Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सराईत गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 06:10 PM
पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली
  • पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार
  • पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सराईत गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

 

विशाल बाळासाहेब कांबळे (वय २७, रा. धनकवडी) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पवार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रुपेश जाधव, उपनिरीक्षक गणेश कर्चे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

धनकवडीत (दि. २५ ऑक्टोबर) गेल्या वर्षात वैमनस्यातून एका तरुणावर कांबळेने कोयत्याने वार केले होते. घटनेत तरुण जखमी झाला होता. याप्रकरणी कांबळे याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. तो लोहगाव भागात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पोलिसंच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. जुन्या वादातून त्याने तरुणावर केले असल्याचे कबूल केले. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

पुणे शहर पोलिस दलात नुकतेच नव्याने पाच पोलिस ठाणी तसेच दोन परिमंडळे कार्यान्वित झाली आहेत. पोलिस ठाण्यांची संख्या तसेच वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासोबतच गुन्हेगारी नियत्रंण ठेवण्यासाठी आणि तपासाला गती देण्यास शहर गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात आली आहे. आजवर शहरात गुन्हे शाखेचे ६ युनिट होते. ते आता सात झाले असून, एक एसीपी पदही वाढविण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरात असलेल्या ७ परिमंडळसाठी ७ युनिट कार्यरत असणार आहेत. शहरात ४४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या माध्यमातून गंभीर गुन्ह्यांवर लक्ष ठेवले जाते. गुन्हे शाखेअंतर्गत सहा युनिट्स, तसेच खंडणीविरोधी, अंमली पदार्थ विरोधी, आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी अशी प्रत्येकी दोन मिळून एकूण १२ पथके कार्यरत आहेत. ही सर्व पथके गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या देखरेखीखाली काम करत आहेत.

Web Title: Sahakarnagar police have arrested the criminal who attacked a youth in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.