‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
असीम मुनीर पाकिस्तानचा ‘सर्वशक्तिमान लष्करी सर्वोच्च’ होण्याच्या उंबरठ्यावर असून त्यांची भारतविरोधी धोरणे मुशर्रफच्या “ब्लीड इंडिया” रणनीतीशी साधर्म्य दाखवतात.
ऑपरेशन सिंदूरनंतर मुनीरने सत्ता अधिक घट्ट केली असून, भारतात सक्रिय झालेल्या दहशतवादी नेटवर्कमुळे त्यांची अप्रत्यक्ष युद्धनीती पुन्हा सक्रिय झाल्याचे संकेत.
अमेरिकेत भारतावर टीका, दहशतवादी स्लीपर सेलचा उलगडा आणि पाकिस्तानच्या नवीन राजनैतिक हालचाली—हे सर्व भारतासाठी नव्या सुरक्षा आव्हानांचे संकेत मानले जात आहेत.
Asim Munir’s new Bleed India plan : पाकिस्तानच्या ( Pakistan) सत्ताकारणात एक ऐतिहासिक आणि धोकादायक वळण येत असल्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत. फील्ड मार्शल असीम मुनीर( Asim Munir) हे देशाच्या राजकीय आणि लष्करी यंत्रणेच्या केंद्रस्थानी वेगाने प्रस्थापित होत असून, आगामी काळात ते पाकिस्तानचे ‘सर्वशक्तिमान लष्करी सर्वोच्च’ ठरणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. संविधानातील २७ व्या दुरुस्तीद्वारे त्यांना दिले जाणारे विशेष अधिकार त्यांना लष्कर, नौदल, वायुदल आणि अगदी अणुदलावरही सर्वोच्च कमांडर बनवणार आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये नागरी सत्तेपेक्षा लष्करी बाजू अधिक प्रभावी होणार, आणि सत्ता एका व्यक्तीकडे केंद्रीत होण्याचा धोका वाढत आहे.
मुनीर यांची विचारसरणी ही पारंपरिक राजनैतिक विचारांपासून दूर, स्पष्टपणे उजव्या आणि भारतविरोधी स्वरूपाची मानली जाते. त्यांच्या हालचाली आणि भाषणांचे विश्लेषण करणाऱ्या तज्ञांच्या मते, मुशर्रफ यांनी राबवलेल्या ‘हजार जखमा – ब्लीड इंडिया’ धोरणाचा परिपाठ मुनीर पुन्हा उचलताना दिसत आहेत. या धोरणानुसार पारंपारिक युद्ध न करता, दहशतवादी कारवाया, सीमापार घुसखोरी आणि भारतात अस्थिरता निर्माण करणे हे उद्दिष्ट असते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Bomb Blast : दिल्ली बॉम्बस्फोटांपासून ते काश्मीरपर्यंत…;पाकिस्तानसोबत ‘हा’ मुस्लिम देशही आहे कटात सामील
ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या मोठ्या हानीनंतर पाकिस्तानमध्ये सत्तेच्या समीकरणात आमूलाग्र बदल झाले. इस्लामाबादने या काळात भारताविरुद्ध अणुहल्ल्याचे संकेत देऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु भारताने ही धमकी ठामपणे नाकारली. या अपयशानंतर मुनीर यांच्या धोरणात मोठा बदल दिसून येऊ लागला. ते सरळ संघर्षाचा मार्ग टाळून पुन्हा अप्रत्यक्ष युद्धाचे म्हणजेच दहशतवादी कारवायांचे mजाळे मजबूत करण्याच्या दिशेने वळले असल्याचे सुरक्षा विश्लेषक सांगतात.
अलीकडील काही महिन्यांत पाकिस्तानने अमेरिका, चीन आणि सौदी अरेबियासोबत राजनैतिक समीकरणे मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मुनीरची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारली असली तरी, या सत्तास्थिरीकरणामागे मुख्य हेतू पाकिस्तानचा विकास नसून भारतावर दबाव निर्माण करणे, अशी शंका तज्ञांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीतील १० नोव्हेंबरच्या बॉम्बस्फोटांनंतर गुप्तचर संस्थांनी उघड केलेली माहिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतात सक्रिय असलेल्या नव्या स्लीपर सेल नेटवर्कचा उद्देश विविध प्रदेशांत मोठे हल्ले घडवून राष्ट्रात अस्थिरता निर्माण करणे हा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. या कारवायांमागे मुनीरच्या रणनीतीचे स्पष्ट संकेत असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे—कारण हीच रचना मुशर्रफच्या ‘हजार कट’ रणनीतीची.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jora Sidhu : दुबईत पहिल्यांदाच भारतीय टोळ्यांचे रक्तरंजित युद्ध; लॉरेन्स बिश्नोई गटातील झोरा सिद्धूच्या हत्येचा मोठा दावा
ऑगस्ट २०२५ मधील अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमात असीम मुनीर यांनी भारताची तुलना “चमकदार कार”शी आणि पाकिस्तानची तुलना “रेतीच्या ट्रक”शी केली. या वक्तव्याने त्यांच्या मानसिकतेचे आणि धोरणात्मक उद्दिष्टांचे सूक्ष्म पण स्पष्ट दर्शन घडते—भारताचा उदय रोखणे हेच त्यांचे प्रमुख ध्येय. या टिप्पण्यांमुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळातही त्यांच्याबद्दल चिंता वाढली आहे.
मुनीर यांच्या वाढत्या सत्तेमुळे आणि त्यांच्या भारतविरोधी आक्रमक धोरणांमुळे भारताने सुरक्षा, दहशतवादविरोधी मोहीम आणि सीमारेषेवरील सजगता वाढवणे अत्यावश्यक ठरणार आहे. पाकिस्तानातील या नव्या लष्करी केंद्रीकरणामुळे पुन्हा एकदा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया निर्माण होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.






