
Two suspects arrested over theft from the Louvre Museum in Paris
Louvre Museum Robbery news Update: पॅरिस : फ्रान्सच्या (France) लूव्र संग्रहालयात दिवसाढवळ्या मोठी चोरी झाली होती. १९ ऑक्टोबरच्या सकाळी चोरांनी सात मिनिटांत संग्रहालयातून नेपोलियन बोनापार्ट आणि महाराणी जोसेफिन यांचे मौल्यवान दागिने लंपास केले होते. या चोरीअंतर्गत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शनिवारी (२५ ऑक्टोबर) दोन संशयितांना अटक केली आहे.
फ्रान्स हादरला! सात मिनिटांत पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून मौल्यवान दागिन्यांची चोरी
एसोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पॅरिस चार्ल्स डी गॉल विमानतळावरुन एका आरोपीला परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली, तर याच्या काही वेळानंतर
पोलिसांनी पॅरिसमध्येच दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.
कशी घडली होती चोरी?
१९ ऑक्टोबर रोजी फ्रान्सच्या लूव्र संग्रहालतायत ही चोरी घडली होती. चोरांनी म्युझियम उघडताच क्रेनच्या मदतीने
सीन नदीच्या बाजूची भींत फोडून संग्रहालयात प्रवेश केला. यानंतर ब्लिडिंगच्या दुसऱ्या मजल्यावरची खिडकी तोडली आणि आतमध्ये प्रवेस केला. या चोरट्यांनी सुमारे १०.२ कोटींचे आठ मौल्यवान मुकूट चोरी केले होते. यानंतर दोन्ही चोर बाईकवरुन फरार झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
सध्या या प्रकाची चौकशी BRB या विशेष पोलिस युनिटला देण्यात आली आहे. हे युनिट हाय-प्रोफाइल चोरीच्या घटनांची तपासणी करते. चोरी झालेली मुकुट फ्रान्सच्या राण्या महाराण्यांचे होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. यापूर्वी १९११ मध्ये देखील लूव्र संग्रहालयातून मोनालिसाची पेंटिंग चोरीला गेली होती.
🇫🇷 Thieves have robbed the Louvre in Paris — Napoleon’s treasures stolen Thousands of Parisians and tourists were unable to enter the world-famous Louvre Museum on the morning of October 19, as the building was cordoned off by security forces and its doors closed. Shortly after,… pic.twitter.com/FYqLTn0nUV — Visegrád 24 (@visegrad24) October 19, 2025
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. फ्रान्सच्या लूव्र संग्रहालयातील चोरीअंतर्गत किती जणांना अटक करण्यात आली?
फ्रान्सच्या लूव्र संग्रहालयातील चोरीअंतर्गत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
प्रश्न २. लूव्र संग्रहालयातून काय चोरीला गेले?
लूव्र संग्रहालयातून नेपोलियन बोनापार्ट आणि महाराणी जोसेफिन यांच्या मौल्यवान दागिने चोरीला गेले आहेत, ज्यामध्ये हार, ब्रोच आणि टियारा यांचा समावेश आहे.
प्रश्न ३. यापूर्वी लूव्र संग्रहालयात कधी झाली होती चोरी आणि कशाची?
यापूर्वी १९११ मध्ये लूव्र संग्रहालयातून मोनालिसाची पेंटिंग चोरीला गेली होती.