
Trump warns of severe sanctions for any country doing business with Russia
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : रशियन तेल खरेदीवरुन पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) बरसले आहे. पुन्हा एकदा त्यांनी जगभरातील रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांनी उघड धमकी दिली आहे. रशियाशी व्यापार करणाऱ्यांवर अनेक कठोर निर्बंध लादले जातील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांचे हे बदलते सूर पाहून आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ उडाला आहे.
Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर कोणत्या देशाने रशियासोबत व्यापार केला तर त्या देशाला कठोर निर्बंधांना सामोरे जावे लादगेल. त्यांनी म्हटले की, त्यांचे सरकार आणि रिपब्लिकन कार्यदेकर्त्ये सध्या मॉस्कोच्या व्यापारावर लक्ष्य ठेवून आहे. यानंतर पुढे योग्य ती वाटचाल केली जाईल. रशिया आणि अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर दबाव आणण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
तसेच त्यांनी इराणचा उल्लेख करत त्यांच्यावरही निर्बंध लादले जातील असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी पुन्हा सांगितले की, रशियासोबत व्यापार करणाऱ्या कोणत्या देशावर दया दाखवली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले जातील आणि यामध्ये इराणचाही समावेश असू शकतो.
भारतावर रशियाशी व्यापारामुळे ५०% कर
ट्रम्प यांनी आधीच भारतावर रशियासोबत व्यापार न थांबवल्याने ५०% कर (Tarrif) लागला आहे. यातील २५% कर आणि २५% रशियन केल खरेदीवर अतिरिक्त दंड आहे. तसेच रशियावरही निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुरु आहे.
अमेरिकन काँग्रेस सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी एक विधेयत सादर केले आहे, ज्यामझ्ये रशियन तेल खरेदी-विक्रीवर ५००% करचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला हाऊस ऑफ फॉरेन रिलेशन्स कमिटीने पाठिंबा दिला आहे.
काय आहे याचा उद्देश?
ट्रम्प यांच्या या निर्णायाचा उद्देश रशिया आणि पुतिन यांच्या युक्रेनमधील क्रूर युद्ध रणनितीला मिळणारा निधी थांबवणे आहे. यामुळे इतर देशांवर कर आणि निर्बंध लादल्यास रशियाला युद्धासाठी आर्थिक निधी मिळणार नाही, आणि पुतिन युद्ध थांबवण्यास मजबूर होतील असा ट्रम्प यांचा विश्वास आहे.
याच कारणामुळे ट्रम्प यांनी भारतावर कर लागू केला आहे. ट्रम्प यांच्या मते, भारत रशियाला युक्रेन युद्धात अप्रत्यक्षपणे मदत करत आहे. यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. गेल्या चार वर्षाहून अधिक काळ हे युद्ध सुरु आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ला करत आहे. यामुळे युक्रेनच्या अनेक पायाभूत, उर्जा सुविधा नष्ट झाल्या आहेत. परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी व्यापार केल्यास जगभरातील देशांवर कठोर निर्बंध लादण्याची धमकी दिली आहे.
Ans: ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खेरदीमुळे ५०% कर लादला आहे, ज्यामध्ये २५% अतिरिक्त दंड लागू करण्यात आला आहे.
Ans: ट्रम्प यांच्या या निर्णायाचा उद्देश रशिया आणि पुतिन यांच्या युक्रेनमधील क्रूर युद्ध रणनितीला मिळणारा निधी थांबवणे आहे.