
फोटो सौजन्य AI
याचबरोबर या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टला सुद्धा न मानण्याचा पवित्रा घेतला .याचीच प्रचिती आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाहायला मिळाली . जेव्हा नेतन्याहू यांचा विरोध दर्शवण्यासाठी सभागृहातून बऱ्याच देशांचे प्रतिनिधी बाहेर पडू लागले . तेव्हा नेतन्याहू यांनी व्यासपीठाची मर्यादा न पाळता जाणाऱ्या लोकांकडे बघून घाबरत भित्रे असा उल्लेख केला .
आणि छातीठोकपणे इस्रायल वरील सगळे आरोप फेटाळून लावले . इतकंच नव्हे तर त्यांनी सीरियाच्या पंतप्रधानासमोर ग्रेटर इस्रायलची आपली भूमिका मांडली . तर दुसरीकडे ट्रम्प यांनी व्यासपीठावरून इराणला थोडं कमी असा डोसच दिला आणि हे घडत असताना साऱ्या जगाने पाहिले . इराण कसा आमच्या समोर वाकत नाही तेच बघतो या आविर्भावात ट्रम्प यांनी इराणवर आपले मत मांडले . तर दुसऱ्या बाजूने चीननेही जश्यास तसे उत्तर देत समतोल साधला असे दिसून आले आहे .
Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात इराणविरोधातील अमेरिकी लष्करी कारवाईचे समर्थन केले आणि करार न झाल्यास इराणविरोधात आणखी कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली .
यानंतर चीनने लष्करी कारवाईऐवजी संवाद आणि राजनैतिक मार्गाने इराणच्या प्रश्नाचे निराकरण करण्याची भूमिका मांडली आहे . चीनने याआधीही अमेरिकेच्या एकतर्फी निर्बंधांना आणि लष्करी दबावाला तेवढ्याच ताकतीने विरोध केला आहे . आणि अमेरिका म्हणेल तसंच कसं होईल यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे .
ट्रम्प यांनी ऊन भाषणात क्युबाच्या कम्युनिस्ट सरकारवर टीका करत अमेरिकेकडून क्युबातील परिस्थितीत मूलभूत बदल घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले . त्यांच्या वक्तव्यादरम्यान क्युबाच्या प्रतिनिधी मंडळाने सभागृहा बाहेर पडल्याचे देखील वृत्त आले आहे .
Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
या भाषणातून चीनने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील एकतर्फी दबाव आणि हस्तक्षेपाच्या भूमिकेला आपला विरोध दर्शवला . इराण असो क्युबा असो संबंधित देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि त्यांच्या निर्णय घेण्याच्या अधिकाराचा पूर्ण जगाने आदर केला पाहिजे असा खणखणीत पलटवार ट्रम्प यांच्यावर केला .
यात कुठेही जिनपिंग अमेरिका भेटीवर आहेत म्हणून मवाळ भूमिका घेऊन कसलाही दुजाभाव ठेवला नाही . आपल्या मित्र देश इराण आणि क्युबासाठी पुन्हा एकदा अमेरिकेला स्पष्ट शब्दात चीनने इशारा दिल्याचे बोलले जाते . आणि यामुळेच चीन आणि अमेरिकेतील परराष्ट्र धोरणातील मतभेद पुन्हा स्पष्टपणे समोर आले .