Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War: युक्रेनियन ड्रोनच्या हल्ल्याने रशिया हादरला; बेलगोरोड आणि रोस्तोवमध्ये भीषण विध्वंस, 2 ठार अन् 17 जखमी

Ukraine Drone Strikes: युक्रेनियन ड्रोनने मध्यरात्री रशियाच्या अनेक शहरांवर हल्ला केला. रोस्तोवमध्ये एका जोडप्याचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले, तर बेलगोरोडमध्ये १२ जण जखमी झाले. निवासी भागांचे मोठे नुकसान झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 27, 2026 | 01:56 PM
ukraine drone strike russia belgorod rostov july 2026 marathi news

ukraine drone strike russia belgorod rostov july 2026 marathi news

Follow Us
Follow Us:
  • युक्रेनियन ड्रोनचा रशियाच्या शहरांवर मध्यरात्री हल्ला
  • जीवित आणि वित्तहानी
  • संरक्षण व्यवस्था अन् नौदल परेडवर परिणाम

रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine war) दरम्यान गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता अधिक तीव्र आणि धोकादायक वळणावर पोहोचला आहे. २७ जुलैच्या मध्यरात्री युक्रेनियन लष्कराने रशियाच्या सीमेच्या आत अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या मोक्याच्या शहरांवर एकाच वेळी मोठा ड्रोन हल्ला चढवला. या डीप-स्ट्राइक हल्ल्यांमुळे रशियातील रोस्तोव-ऑन-डॉन, बेलगोरोड आणि तागानरोग यांसारख्या शहरांमध्ये प्रचंड विध्वंस झाला असून निवासी भागांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे रशियाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दाव्यांवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वात भीषण परिस्थिती दक्षिण रशियातील प्रमुख लष्करी व व्यापारी केंद्र असलेल्या रोस्तोव-ऑन-डॉन (Rostov-on-Don) शहरात पाहायला मिळाली. रोस्तोव ओब्लास्टचे गव्हर्नर युरी स्ल्यूसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री शहरात एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाले. ड्रोनचे अवशेष निवासी भाग आणि गोदामांवर पडल्याने शहरात अनेक ठिकाणी भीषण आग लागली. या हल्ल्यात एका विवाहित दांपत्याचा जागीच मृत्यू झाला, तर एका किशोरासह इतर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

बेलगोरोडमध्ये बहुमजली इमारतीला आग, १५ वाहने जळून खाक

दुसरीकडे, युक्रेनच्या सीमेपासून अवघ्या २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलगोरोड शहरातही युक्रेनियन ड्रोनने जोरदार मारा केला. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एका बहुमजली निवासी इमारतीवर ड्रोन धडकल्याने तिथे मोठी आग लागली. या आगीच्या ज्वालांमध्ये इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या १५ हून अधिक गाड्या जळून खाक झाल्या. या हल्ल्यात दोन लहान मुलांसह तब्बल १२ नागरिक जखमी झाले आहेत. परिसरातील अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून इमारतींचे अंशतः नुकसान झाले आहे.

Belgorod. Another striking moment of a Ukrainian drone impact. According to available reports, the strikes targeted: ▪️ Logistics warehouses;
▪️ Yuzhnaya electrical substation;
▪️ The area around the Luch thermal power plant (CHP). pic.twitter.com/b1iPDOtCol
— распад и неуважение (@VictorKvert2008) July 25, 2026

credit – social media and Twitter

याशिवाय अझोव समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या तागानरोग (Taganrog) या किनारी शहरात आणि स्थानिक बंदरांच्या परिसरातही शक्तिशाली स्फोटांचे आवाज ऐकू आले. रशियन संरक्षण मंत्रालयाने बहुतांश युक्रेनियन ड्रोन हवेतच पाडल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्ष घटनास्थळावरून येणारे फोटो आणि व्हिडिओ जमिनीवर झालेल्या भीषण विनाशाची साक्ष देत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त

नौदल दिन परेड सलग दुसऱ्या वर्षी रद्द

युक्रेनच्या या वाढत्या ‘डीप-स्ट्राइक’ क्षमतांमुळे रशियाच्या अंतर्गत सुरक्षेची चिंता प्रचंड वाढली आहे. युक्रेनियन ड्रोनचा धोका लक्षात घेता रशियन प्रशासनाला सेंट पीटर्सबर्ग येथील त्यांची ऐतिहासिक आणि वार्षिक ‘नौदल दिन परेड’ (Naval Day Parade) सलग दुसऱ्या वर्षी रद्द करावी लागली आहे. रशियाची राजधानी मॉस्को आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे गृहनगर मानल्या जाणाऱ्या सेंट पीटर्सबर्गपर्यंत युक्रेनियन ड्रोन्स मजल मारत असल्याने, रशियाला आता आपल्या सीमावर्ती आणि अंतर्गत शहरांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त लष्करी तुकड्या तैनात कराव्या लागत आहेत.

Web Title: Ukraine drone strike russia belgorod rostov july 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Russia and Ukraine war

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश
1

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.