Trump Imposed Tariffs On India To end the Russia Ukraine War says White House
US Tarrif On India : वॉशिंग्टन : गेल्या काही काळात भारत आणि अमेरिकेमधील (America) संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या भारतावर लादलेल्या टॅरिफवरुन (Tarrif) संबंधामध्ये कटुता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केले आहे. दरम्यान यावर अमेरिकेच्या व्हाइट हाउसने प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेच्या व्हाइट हाउसच्या सेक्रेटरी कॅरोलनी लीविट यांनी मंगळवारी यावर उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, रशियावर युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढवायचा होता, यामुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादले होते. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War )संपवण्याच्या हेतूनचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादले होते.
भारतावरील टॅरिफ बॉम्ब
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाच्या सुरुवातील टॅरिफ धोरण सुरु केले होते. याअंतर्गत त्यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ लागू केले होते. दरम्यान त्यांनी यामध्ये काही काळासाठी वाटाघाटी करण्यास सवलत दिली होती. यावेळी चर्चा सुरु असताना ट्रम्प यांनी अचानक भारतावर रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या कारणावरुन २५% टॅरिफ लागू केले.
याच्या काही दिवसांनी त्यांनी पुन्हा यामध्ये २५% अतिरिक्त टॅरिफ वाढवत भारतावर ५०% टॅरिफ लागू केले आहे. तसेच रशियाकडून कच्चे तेल खरेदीवर दंडही लावण्यात आला आहे.
दरम्यान व्हाइट हाइसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी हे पाऊल उचल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लागू करत रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांना रशिया आणि युक्रेनमध्ये तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले युद्ध थांबवायचे होते.
लेविट यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांची दोन्ही देशांतील संघर्ष लवकरात लवकर संपवण्याची होती. दरम्यान ट्रम्प यांनी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांची भेट घेतली आहे. तसेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांची व्हाइट हाउसमध्ये भेट घेतील आहे. सध्या दोन्ही देशांनी शांतता बैठकीसाठी सहमती दर्शवली आहे.
यामुळे आता रशिया आणि युक्रेनमध्ये बैठक होईल. यामध्ये युद्ध संपवण्यावर चर्चा केली जाईल. तसेच यानंतर होणाऱ्या बैठकीत ट्रम्पही सामील होतील असे कॅरोलिन यांनी म्हटले. तसेच लेविट यांनी पुन्हा दावा केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले असते तर हे युद्ध सुरु होऊनच नसते दिले.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी