Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UN Revelation : संविधान बदलले अन् वाद पेटला! पाकिस्तान पुन्हा जागतिक चर्चेत; संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली तीव्र चिंता

Asim Munir power : पाकिस्तानच्या संविधानातील अलिकडच्या सुधारणांबद्दल संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांना लोकशाहीसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की या चिंता पूर्णपणे चुकीच्या आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 30, 2025 | 04:19 PM
UN revelation boosts Munir’s power Pakistan seeks clarification

UN revelation boosts Munir’s power Pakistan seeks clarification

Follow Us
Close
Follow Us:
  • २७ व्या घटनादुरुस्तीमुळे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे अधिकार वाढतात, असा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांचा दावा.
  • पाकिस्तान सरकारने हा आरोप पूर्णपणे फेटाळून तो “निराधार आणि चुकीचा” असल्याचे सांगितले.
  • घटनादुरुस्ती योग्य संसदीय प्रक्रियेनुसार, दोन तृतीयांश बहुमताने मंजूर झाल्याचे पाकिस्तानचे स्पष्टीकरण.

Pakistan 27th Amendment : पाकिस्तानच्या (Pakistan) संविधानात करण्यात आलेल्या २७ व्या घटनादुरुस्तीमुळे देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र चर्चा रंगली आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी या दुरुस्तीबाबत गंभीर चिंता व्यक्त करताना म्हटले की, या बदलांमुळे पाकिस्तानमध्ये लष्कराची सत्ता अधिक बळकट होण्याचा धोका आहे आणि याचा थेट परिणाम न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावरही होऊ शकतो. त्यांच्या मते, या घटनादुरुस्तीमुळे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांना अधिक अधिकार मिळण्याची शक्यता असून, नागरिक सत्तेच्या स्वायत्ततेवर मर्यादा येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या विधानानंतर पाकिस्तान सरकारने तातडीने प्रतिक्रिया देत संयुक्त राष्ट्रांचा आरोप साफ फेटाळून लावला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तांनी व्यक्त केलेल्या शंका पूर्णपणे चुकीच्या आणि तथ्यहीन आहेत. पाकिस्तानची संसद ही देशाच्या लोकनिर्वाचित प्रतिनिधींचे सर्वोच्च व्यासपीठ असून, कोणताही कायदा किंवा घटनादुरुस्ती ही सविस्तर चर्चा आणि संविधानात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसारच पारित केली जाते, असेही सरकारने स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shadow Fleet : ‘हा VIRATआहे, आम्हाला मदत हवी आहे, मेडे…मेडे’; रशिया युक्रेनचा ब्लॅक सीमध्ये युद्ध थरार, तुर्की मात्र अनभिज्ञ

परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, २७ वी घटनादुरुस्ती संसदेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया जगभरातील संसदीय लोकशाही राष्ट्रांमध्ये जशी पाळली जाते तशीच आहे. त्यामुळे या दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे पाकिस्तानाच्या सार्वभौमत्वावर आणि संसदेच्या अधिकारांवर थेट आघात असल्याचे त्यांनी नमूद केले. संसदेला संविधानिक अधिकार आहेत आणि त्या अधिकारांचा आदर होणे आवश्यक आहे, असेही पाकिस्तानने ठामपणे सांगितले.

याच निवेदनात पाकिस्तानने असेही म्हटले की, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या कामाला ते नेहमीच महत्त्व देतात, मात्र या वेळेस जारी करण्यात आलेले विधान जमिनीवरील वास्तवाशी विसंगत आहे. पाकिस्तानमध्ये करण्यात आलेले बदल हे संविधानिक चौकटीतच असून, त्यांचा उद्देश देशातील प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करणे हा आहे, ना की लोकशाही कमकुवत करणे.

