Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्पला खूश करण्यासाठी थेट परिवाराशी हातमिळवणी; भेटवस्तूंची किंमत ऐकून फिरतील डोळे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चा विषय बनत आहे. सत्तेत आल्यापासून त्यांनी जागतिक स्तरावर अनेक निर्णयांनी खळबळ उडवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 27, 2025 | 01:12 PM
Trump's family receives 13 crore golf resort from vietnam

Trump's family receives 13 crore golf resort from vietnam

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चा विषय बनत आहे. सत्तेत आल्यापासून त्यांनी घेतलेल्या निर्णयांपासून ते इतर देशांकडून मिळणाऱ्या कोट्यांवधींच्या भेटीनुळे ट्रम्प सतत चर्चेत येत आहे. दरम्यान अनेक देश ट्रम्प यांनी भेटवस्तू देऊन अमेरिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

या देशांनाकडून ट्रम्प कुटुंबीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

व्हिएतनाम, इंडोनेशिया यांसारखे आशियाई देशांनी ट्रम्प कुटुंबाला अब्जावधी डॉलर्सचे प्रकल्प दिले आहेत. यामुळे ट्रम्प यांच्या कुटुंबीयांच्या व्यवसायिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. अनेक देशांनी यामध्ये कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करुन ट्रम्प कुटुंबींयांना व्यवसायात अनेक सवलती दिल्या आहे. अमेरिकेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्न आशियाई देश अनेक धक्कादयक निर्णय घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिएतनामच्या विन्ह फुक प्रांतातील १३ हजार कोटीरुपयांच्या गोल्फ रिसॉर्ट ट्रम्प यांना देण्यात आला आहे. याला ट्रम्प इंटरनेशनल गोल्फ रिसॉर्ट प्रकल्प नाव देण्यात आले आहे. व्हिएतनाम सरकारने याला राष्ट्रीय प्राधान्यता दिली आहे. यामध्ये भूसंपादन आणि आर्थिक तपासणींच्या प्रक्रियांना कायदेशीर बाबींचे पालन न करता मान्यता देण्यात आली आहे.

हा प्रकल्प ट्रम्प कुटुंबीयांशी संबंधित आहे. तसेच इंडोनेशियातील बाली आणि पश्चिम जावामध्ये देखील ट्रम्प यांच्या कुटुंबाला हॉटेल्स आणि गोल्फ कोर्ससारखे प्रकल्पांची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये कायदेशीर प्रक्रियांना दुर्लक्ष करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानच्या पंतप्रधानांची इराणला भेट ; ‘या’ मुद्द्यावर सर्वोच्च नेत्यांशी जवळीक साधण्याचा शाहबाज यांचा प्रयत्न

तुर्की आणि अझरबैजानचा ट्रम्प कुटुंबाला आकर्षित करण्याचा प्रयत्न

व्हिएतनाम आणि इंडोनेशियाव्यतिरिक्त तुर्की आणि अझरबैजानने ट्रम्प कुटुंबालवा आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. इस्तंबूलमध्ये तुर्कीने ट्रम्प टॉवर्स आणि कार्यालये सुरु करण्याचा प्रकल्प ट्रम्प कुटुंबाला देऊ केला आहे. यामध्ये डोगन होल्डिंगसोबत भागीदारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अझबैजानने ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल हा प्रकल्प उद्योगपती मम्माडोव्ह यांच्या सहकार्यने तयार केला आहे. फिलिपिन्सने देखील ट्रम्प कुटुंबाला एक मोठी ऑफर देण्याचा विचार केला आहे. यासाठी पडद्यामागून लॉबिंग सुरु आहे.

पाकिस्तानचाही ट्रम्प यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने ट्रम्प यांच्या एआय प्रकल्पातील भागीदारीसाठी दोन हजार मेगावॅट वीज वाटपाला मंजुरी दिली आहे. या विजेचा वापर करुन बिटकॉइन मायनिंग केले जाणार आहे. अलीकडेच पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या हेतूने क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय, कतार सरकारकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बोईंग ७४७-८ जंबो जेट भेट म्हणून दिले आहे. याचा वापर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वन म्हणून केला जाणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हिंदूंच्या सुरक्षेचे ढोंग की राजकीय खेळी? काय आहे युनूस यांचा नेमका हेतू?

Web Title: Trumps family receives 13 crore golf resort from vietnam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Greenland Dispute : अमेरिकन महासत्तेला डेन्मार्क देणार टक्कर? जाणून घ्या किती आहे सैन्य शक्ती?
1

Greenland Dispute : अमेरिकन महासत्तेला डेन्मार्क देणार टक्कर? जाणून घ्या किती आहे सैन्य शक्ती?

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान
2

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral
3

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral

Iran Protests: ‘ट्रम्पला पण मादुरोसारखे उचलू…’ इराण अमेरिका एकमेकांना भिडले; 24 तासांत इराणवर हल्ल्याची दाट शक्यता
4

Iran Protests: ‘ट्रम्पला पण मादुरोसारखे उचलू…’ इराण अमेरिका एकमेकांना भिडले; 24 तासांत इराणवर हल्ल्याची दाट शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.