Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुले-मुली अचानक बेपत्ता होण्याचे वाढतंय प्रमाण; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

मुकुंदवाडी जे सेक्टर परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाची अल्पवयीन मुलगी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी राहत्या घरातून बेपत्ता झाली. फिर्यादी यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 08, 2026 | 03:00 PM
तीन दिवसांत अपहरणाच्या तीन घटनांनी खळबळ

तीन दिवसांत अपहरणाच्या तीन घटनांनी खळबळ

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतून अल्पवयीन मुले-मुली अचानक बेपत्ता झाल्याच्या घटना वाढीस लागल्या असून, अवघ्या तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत अपहरणाच्या तक्रारी दाखल झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुकुंदवाडी जे सेक्टर परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाची अल्पवयीन मुलगी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी राहत्या घरातून बेपत्ता झाली. फिर्यादी यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, तर ते आपल्या छोट्या मुलीला शाळेत सहलीकरीता सोडण्यासाठी बाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर काही वेळाने मोठी मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूला तसेच मुलीच्या मैत्रिणींमध्ये शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर अज्ञाताने मुलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जवाहरनगरमध्ये मुलगी घरातून झाली बेपत्ता

जवाहरनगर परिसरातील विष्णूनगर येथे ५ फेब्रुवारी रोजी मुलगी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. पालकांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक, नातेवाईकांकडे तसेच परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या पलकांनी व्यक्त केल आहे. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा हद्दीत अल्पवयीन मुलाचे अपहरण

सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगर, रेल्वे स्टेशन परिसरातून ३ फेब्रुवारीच्या रात्री अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंतच्या दरम्यान ही घटना घडली. तक्रारदारांनी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलाला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिस तपासाला वेग

तिन्ही प्रकरणांत अपहरणाचा संशय असल्याने संबंधित पोलिस ठाण्यांकडून शोध मोहिमा राबवण्यात येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासणे, नातेवाईक व परिचितांची चौकशी तसेच रेल्वे व बसस्थानकांवर माहिती पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अल्पवयीन मुले-मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेदेखील : Bihar Crime: चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं ?

Web Title: Number of minor boys and girls suddenly going missing is increasing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • crime news
  • Missing Case

संबंधित बातम्या

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
1

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
2

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
3

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
4

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.