Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kim Jong Un : किम जोंग-उन यांना रोखण्यासाठी ‘या’ तीन महासत्ता एकत्र; उत्तर कोरियाच्या न्यूक्लीयर ताकदीविरोधात मोठी रणनीती

Kim Jong Un : डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यातील संभाव्य शिखर परिषदेच्या आणि इतर अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी उत्तर कोरियाच्या संपूर्ण अण्वस्त्रमुक्तीसाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 31, 2026 | 05:00 PM
Kim Jong Un Nuclear Threat Marathi US South Korea Japan Trilateral Meeting

Kim Jong Un Nuclear Threat Marathi US South Korea Japan Trilateral Meeting

Follow Us
Follow Us:
  • त्रिस्तरीय वचनबद्धता
  • आर्क्टिक करार आणि सहकार्य
  • क्षेपणास्त्र चाचण्यांचा तणाव

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong Un) यांच्या सातत्याने वाढणाऱ्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेमुळे पूर्व आशियासह जगभरात चिंतेचे ढग दाटून आले आहेत. संभाव्य ट्रम्प-किम शिखर परिषदेच्या चर्चां दरम्यान, उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे नष्ट करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या अत्यंत संवेदनशील परिस्थितीत अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान या तीन प्रमुख देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकत्र येत उत्तर कोरियाच्या संपूर्ण आणि अपरिवर्तनीय अण्वस्त्रमुक्तीसाठी (Complete Denuclearization) आपली कटिबद्धता जाहीर केली आहे.

अटलांटा येथे पार पडलेल्या जी-२० (G20) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चोई ह्यून यांच्यात एक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय व बहुपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही देशांनी केवळ उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र आव्हानांवरच चर्चा केली नाही, तर पॅसिफिक आर्क्टिक प्रदेशात सागरी सुरक्षा, पुरवठा साखळी (Supply Chain) मजबूत करणे आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली.

 उत्तर कोरियाचे कडक कायदे आणि ट्रम्प यांच्यासोबतच्या संभाव्य चर्चेचा तिढा

उत्तर कोरियाच्या प्योंगयांग सरकारने आपली अण्वस्त्र क्षमता कायदेशीररित्या ‘कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय’ (Irreversible Status) म्हणून घोषित केली आहे. रशिया आणि चीन या बलाढ्य देशांचा छुपा व थेट पाठिंबा असल्याने किम जोंग-उन यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. आगामी आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग-उन यांच्यात बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : पाकिस्तानी महिला न्यायाधीशांची कविता भारतात व्हायरल; ‘तुझ्या आशेपेक्षा जास्त…’ म्हणत तरुण वकिलांचे जिंकले मन

ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा किम जोंग-उन यांच्यासोबत थेट संवादाची तयारी दाखवली होती. ट्रम्प यांच्या मते, उत्तर कोरियाला डी-न्यूक्लियराइज करण्याऐवजी त्याच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला एका ठराविक मर्यादेत ‘स्थिर’ (Freeze) करणे अधिक व्यावहारिक ठरेल. या बदल्यात उत्तर कोरियावरील कडक आर्थिक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा सूर दक्षिण कोरियाच्या राजकीय वर्तुळातूनही समोर आला होता. मात्र, उत्तर कोरियाने चर्चेपूर्वीच कोणतेही निःशस्त्रीकरण स्वीकारण्यास थेट नकार दिला आहे.

 एकाच वेळी १० क्षेपणास्त्रांचा मारा! उत्तर कोरियाकडून शक्तीप्रदर्शन

राजकीय आणि राजनैतिक पातळीवर वाटाघाटींची चर्चा सुरू असतानाच, उत्तर कोरियाने मैदानात पुन्हा एकदा लष्करी ताकद दाखवून दिली आहे. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने वॉनसान भागातून पूर्व समुद्राच्या (Sea of Japan) दिशेने एकाच वेळी १० कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (Short-Range Ballistics) डागली.

