
दक्षिण आफ्रिकेत सामूहिक गोळीबाराची घटना
11 जणांचा मृत्यू तर 14 नागरिक जखमी
जखमी लोकांना रूग्णालयात केले दाखल
दक्षिण आफ्रिकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa )गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिकेत आज अचानक एका हॉस्टेलमध्ये घुसून अज्ञात लोकांनी अंदाधुंद गोळीबार (Crime) केला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 14 जन जखमी झाले आहेत. ही घटना प्रिटोरियाच्या सोलसिव्हिल हॉस्टेलमध्ये घडली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील पोलिस यंत्रणेने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. या घटनेत एकूण 25 जणांना गोळ्या लागल्या आहेत. त्यातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जखमी झाल्याचे तेथील पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जखमी नागरिकांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले.या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये 3 अल्पवयीन देखील होते.
दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक वेळेनुसार पहाटेच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्ल्या झाल्यावर दोन तासांनी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस, फॉरेन्सिक तज्ञ आणि अन्य पथके तातडीने दाखल झाली. हा हल्ला कशासाठी केला गेला, कोणी केला याचा तपास अत्यंत वेगाने सुरू करण्यात आला आहे.
सूदानमध्ये लष्कराचा नागरिकांवर रक्तरंजित प्रहार
सुदानमध्ये पुन्हा हिंसाचार उफळला आहे. सुदानच्या निमलष्करी दलाच्या सैनिकांनी (RSF) दक्षिण मध्य सुदानमध्ये कॉर्डोफान येथे ड्रोन हल्ला केला आहे. लहान मुलांच्या शाळेवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३३ लहान मुलांसह ५० जणांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. सध्या सुदानमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (०५ डिसेंबर) रात्री उशिरा हा हल्ला झाला. यानंतर एक निवेदन जारी करण्यात आले होते. हल्ल्यानंतर एक वैद्यकीय पथक तिथे पोहोचले होते. यातील एका पथकाला देखील लक्ष्य करण्यात आले आहे. सध्या ड्रोन हल्ल्यांमुळे परिसरात संपूर्क तुटला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यापूर्वी गुरुवारी सकाळी देखील लष्कर आणि सुदानी सैन्यात संघर्ष सुरु झाला होता. दोन्ही लष्करी गटांमध्ये गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून हा संघर्ष सुरु आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.
Sudan Violence : सूदानमध्ये लष्कराचा नागरिकांवर रक्तरंजित प्रहार ; ड्रोन हल्ल्यात लहान मुलांसह ५० जणांचा मृत्यू