Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 12:15 PM
गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई

गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिस उपायुक्तांच्या चारही परिमंडळांतर्गत जानेवारी २०२६ या महिन्यात एकूण ४७ सराईत गुन्हेगारांवर तडीपार/हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन सराइत गुन्हेगारांना ‘एमपीडीए’ कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

 

खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, खंडणीसाठी अपहरण, गंभीर दुखापत, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच तडीपार आदेशाचा भंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात ही व्यापक प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

एमपीडीएअंतर्गत दोन गुन्हेगार स्थानबद्ध

चाकण उत्तर व उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेले रजीत लक्ष्मण येरकर (वय १९, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) व रामदास मारुती साळुंके (वय ३७, रा. आंबेठाण, ता. खेड) या दोघांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांना अनुक्रमे येरवडा व नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

चार परिमंडळांत मोठी तडीपार कारवाई

परिमंडळ १ मध्ये १०, परिमंडळ २ मध्ये ९, परिमंडळ ३ मध्ये १७, तर परिमंडळ ४ मध्ये ११ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड शहर व काही प्रकरणांत रायगड जिल्ह्यातील हद्दीतून ठरावीक कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेले हे गुन्हेगार २० ते ५० वयोगटातील असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

हे सुद्धा वाचा : चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं?

गुन्हेगारीवर पोलिसांचे कडक धोरण

एमपीडीए व तडीपार कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली असून, भविष्यातही गुन्हेगारी नियंत्रणासाठी अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. तडीपार केलेले गुन्हेगार हद्दीत आढळल्यास तात्काळ ११२ क्रमांकावर किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत चार परिमंडळांतर्गत २४ पोलिस ठाणे आहेत. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ४०० पेक्षा जास्त गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. – विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: Pimpri chinchwad police have taken major action against criminals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pimpri Chinchwad crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण…
1

धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण…

Ashok Kharat Viral Video: वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच
2

Ashok Kharat Viral Video: वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच

अशोक खरातनंतर आणखी एक प्रकरण समोर; भोंदूने ‘मी शंकर, तू पार्वती…’ म्हणत अत्याचार
3

अशोक खरातनंतर आणखी एक प्रकरण समोर; भोंदूने ‘मी शंकर, तू पार्वती…’ म्हणत अत्याचार

Crime News: रत्नागिरीत नेमके काय चाललंय? मिऱ्या-नागपूर हायवेवर Hit & Run घटनेत…
4

Crime News: रत्नागिरीत नेमके काय चाललंय? मिऱ्या-नागपूर हायवेवर Hit & Run घटनेत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.