या अचानक केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे जपान आणि दक्षिण कोरियात अलर्ट जारी करण्यात आला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) नियमांचे आणि निर्बंधांचे उघडउघड उल्लंघन करत उत्तर कोरिया सातत्याने आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी करत आहे. या बेकायदेशीर क्षेपणास्त्र कार्यक्रमांना निधी पुरवणाऱ्या गुप्त नेटवर्कवर आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्णपणे बंदी घालण्याची जोरदार मागणी तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : ज्यू धर्मगुरूने हिंदू धर्माची उडवली खिल्ली; गोमूत्राबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने पेटला आंतरराष्ट्रीय वाद

प्रादेशिक सुरक्षेसाठी तीन देशांची नवी रणनीती

उत्तर कोरियाचे हे पाऊल केवळ पूर्व आशियापुरते मर्यादित न राहता संपूर्ण पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे. यामुळेच अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने लष्करी सहकार्यासोबतच आर्थिक व तांत्रिक आघाडीवरही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्क्टिक प्रदेशातील सहकार्यामुळे तिन्ही देशांना सागरी मार्गांचे संरक्षण करणे आणि तांत्रिक पुरवठा साखळी सुरक्षित ठेवणे सोपे जाणार आहे. उत्तर कोरियाने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे. आगामी काळात ट्रम्प आणि किम जोंग-उन यांची भेट होते का आणि त्यातून या तणावावर काही तोडगा निघतो का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र मुद्द्यावर कोणत्या तीन देशांनी एकत्र येऊन वचनबद्धता व्यक्त केली आहे?

    Ans: अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान या तीन देशांनी उत्तर कोरियाच्या संपूर्ण अण्वस्त्रमुक्तीसाठी (Denuclearization) आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे.

  • Que: उत्तर कोरियाने अलीकडेच कोणत्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली?

    Ans: दक्षिण कोरियाच्या लष्करानुसार, उत्तर कोरियाने वॉनसान भागातून पूर्व समुद्राच्या दिशेने १० कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.

  • Que: उत्तर कोरियाची अण्वस्त्रांबाबत अधिकृत भूमिका काय आहे?

    Ans: उत्तर कोरियाच्या किम जोंग-उन सरकारने आपली अण्वस्त्र क्षमता कायदेशीररित्या 'कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय' घोषित केली असून, त्यांनी चर्चेपूर्वी अण्वस्त्रमुक्तीचा प्रस्ताव फेटाळला आहे.

Web Title: North korea nuclear threat us south korea japan denuclearization hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Kim Jong Un
  • World news

संबंधित बातम्या

Poland Crisis : पोलंडमध्ये मोठा राजकीय भूकंप! सर्वोच्च न्यायालयातील ‘या’ वादानंतर राष्ट्रपतींनी थांबवला परदेश दौरा, विमान परतले
1

Poland Crisis : पोलंडमध्ये मोठा राजकीय भूकंप! सर्वोच्च न्यायालयातील ‘या’ वादानंतर राष्ट्रपतींनी थांबवला परदेश दौरा, विमान परतले

India At UN: संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचा पुन्हा एकदा घणाघात; UNHRC मध्ये दहशतवादावरून पाकिस्तानसह दुटप्पी भूमिकेवर ओढले ताशेरे
2

India At UN: संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचा पुन्हा एकदा घणाघात; UNHRC मध्ये दहशतवादावरून पाकिस्तानसह दुटप्पी भूमिकेवर ओढले ताशेरे

US Iran war : इराणला युरेनियमचा साठा हटवावा लागणार? अमेरिका-इराण करारात कतार अन् चीनची मोठी भूमिका
3

US Iran war : इराणला युरेनियमचा साठा हटवावा लागणार? अमेरिका-इराण करारात कतार अन् चीनची मोठी भूमिका

VIDEO VIRAL : ज्यू धर्मगुरूने हिंदू धर्माची उडवली खिल्ली; गोमूत्राबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने पेटला आंतरराष्ट्रीय वाद
4

VIDEO VIRAL : ज्यू धर्मगुरूने हिंदू धर्माची उडवली खिल्ली; गोमूत्राबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने पेटला आंतरराष्ट्रीय वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.