Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी बॉम्बस्फोट, नंतर गोळीबार…; तुर्कस्तानच्या राजधानीत दहशतवादी हल्ला, 10 जणांचा मृत्यू, 14 जखमी

Turkey Terror Attack : अंकारामधील तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मुख्यालयावर बुधवारी दहशतवादी हल्ल्याची घटना घटना घडली. या हल्ल्यामागे पीकेके या कुर्दिश बंडखोरांचा हात असण्याची अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 24, 2024 | 04:25 PM
तुर्कस्तानच्या राजधानीत दहशतवादी हल्ला, 10 जणांचा मृत्यू, 14 जखमी

तुर्कस्तानच्या राजधानीत दहशतवादी हल्ला, 10 जणांचा मृत्यू, 14 जखमी

Follow Us
Follow Us:

Turkey Terror Attack News in Marathi : तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे बुधवारी (24 ऑक्टोबर) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तुर्कीने शेजारील दोन इस्लामिक देशांना लक्ष्य केले आहे. तुर्कस्तानने शेजारील सीरिया आणि इराकमध्ये हवाई हल्ले करण्यात आले. तुर्कस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले असून तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात एकूण 30 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

तुर्कीचा हवाई हल्ला

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘तुसास’वरील हल्ल्याबाबत सांगितले की, दोषींना सोडले जाणार नाही. राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यानंतर काही वेळातच तुर्कीने सीरिया आणि इराकवर हवाई हल्ले करण्यात आले. तुर्कस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही, मात्र हा हल्ला इराक आणि सीरियामध्ये सक्रिय कुर्दिश दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा संशय आहे.

हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी

दरम्यान, एका महिलेसह तीन हल्लेखोर टॅक्सीतून एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘तुसास’ कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर पोहोचले होते, असे तुर्कस्तानच्या माध्यमांनी सांगितले. हल्लेखोरांकडे हल्ला करण्यासाठी शस्त्रे होती. त्यांनी टॅक्सीजवळ स्फोटक यंत्राचा स्फोट केला. ज्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आणि आवारात प्रवेश केला. यानंतर तुर्कीचे सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले त्यानंतर गोळीबाराचे आवाज ऐकू आले. राजधानी अंकाराच्या बाहेरील भागात असलेल्या कंपनीवर तुर्कीच्या सुरक्षा दलांनी हल्ला केल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

इराक-सीरियामध्ये ३० ठिकाणी हवाई हल्ले

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीने उत्तर इराक आणि सीरियामध्ये सुमारे 30 पीकेके लक्ष्यांवर हवाई हल्ले केले आहेत. ही माहिती तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या हल्ल्यात नागरिकांची कोणतीही हानी झाली नाही, सर्व खबरदारी घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर तुर्की किंवा पीकेकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title: Turkey terror attack on cctv woman and man seen with rifles carrying deadly turkey attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • terror attack
  • Turkey

संबंधित बातम्या

Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या ‘त्या’ निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील ‘या’ घटनेवरून जागतिक राजकारण तापले
1

Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या ‘त्या’ निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील ‘या’ घटनेवरून जागतिक राजकारण तापले

‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला
2

‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.