फ्रान्स हादरला! सात मिनिटांत पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून मौल्यवान दागिन्यांची चोरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
France News in Marathi : पॅरिस : एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. फ्रान्सच्या (France) लूव्र संग्रहालयात दिवसाढवळ्या मोठी चोरी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॅरिसमधील लूव्र संग्रहालयातून रविवारी (१९ ऑक्टोबर) सकाळी सात मिनिटांत संग्रहालयातून नेपोलियन बोनापार्ट आणि महाराणी जोसेफिन यांच्या मौल्यवान दागिने लंपास करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
फ्रान्सच्या संस्कृती मंत्री रशीगा दाती यांनी या घटनेची एक्सवरुन पुष्टी केली आहे. या घटनेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, सकाळी संग्रहालय उघडताच ही चोरी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चोरांनी लूव्र संग्रहालयात सीन नदीच्या बाजूची भींत फोडून प्रवेश केला. एका ट्रकवर शिडी लावून चोर संग्रहालयात घुसले. यानंतर त्यांनी डिस्क कटरने खिडकी तोडली आणि आतमध्ये जाणून दागिने लंपास केले. हे सर्व केवळ सात मिनिटांत घडले असल्याचे सांगितले दात आहे.
चोरांनी नेपोलियन आणि जोसेफिन यांचे दुर्मिळ रत्नजडित दागिने चोरले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु असून यामध्ये तीन लोकांचा सहभाग असल्याचे फ्रान्स पोलिसांनी म्हटले आहे. यातील दोन दणांनी चोरी केली आणि एकाने बाहेर उभे राहून आसपासच्या घटनेवर लक्ष ठेवले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
चोरील गेलेल्या नऊ दागिन्यांमध्ये हार, ब्रोच आणि टियारा यांचा समावेळ आहे. यामध्ये जगातील सर्वात मौल्यवान यूजनी क्राउन जो १८५५ मध्ये तयार करण्यात आला होता . याचा समावेश आहे. या क्राउनमध्ये हजारो हिरे आणि पन्ने आहेत. हा एक ऐतिहासिक मुकूट आहे. या मुकुटाचा काही भाग तुटलेल्या अवस्थेत सापडला होता.
🇫🇷 Thieves have robbed the Louvre in Paris — Napoleon’s treasures stolen Thousands of Parisians and tourists were unable to enter the world-famous Louvre Museum on the morning of October 19, as the building was cordoned off by security forces and its doors closed. Shortly after,… pic.twitter.com/FYqLTn0nUV — Visegrád 24 (@visegrad24) October 19, 2025
या घटनेनंतर संग्रहायल बंद ठेवण्यात आले आहे. तसेच हजारो पर्यटकांना देखील बाहेर काढण्यात आले आहे. घटनेचा तपास सुरु असून अधिकाऱ्यांनी चोर परदेशी असल्याची शंका व्यक्त केली आहे.
लूव्र संग्रहालयात जगातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ३.८ लाख वस्तू आहे. यातील ३५ हजार वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या चोरीने लूव्रच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी १९११ मध्ये देखील लूव्र संग्रहालयातून मोनालिसाची पेंटिंग चोरीला गेली होती.
प्रश्न १. फ्रान्समध्ये कुठे झाली चोरी?
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लूव्र संग्रहालयात मोठी चोरी झाली आहे.
प्रश्न २. लूव्र संग्रहालयातून काय चोरीला गेले?
लूव्र संग्रहालयातून नेपोलियन बोनापार्ट आणि महाराणी जोसेफिन यांच्या मौल्यवान दागिने चोरीला गेले आहेत, ज्यामध्ये हार, ब्रोच आणि टियारा यांचा समावेश आहे.
प्रश्न ३. यापूर्वी लूव्र संग्रहालयात कधी झाली होती चोरी आणि कशाची?
यापूर्वी १९११ मध्ये लूव्र संग्रहालयातून मोनालिसाची पेंटिंग चोरीला गेली होती.