Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mojtaba Khamenei : तो समलैंगिक आहे! ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याचं गुपित केली उघड; CIAच्या हवाल्याने खळबळ

US-Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, सीआयएने हे निश्चित केले आहे की इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे समलैंगिक आहेत. त्यांनी इराणविरुद्ध संपूर्ण लष्करी विजयाची घोषणाही केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 27, 2026 | 03:37 PM
trump claim mojtaba khamenei gay cia report iran military victory 2026

trump claim mojtaba khamenei gay cia report iran military victory 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
  • इराणच्या विनाशाची घोषणा
  • विजयाचा शंखनाद

Trump Mojtaba Khamenei Gay Claim : मध्य-पूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आता केवळ रणांगणच नाही तर वैयक्तिक आरोपांची पातळीही गाठली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबद्दल असा काही दावा केला आहे, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रम्प यांनी केवळ खामेनी यांच्या वैयक्तिक आयुष्यावरच बोट ठेवले नाही, तर इराणचा लष्करी कणा पूर्णपणे मोडल्याची घोषणाही केली आहे.

सीआयएचा तो ‘गुप्त’ अहवाल आणि ट्रम्प यांचा दावा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने (CIA) त्यांना मोजतबा खामेनी यांच्याबद्दल एक अत्यंत संवेदनशील माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या मते, मोजतबा खामेनी हे समलैंगिक आहेत. इराणसारख्या देशात, जिथे समलैंगिकता हा इस्लामिक कायद्यानुसार (शरिया) फाशीच्या शिक्षेचा गुन्हा मानला जातो, तिथे सर्वोच्च नेत्याबद्दल असा दावा करणे हा इराणच्या धार्मिक आणि राजकीय व्यवस्थेवर केलेला सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. ट्रम्प म्हणाले की, या माहितीमुळे इराणमध्ये खामेनी यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संकटात सापडली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Diplomatic War: ‘दलाल’ म्हणून जयशंकर यांनी काढली पाकिस्तानची इज्जत; इस्लामाबादचा झाला तीळपापड, म्हटले-‘कमजोर असल्याबद्दल…’

लष्करी विजयाचा ‘ट्रम्प स्टाईल’ दावा

केवळ वैयक्तिक आरोपच नाही, तर ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या लष्करी मोहिमेच्या यशाचा पाढाही वाचला. त्यांच्या दाव्यानुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या एकत्रित हल्ल्यांमुळे इराणचे नौदल आता इतिहासजमा झाले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने इराणची तब्बल १५४ जहाजे समुद्रात बुडवली आहेत. याशिवाय, इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेचाही मोठा नाश झाला असून, आता केवळ ९% क्षेपणास्त्रे त्यांच्याकडे शिल्लक आहेत. ट्रम्प यांच्या मते, क्षेपणास्त्र प्रक्षेपक (Launchers) नष्ट झाल्यामुळे आता इराणकडे असलेली उरली-सुरली क्षेपणास्त्रे केवळ शोभेची वस्तू उरली आहेत.

🚨 BREAKING: President Trump CONFIRMS he was advised that Ayatollah Mojtaba Khamenei is gay Omg 😭 “They did say that…a LOT of people are saying that, which puts them off to a bad start in that particular country!” 😂 pic.twitter.com/LfrH4THuPF — Eric Daugherty (@EricLDaugh) March 26, 2026

credit – social media and Twitter

ऊर्जा केंद्रांवरील हल्ले आणि १० दिवसांची मुदत

इराणच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी त्यांच्या ऊर्जा केंद्रांवर (Energy Hubs) हल्ले करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. मात्र, आता ही अंतिम मुदत १० दिवसांनी वाढवून ६ एप्रिल २०२६ करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, इराण सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला असून सध्या पडद्यामागे वाटाघाटी अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहेत. या मुदतवाढीमुळे इराणला शरणागती पत्करण्यासाठी एक शेवटची संधी दिली गेल्याचे बोलले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : ‘Thank you people of India’ एक संदेश आणि गेम ओव्हर; इराणनच्या इस्रायलवर हल्ल्याचा ‘हा’ VIDEO तुफान VIRAL

 इराणमध्ये अंतर्गत बंडाळीची शक्यता?

ट्रम्प यांच्या या विधानांचा मुख्य उद्देश इराणच्या जनतेमध्ये आपल्या नेत्याबद्दल अविश्वास निर्माण करणे हा असू शकतो. जर इराणमधील कट्टरपंथीयांमध्ये त्यांच्या सर्वोच्च नेत्याबद्दल अशा अफवा पसरल्या, तर तिथे अंतर्गत यादवी माजण्याची दाट शक्यता आहे. लष्करी विजय मिळवल्यानंतर आता ट्रम्प ‘मानसोपचार युद्ध’ (Psychological Warfare) खेळत असून इराणला आतून पोखरण्याचा प्रयत्न करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी मोजतबा खामेनींबद्दल काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांनी दावा केला की सीआयएच्या माहितीनुसार इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे समलैंगिक आहेत.

  • Que: इराणची लष्करी क्षमता किती शिल्लक आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, इराणचे नौदल आणि हवाई दल पूर्णपणे नष्ट झाले असून केवळ ९% क्षेपणास्त्र क्षमता शिल्लक आहे.

  • Que: ६ एप्रिल २०२६ ही तारीख का महत्त्वाची आहे?

    Ans: ही इराणच्या ऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यांची नवीन डेडलाईन आहे, जी ट्रम्प यांनी वाटाघाटींसाठी वाढवली आहे.

Web Title: Trump claim mojtaba khamenei gay cia report iran military victory 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Mojtaba Khamenei
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
1

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
2

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…
3

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

NATO Summit 2026: ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे जग अणुयुद्धाच्या…’; नाटो प्रमुख मार्क रुटे यांचे इराण धोरणावर मोठे विधान
4

NATO Summit 2026: ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे जग अणुयुद्धाच्या…’; नाटो प्रमुख मार्क रुटे यांचे इराण धोरणावर मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.