#BREAKING | UN warns Pakistan on military ‘power grab’, says it has ‘concerns about military accountability,’ This comes after the country made Asim Munir the supreme military chief@MollyGambhir gets you this report pic.twitter.com/98RFVxu8MG — WION (@WIONews) November 28, 2025

credit : social media and Twitter

दुसरीकडे, वोल्कर तुर्क यांनी दिलेल्या निवेदनात असेही सांगितले की, या घटनात्मक सुधारणांमुळे न्यायसंस्थेचे अधिकार मर्यादित करण्यात आले असून, लष्करी प्रभाव थेट वाढत आहे. परिणामी, पाकिस्तानमधील “रूल ऑफ लॉ” म्हणजेच कायद्याचे राज्य धोक्यात येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नागरी सरकार कमकुवत होत असल्याचे आणि निर्णयप्रक्रियेत लष्करी हस्तक्षेप वाढल्याचे हे लक्षण असू शकते, असेही त्यांच्या वक्तव्यात सूचित करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने संयुक्त राष्ट्रांना आवाहन केले आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करू नये तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे विधाने करू नयेत. पाकिस्तानच्या संसदीय निर्णयांचा आदर करणे ही आंतरराष्ट्रीय संस्थांची जबाबदारी आहे, असेही पाकिस्तानने ठामपणे नमूद केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Taiwan T-Dome : ड्रॅगनच्या धोक्याला प्रत्युत्तर देत तैवान उभारणार ‘हवाई किल्ला’; ‘या’ मास्टरप्लॅनमध्ये इस्रायल करणार मोठी मदत

२७ व्या घटनादुरुस्तीला संसदेत मान्यता मिळाल्यानंतर देशात विविध ठिकाणी निषेधाचे सूर उमटले होते. काही विरोधी पक्षांनीही या दुरुस्तीला विरोध दर्शवला होता. मात्र, सरकारने सर्व आरोप फेटाळून लावत ही दुरुस्ती देशाच्या हितासाठी आणि स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमधील नागरी-लष्करी सत्तासंतुलन, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीची दिशा या मुद्द्यांवर नव्याने जागतिक चर्चा सुरू झाली आहे. पुढील काळात या दुरुस्तीचा पाकिस्तानच्या राजकारणावर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानची २७ वी घटनादुरुस्ती वादात का आहे?

    Ans: कारण ती लष्कराचे अधिकार वाढवते आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कमी करते, असा आरोप आहे.

  • Que: पाकिस्तान सरकारने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: हा आरोप चुकीचा असून, दुरुस्ती घटनात्मक प्रक्रियेनुसारच झाली, असे सरकारने स्पष्ट केले.

  • Que: याचा पाकिस्तानच्या लोकशाहीवर परिणाम काय होईल?

    Ans: यावर सध्या वाद सुरू असून जागतिक पातळीवर लक्ष केंद्रध झालं आहे.

Web Title: Un revelation boosts munirs power pakistan seeks clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 04:19 PM

Topics:  

  • international news
  • pakistan
  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

Nobel Prize : ‘आम्ही आमचे पदक देऊ शकतो, पण नाव नाही!’ नोबेल समितीने ट्रम्पला चांगलेच सुनावले, जगभरात बनले हसू
1

Nobel Prize : ‘आम्ही आमचे पदक देऊ शकतो, पण नाव नाही!’ नोबेल समितीने ट्रम्पला चांगलेच सुनावले, जगभरात बनले हसू

Greenland Crisis : खनिजांची भूक अन् सत्तेची हाव! वॉशिंग्टनमध्ये चर्चा फिसकटली; ग्रीनलँडच्या मालकीवरून पुन्हा ‘महाभारत’
2

Greenland Crisis : खनिजांची भूक अन् सत्तेची हाव! वॉशिंग्टनमध्ये चर्चा फिसकटली; ग्रीनलँडच्या मालकीवरून पुन्हा ‘महाभारत’

Singapore च्या राजवटीला धक्का पोहोचवणारे भारतीय वंशाचे Pritam Singh यांची हकालपट्टी; ‘या’ एका चुकीमुळे गमावले संसदेतील पद
3

Singapore च्या राजवटीला धक्का पोहोचवणारे भारतीय वंशाचे Pritam Singh यांची हकालपट्टी; ‘या’ एका चुकीमुळे गमावले संसदेतील पद

Iran Protest 2026: 12,000 लोकांची हत्या आणि रक्ताची होळी; इराणच्या नरसंहारामागे इराकी शिया मिलिशियाचा हात
4

Iran Protest 2026: 12,000 लोकांची हत्या आणि रक्ताची होळी; इराणच्या नरसंहारामागे इराकी शिया मिलिशियाचा हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.