Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War: झेलेन्स्कींचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे; शांतता चर्चेपूर्वी रशियावर मोठा हल्ला

गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेले रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. जागतिक स्तरावर हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 11, 2025 | 11:40 AM
ukraine attack russia news before peace talks start

ukraine attack russia news before peace talks start

Follow Us
Close
Follow Us:

मॉस्को: गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेले रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. जागतिक स्तरावर हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सौदी अरेबियात यूक्रेन रशिया शांततेसाठी झेलेन्स्की सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सची भेट घेणार आहे. एकीकडे झेलेन्स्की शांततेसाठी प्रयत्न करत असताना यूक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या विविध भागांवर ड्रोन हल्ले केले आहेत. मॉस्कोसह अनेक शहरांमध्ये या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या हल्ल्यामुळे शांतता चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबियात रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चा होणार आहे. यासाठी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि रशियन अधिकारी सौदी अरेबियात पोहोचले आहे. मात्र, शांतता चर्चा होण्यापूर्वीच यूक्रेनच्या सैनिकांनी रशियाला ड्रोन हल्ले करत हादरवून टाकले आहे. यूक्रेनने मंगळवारी मास्कोवर मोठा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकच वेळी 70 ड्रोन यूक्रेनने रशियावर डागले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मॉरिशसमध्ये भव्य स्वागत; दोन दिवसाच्या दौऱ्यात ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा

रशियाच्या शहरांना लक्ष्य

यूक्रेनने रशियावर सुमारे एक तास सातत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये मॉस्कोतील अनेक निवासी इमारतींना लक्ष्य करण्यात आले आहे. मॉस्कोजवळील कोलोन्मा आणि डोमोडेदोवोमध्ये अनेक हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमुळे चर्चेपूर्वींच झेलेन्स्कींच्या हेतूंबद्दल विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

यूक्रेनचे हल्ले सुरुच

रशियन संरक्षण दलाने म्हटले आहे की, त्यांनी आतापर्यंत 58 ड्रोन नष्ट केले आहेत. मात्र यूक्रेन सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यांमुळे मॉस्को विमानतळ बंद करण्यात आले असून अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र याचा मोठा परिणाम शांतता चर्चेवर होईल असे म्हटले जात आहे.

गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेला हा रशिया-यूक्रेन संघर्ष मिटवम्यासाठी अमेरिकन, यूक्रेनियन आणि रशियन अधिकारी आज सौदी अरबेयात चर्चा करतील. या बैठकीत यूद्धबंदीच्या कराराची अपेक्षा आहे. शांतता चर्चेपूर्वी अमेरिका आणि रशियन अधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे, मात्र झेलेन्स्की या चर्चेसाठी उपस्थित नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला होता.

यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष मंगळवारी (11 मार्च) सौदी अरेबियाला पोहोचले आहेत. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचे स्वागत केले. जेद्दाला रवाना होण्यापूर्वी, झेलेन्स्की यांनी शांतता चर्चेत केलेल्या प्रयत्नांबद्दल सैदी अरेबियाचे आभार मानले आणि मध्यस्थीमध्ये मोहम्मद बिन सलमान यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युरोपमधील विनाशाचा फायदा उत्तर कोरियाला? किम जोंगच्या ‘या’ योजनेचा खुलासा, वाचा सविस्तर

Web Title: Ukriane attack on russia before peace talk start in saudi arabia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
1

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत
2

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल
3

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?
4

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.