Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US News : ट्रम्प यांचा डेमोक्रॅट्सना इशारा;मध्यावधी निवडणुका जिंकल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल ?

US News : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर जोरदार टीका केली आहे. डेमोक्रॅट्सनी काँग्रेसवर नियंत्रण मिळवल्यास देशाची अर्थव्यवस्था संकटात येईल आणि आर्थिक प्रगतीला धक्का बसेल, असा दावा त्यांनी केला. ३ नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरस वाढली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 30, 2026 | 09:13 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • डेमोक्रॅट्सवर ट्रम्प यांची जोरदार टीका
  • काँग्रेसवरील नियंत्रणासाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरस
  • अर्थव्यवस्थेचा मुद्दा केंद्रस्थानी
US News : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुका जवळ येत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजकीय वातावरण तापवले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने काँग्रेसवर नियंत्रण मिळवले, तर अमेरिकेचे मोठे नुकसान होईल आणि देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.तसेच ट्रम्प यांनी जे लोकं डेमोक्रॅट्सना मतदान करतील ते लोकं निश्चितपणे खुळी झालेली आहेत .

असे उद्गार त्यांनी एका सभेच्या वेळी काढले आहे . डेमोक्रॅट्स सत्तेत आल्यास देशातील सध्याची आर्थिक प्रगती धोक्यात येईल, असा दावा करत त्यांनी मतदारांना रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

डेमोक्रॅट्सवर ट्रम्प यांची जोरदार टीका

निवडणूक प्रचारसभांमध्ये ट्रम्प सातत्याने डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधत आहेत. डेमोक्रॅट्सनी काँग्रेसवर नियंत्रण मिळवल्यास देशात अराजकता निर्माण होईल, असे चित्र त्यांनी मतदारांसमोर मांडले आहे. त्यांच्या मते, रिपब्लिकन सरकारने राबवलेल्या आर्थिक धोरणांना डेमोक्रॅट्सकडून विरोध होईल आणि त्यामुळे अमेरिकेच्या विकासाला खीळ बसेल. काही प्रचारसभांमध्ये त्यांनी डेमोक्रॅट्स सत्तेत आल्यास १९२९ सारखी महामंदी येऊ शकते, असाही दावा केला आहे.

China News : चीनच्या रसायनांचा जगभर बोलबाला! घरातील रंगांपासून शॅम्पूपर्यंत प्रत्येक वस्तूत चिनी रसायनांचा शिरकाव

काँग्रेसवरील नियंत्रणासाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरस

अमेरिकेत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यावधी निवडणुका होणार आहेत. प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागा आणि सिनेटच्या ३५ जागांसाठी मतदान होणार आहे. सध्या काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व कायम ठेवण्याचे मोठे आव्हान ट्रम्प यांच्यासमोर आहे. दुसरीकडे, डेमोक्रॅटिक पक्ष महागाई, इंधन दर, आरोग्यसेवा आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरत आहे.

Vatican News : पोप लिओ चौदावेंचा ऐतिहासिक विक्रम :अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मतदान करणारे पहिले पोप ठरले

अर्थव्यवस्थेचा मुद्दा केंद्रस्थानी

या निवडणुकीत अमेरिकेची अर्थव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणांमुळे आणि इराण युद्धाच्या परिणामांमुळे इंधनाच्या किमतींबाबत चिंता वाढली आहे. डेमोक्रॅट्स सत्तेत आल्यास सरकारच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विविध निर्णयांची चौकशी करण्याची भूमिका घेत आहेत.

त्यामुळे आगामी निवडणूक ट्रम्प यांच्या नेतृत्वाचीही परीक्षा मानली जात आहे. रिपब्लिकन पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी ट्रम्प यांनी प्रचाराचा वेग वाढवला असून, अमेरिकेच्या राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Donald trump warning democrats us midterm election economy 2026 cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • Marathi News

संबंधित बातम्या

Iran News : होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांवर नवा हल्ला; लिम्पेट माईन्सचा वापर; छोट्या स्पीडबोट्समुळे समुद्रात दहशत
1

Iran News : होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांवर नवा हल्ला; लिम्पेट माईन्सचा वापर; छोट्या स्पीडबोट्समुळे समुद्रात दहशत

Vatican News :पोप लिओ चौदावेंचा ऐतिहासिक विक्रम :अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मतदान करणारे पहिले पोप ठरले
2

Vatican News :पोप लिओ चौदावेंचा ऐतिहासिक विक्रम :अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मतदान करणारे पहिले पोप ठरले

5 Best TWS Earbuds: वारंवार चार्जिंगचा कंटाळा आलाय? 75 तासांपर्यंत प्लेबॅक देणारे 5 ईअरबड्स पाहाच
3

5 Best TWS Earbuds: वारंवार चार्जिंगचा कंटाळा आलाय? 75 तासांपर्यंत प्लेबॅक देणारे 5 ईअरबड्स पाहाच

PM Modi News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदींचा निर्धार! विज्ञान-तंत्रज्ञानासह शेतीच्या सर्वांगीण विकासावर भर
4

PM Modi News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदींचा निर्धार! विज्ञान-तंत्रज्ञानासह शेतीच्या सर्वांगीण विकासावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.