Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेन दोन भागात विभागले जाणार! काय आहे ट्रम्पच्या दूताचा ‘प्रस्ताव’ आणि पुतिनची ‘खळबळजनक’ प्रतिक्रिया?

Russia-Ukraine War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत जनरल कीथ केलॉग यांनी म्हटले आहे की जर रशियासोबत शांतता करार झाला तर युक्रेनचे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जर्मनीप्रमाणे विभाजन होऊ शकते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 13, 2025 | 10:45 AM
Trump's envoy suggests Ukraine could be divided like post-WWII Germany in a peace deal with Russia

Trump's envoy suggests Ukraine could be divided like post-WWII Germany in a peace deal with Russia

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन/कीव : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त प्रस्ताव समोर आला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार जनरल कीथ केलॉग यांनी युक्रेनच्या संभाव्य विभाजनाची संकल्पना मांडली आहे. या योजनेनुसार, दुसऱ्या महायुद्धानंतर विभाजित झालेल्या बर्लिनप्रमाणेच युक्रेनचेही दोन भाग केले जाऊ शकतात, अशी सूचना त्यांनी केली आहे.

जनरल केलॉग यांच्या प्रस्तावानुसार, रशियाच्या ताब्यात असलेला पूर्व युक्रेनचा सुमारे २० टक्के भाग कायमस्वरूपी पुतिनच्या नियंत्रणाखाली राहू शकतो, तर उर्वरित पश्चिम युक्रेन ब्रिटन आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील युरोपीय सैन्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात येऊ शकतो. यामध्ये अमेरिका कोणतेही थेट सैन्य पाठवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

डिमिलिटराइज्ड झोनची संकल्पना

या प्रस्तावात रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये १८ मैल रुंद ‘डिमिलिटराइज्ड झोन’ (DMZ) तयार करण्याची कल्पना मांडण्यात आली आहे. या झोनमध्ये कोणतेही लष्करी अस्तित्व राहणार नाही. युक्रेनियन सैन्य या झोनच्या पलीकडे तैनात केले जाईल, जेणेकरून कोणताही थेट संघर्ष होणार नाही. ही संकल्पना कोरियन युद्धानंतर तयार झालेल्या कोरियन DMZप्रमाणेच आहे. केलॉग यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेन हा खूप मोठा देश आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी एका ठिकाणीच सैन्य तैनात करणे शक्य नाही. त्यामुळे विभाजनासारखी व्यवस्था युद्ध संपवण्यासाठी अधिक परिणामकारक ठरू शकते, असा त्यांचा दावा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तहव्वूर राणाच्या तीन ‘निर्दोष’ मागण्या की दहशतवादी कटाचा नवा धागा? NIA ची तपासणी सुरुच…

पाश्चात्य हस्तक्षेपाची मर्यादा आणि युरोपची चिंता

केलॉग यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आपल्या सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश करणार नाही, मात्र ब्रिटन आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील सैन्य नीपर नदीच्या पश्चिमेला तैनात राहील. नीपर नदी ही एक नैसर्गिक सीमारेषा बनवू शकते, जी रशिया आणि युक्रेन यांच्यातील सीमावाद मिटवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तथापि, युरोपीय देशांमध्ये या प्रस्तावावर चिंता व्यक्त केली जात आहे. पश्चिम युक्रेनवर परकीय सैन्याची तैनाती आणि पूर्व युक्रेनचा रशियाच्या ताब्यात जाणे – ही स्थिती अनेकांच्या दृष्टीने युक्रेनच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारी ठरू शकते.

रशियाची भूमिका काय असेल?

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी काही आठवड्यांपूर्वीच स्पष्टपणे सांगितले होते की, रशिया कोणत्याही परिस्थितीत नाटो सैन्याच्या हस्तक्षेपाला मान्यता देणार नाही. त्यामुळे, पश्चिम युक्रेनमध्ये फ्रान्स-ब्रिटनचे सैन्य पाठवण्याच्या कल्पनेला रशियाकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.  केलॉग यांच्या या प्रस्तावात कोणतीही अधिक जमीन रशियाला देण्याचा उल्लेख नाही, मात्र अनेक विश्लेषकांचे मत आहे की युक्रेनचा कायमस्वरूपी भूभाग गमावणे हे त्याच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जाईल.

खरेच हे ‘विभाजन’ आहे का?

सुरुवातीला केलॉग यांच्या वक्तव्यामुळे असा संदेश गेला की युक्रेनचे अधिकृत विभाजन होणार आहे, मात्र नंतर त्यांनी X (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले मत स्पष्ट करताना म्हटले की, त्यांचा उद्देश युक्रेनचे विभाजन नव्हता, तर ही एक तत्पुरती व्यवस्था असू शकते, जी शांततेकडे नेऊ शकेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळमधील बीरगंजमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक, तणावग्रस्त परिस्थिती; संपूर्ण शहरात कर्फ्यू लागू

युद्धबंदी की सत्ता-हस्तांतर?

केलॉग यांचा प्रस्ताव युद्धबंदी आणि शांततेसाठीचा एक पर्याय म्हणून समोर येत असला तरी, तो राजकीयदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा आणि भविष्यातील सीमारेषा व संप्रभुता याबाबत वाद निर्माण करणारा ठरू शकतो. पश्चिम जगत आणि युरोपमध्ये या प्रस्तावाचे पडसाद उमटत असताना, सर्वांचे लक्ष आता रशियाच्या पुतिन यांच्या प्रतिक्रियेवर केंद्रित झाले आहे. युक्रेनचे भवितव्य आता एका नव्या वळणावर उभे आहे – विभाजनाच्या छायेतून मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात!

vb

Web Title: Trumps envoy suggests ukraine could be divided like post wwii germany in a peace deal with russia nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • ukraine

संबंधित बातम्या

BRICS Gold Reserves: डॉलरच्या वर्चस्वाची उलटी गिनती सुरू? ब्रिक्सचा सोन्याकडे निर्णायक कल
1

BRICS Gold Reserves: डॉलरच्या वर्चस्वाची उलटी गिनती सुरू? ब्रिक्सचा सोन्याकडे निर्णायक कल

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
2

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?
3

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?

Vladimir Putin : स्टॉर्म शॅडोचा थरार! युक्रेनच्या एका क्षेपणास्त्राने रशियाच्या इंधन साठ्याची केली राखरांगोळी, पाहा VIDEO
4

Vladimir Putin : स्टॉर्म शॅडोचा थरार! युक्रेनच्या एका क्षेपणास्त्राने रशियाच्या इंधन साठ्याची केली राखरांगोळी, पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.