहे. मात्र, नव्या तंत्रज्ञानात शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत विकसित केलेले सात प्रकारचे विशेष शैवाल वाळवंटात फवारले आहेत. हे शैवाल अत्यंत उष्णता, तीव्र सूर्यप्रकाश आणि दुष्काळातही जिवंत राहू शकतात. जेव्हा पावसाचा थोडासा स्पर्श होतो, तेव्हा हे शैवाल वेगाने वाढतात आणि वाळूच्या कणांना एकमेकांशी जोडून एक घट्ट थर तयार करतात. यालाच शास्त्रज्ञ ‘सायनोबॅक्टेरियल क्रस्ट’ म्हणतात. हा थर वाळूला हवेत उडण्यापासून रोखतो आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : New Year 2026: आकाशात फिनिक्सची झेप! दुबई-अबु धाबीत नववर्षाचे जोरदार स्वागत अन् जागतिक विक्रमांची रास, पाहा VIDEO

५ वर्षांचे काम आता एका वर्षात!

नैसर्गिकरित्या वाळवंटात असा मातीचा थर तयार होण्यासाठी १० ते २० वर्षे लागतात. मात्र, चीनच्या शापोटोउ वाळवंट संशोधन केंद्राने (Shapotou Desert Research Station) विकसित केलेल्या या पद्धतीमुळे आता हे काम अवघ्या एका वर्षात पूर्ण होत आहे. शास्त्रज्ञांनी या शैवालला काही सेंद्रिय पदार्थांसोबत एकत्र करून लहान ‘ब्लॉक्स’ तयार केले आहेत. हे ब्लॉक्स वाळवंटात पसरवल्यानंतर तिथे वनस्पती वाढवण्यासाठी आवश्यक असलेला पाया तयार होतो. यामुळे भविष्यात तिथे गवत आणि लहान झुडपे सहजपणे जगू शकतात.

Africa is building a wall… Made of trees. 8,000 km of green defiance stretching from Senegal to Djibouti: it’s called the Great Green Wall – a plan to stop the Sahara desert, restore dead land, and lift 100 million people. [🎞️ africabusinessheroes]pic.twitter.com/iEx28IOeSs — Massimo (@Rainmaker1973) December 30, 2025

credit : social media and Twitter

वाळवंटात सौर ऊर्जेची साथ

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून चीनने वाळवंटात जगातील सर्वात मोठे फोटोव्होल्टेइक (PV) सोलर पार्क्स उभारले आहेत. हे सोलर पॅनल्स केवळ वीजच तयार करत नाहीत, तर ते जमिनीला सावली देऊन तिथे आर्द्रता टिकवून ठेवतात. या पॅनल्सच्या खालीच आता या शैवाल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे प्रयोगही यशस्वी होत आहेत. यामुळे वाळवंटी प्रदेश आता केवळ ‘हिरवा’ होत नाही, तर तो ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम’ देखील होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : New Year 2026: आकाशात फिनिक्सची झेप! दुबई-अबु धाबीत नववर्षाचे जोरदार स्वागत अन् जागतिक विक्रमांची रास, पाहा VIDEO

आफ्रिका आणि मंगोलियालाही मिळणार फायदा

चीनने या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तर चीनमधील ९४,७०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर वाळू नियंत्रण मिळवले आहे. आता हेच ‘होमग्रोन’ तंत्रज्ञान आफ्रिकेतील ‘ग्रेट ग्रीन वॉल’ प्रकल्प आणि मंगोलियामध्येही निर्यात केले जात आहे. ज्याला जगाने ‘पृथ्वीचा कॅन्सर’ (वाळवंटीकरण) म्हटले होते, त्यावर चीनने हे जैव-तंत्रज्ञानाचे औषध शोधून काढले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनचा 'ग्रेट ग्रीन वॉल' प्रकल्प नक्की काय आहे?

    Ans: हा चीनचा उत्तर भागातील वाळवंटाचा विस्तार रोखण्यासाठी झाडे लावण्याचा आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्याचा ४ दशकांचा महाप्रकल्प आहे.

  • Que: सायनोबॅक्टेरिया (Cyanobacteria) वाळवंटात काय काम करतात?

    Ans: हे सूक्ष्म जीव वाळूच्या कणांना एकत्र बांधून एक 'बायो-क्रस्ट' (जैविक थर) तयार करतात, ज्यामुळे वाळू स्थिर होते आणि झाडांच्या वाढीस मदत होते.

  • Que: हे तंत्रज्ञान पारंपारिक झाडे लावण्यापेक्षा चांगले का आहे?

    Ans: कारण हे तंत्र अत्यंत कमी पाण्यात कार्य करते आणि जिथे झाडे जगू शकत नाहीत, तिथेही जमिनीचा पाया मजबूत करण्यास मदत करते.

Web Title: This is how china is turning deserts into greenery what is the great green wall 20 project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • China
  • China Army
  • international news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
1

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
3

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.