Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran war : 10 मिनिटांत नष्ट करू! निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या मूडमध्ये ट्रम्प, खामेनीने लक्ष्यांची यादी अद्ययावत केली

US Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर लष्करी हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, आम्ही इराणच्या अणु ठिकाणांवर लक्ष ठेवून आहोत आणि गरज पडल्यास 10 मिनिटांत क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 01, 2026 | 11:36 AM
Trump Iran Missile Strike Threat US Iran Midterm Elections 2026

Trump Iran Missile Strike Threat US Iran Midterm Elections 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा इराणला लष्करी इशारा
  • पिकॅक्स माउंटेन अणु प्रकल्प लक्ष्यावर
  • इराणकडून लक्ष्यांची नवी यादी तयार

मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा पराकोटीला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध (US Iran war) पुन्हा एकदा कठोर लष्करी कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अमेरिकेत लवकरच पार पडणाऱ्या महत्त्वाच्या मध्यावधी निवडणुकांच्या (Midterm Elections) पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे विधान समोर आल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. इराणच्या अणु ठिकाणांवर अमेरिका पूर्ण लक्ष ठेवून असून गरज पडल्यास अवघ्या १० मिनिटांत त्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले जाऊ शकते, असा रोखठोक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांचा फ्लोरिडातून इराणला सडेतोड इशारा

शनिवारी फ्लोरिडा येथील आपल्या खाजगी निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्करी सज्जतेची माहिती दिली. ट्रम्प म्हणाले की, “आम्ही यापूर्वीच्या कारवायांमध्ये इराणची अनेक प्रमुख अणु ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. मात्र, अजूनही इराणमधील एक-दोन अशी ठिकाणे आहेत ज्यांच्यावर आमची सतत नजर आहे. जर इराणने अमेरिका किंवा आमच्या मित्रांवर कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही अवघ्या १० मिनिटांच्या आत क्षेपणास्त्रांचा मारा करून ती ठिकाणे पूर्णपणे नष्ट करू शकतो.”

विशेषतः इराणच्या प्रसिद्ध ‘पिकॅक्स माउंटेन’ (Pickaxe Mountain) या भूमिगत अणु ठिकाणाचा उल्लेख करत ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्य या ठिकाणाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. या आठवड्यातच अमेरिका इराणवर नवीन हल्ला करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ट्रम्प यांनी हा प्रश्न फेटाळून लावला. इराणसोबत राजनैतिक चर्चा सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले असले, तरी इराणच्या भूमिकेवर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : अमेरिकेच्या राजकारणात ‘भारतीय तडका; निवडणुक प्रचारात कुणी बनवला डोसा तर कुणी मंदिरात टेकले डोके, VIDEO VIRAL

इराणचे नवे प्रमुख मोजतबा खामेनी आक्रमक पवित्रा 

दुसऱ्या बाजूला, इराणमध्येही सत्तापालट आणि लष्करी घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईत माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर, त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनी यांनी इराणची सूत्रे हाती घेतली आहेत. सूत्रे हाती घेतल्यानंतर मोजतबा खामेनी यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

या बैठकीत मोजतबा खामेनी यांनी अमेरिकन धमक्यांना न घाबरता लष्कराला पूर्ण सज्ज राहण्याचे आदेश दिले. शत्रूकडून होणाऱ्या कोणत्याही चिथावणीला क्षणाचाही विलंब न लावता आणि कोणताही संकोच न बाळगता अत्यंत प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे खामेनी यांनी स्पष्ट केले.

इराणने अद्ययावत केली शत्रूच्या लक्ष्यांची यादी

मोजतबा खामेनी यांनी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स आणि लष्करी कमांडरांना अमेरिका तसेच ‘झायोनिस्ट शत्रू’ (इस्रायल) शी संबंधित सर्व महत्त्वाच्या लष्करी, आर्थिक आणि धोरणात्मक मालमत्तांची नवी यादी (Target List) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या यादीत अमेरिका आणि इस्रायलच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनीही परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, राष्ट्राध्यक्षांनी अद्याप नवीन हल्ल्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. परंतु, अमेरिकन सैन्य आपल्या मोहिमा साध्य करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. तसेच, इराण आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर आणि व्यापारी जहाजांवर उघडपणे हल्ले करत असल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kim Jong Un : किम जोंग-उन यांना रोखण्यासाठी ‘या’ तीन महासत्ता एकत्र; उत्तर कोरियाच्या न्यूक्लीयर ताकदीविरोधात मोठी रणनीती

मध्यपूर्वेत महायुद्धाचे ढग?

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या ऐन तोंडावर ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे ट्रम्प हे लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे इराणनेही थेट अमेरिका आणि इस्रायलच्या ठिकाणांना निशाणा बनवण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मध्य पूर्वेत आणखी मोठा संघर्ष पेटण्याची गंभीर शक्यता वर्तवली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत काय विधान केले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी स्पष्ट केले की अमेरिका इराणच्या अणु ठिकाणांवर सतत लक्ष ठेवून असून, गरज पडल्यास अवघ्या १० मिनिटांत क्षेपणास्त्र हल्ला करून ती ठिकाणे उद्ध्वस्त करू शकते.

  • Que: इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी काय आदेश दिले आहेत?

    Ans: मोजतबा खामेनी यांनी इराणच्या लष्करी कमांडरांना अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची (Target List) नवी यादी अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Que: ट्रम्प यांनी इराणच्या कोणत्या विशिष्ट अणु ठिकाणाचा उल्लेख केला?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या 'पिकॅक्स माउंटेन' (Pickaxe Mountain) या महत्त्वाच्या अणु प्रकल्पाचा उल्लेख करत त्यावर अमेरिकेची करडी नजर असल्याचे सांगितले.

Web Title: Trump warns iran missile strike 10 minutes mojtaba khamenei target list hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Mojtaba Khamenei
  • US Iran war

संबंधित बातम्या

US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड
1

US News : व्हाईट हाऊसमधील विनोदी कलाकाराची उपस्थिती चर्चेत; टीव्हीवरील परखड टीकाकाराची राजकीय कोंडी उघड

Kim Jong Un : किम जोंग-उन यांना रोखण्यासाठी ‘या’ तीन महासत्ता एकत्र; उत्तर कोरियाच्या न्यूक्लीयर ताकदीविरोधात मोठी रणनीती
2

Kim Jong Un : किम जोंग-उन यांना रोखण्यासाठी ‘या’ तीन महासत्ता एकत्र; उत्तर कोरियाच्या न्यूक्लीयर ताकदीविरोधात मोठी रणनीती

US Iran war : इराणला युरेनियमचा साठा हटवावा लागणार? अमेरिका-इराण करारात कतार अन् चीनची मोठी भूमिका
3

US Iran war : इराणला युरेनियमचा साठा हटवावा लागणार? अमेरिका-इराण करारात कतार अन् चीनची मोठी भूमिका

US News : ट्रम्प यांचा डेमोक्रॅट्सना इशारा;मध्यावधी निवडणुका जिंकल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल ?
4

US News : ट्रम्प यांचा डेमोक्रॅट्सना इशारा;मध्यावधी निवडणुका जिंकल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.