Trump has imposed a 30% tax on Mexico and the European Union
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टॅरिफच्या निर्णयाने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युरोपियन यूनियन आणि मेक्सिकोवर ३० टक्के कराची घोषणा केली आहे. १ ऑगस्टपासून हा कर लागू करण्यात येणार आहे.
ट्रम्प यांनी युरोपियन यूनियन आणि मेक्सिको या दोन मोठ्या व्यापारी भागीदारांवर कर लादला आहे. त्यांनी मेक्सिको राष्ट्राध्यक्षांना लिहिले आहे की, मेक्सिकोने अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांच्या आणि फेंटानिल च्या तस्करीचा रोखण्यास मदत केली आहे. परंतु यासाठी पुरेसे प्रयत्न करण्यात आलेले नाही, या कारणामुळे अमेरिका मेक्सिकोवर ३० टक्के कर लागू करत आहे.
मेक्सिकन राष्ट्राध्यक्षांना ट्रम्प यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “हे पत्र तुम्हाला पाठवणे एक मोठा सन्मानाची बाब आहे. हे अमेरिका आणि मेक्सिकोच्या व्यापारी संबंधाची ताकद आणि वचनबद्धता दर्शवते. अमेरिका मेक्सिकोसोबत व्यापर सुरु ठेवण्यास सहमत आहे.परंतु संबंध मजबूत असूनही, अमेरिकेने मेक्सिकोवर कर लागू केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमंली पदार्थांच्या तस्करी रोखण्यात मेक्सिकोला अपयश आहे आहे.
मेक्सिकोची प्रशंसा करुन त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उत्तर अमेरिकेत नार्को तस्करीचे प्रमाण थांबलेले नाबी. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष कार्टेलना यामध्ये अपयशी ठरले आहेत. यामुळे १ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिकेत येणाऱ्या मेक्सिको उत्पादनांवर ३० टक्के कर लागू करत आहोत. याशिवाय अमेरिकेने मेक्सिकोहून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर प्रादेशिक कर देखील लागू करणार असल्याचे म्हटले आहे.
तसेच ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवरही (EU) ३० टक्के कर लागू केला आहे. ट्रम्प यांनी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे . या पत्रात त्यांनी, ” १ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिकेत येणाऱ्या युरोपियन यूनियन उत्पादनांवर ३० टक्के कर लागू होईल. सर्व क्षेत्रीय करांपासून तुम्हाला स्वातंत्र्य करत आहे. पण हा कर टाळण्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवरही जास्त कर आकारला जाईल.”
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हा आकाडा “युरोपियन यूनियन आणि अमेरिकेतील व्यापार तूटातील तफावत दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे.” तसेच ट्रम्प यांनी युरोपियन यूनियन आणि त्यांच्या कंपन्यांना अमेरिकेत उत्पादने विकसित करण्याची ऑफर दिली आहे. असे केल्यास अमेरिका युरोपियन यूनियन कोणतेही शुल्क आकारणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.