Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Attack Iran : शांततेची संधी हुकली? चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचा ‘Love Tap’; इराणच्या महत्त्वपूर्ण बंदरावर मोठा हल्ला

US Attack Iran Update : इराणच्या अब्बास आणि केशम बंदरावर अमेरिकेने हल्ला केला आहे. यामुळे युद्धबंदीच्या प्रयत्नांना धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. इराणने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2026 | 12:02 PM
US Attack Iran

US Attack Iran

Follow Us
Follow Us:
  • शांततेची संधी हुकली?
  • इराणच्या महत्त्वपूर्ण बंदरावर अमेरिकेचा भीषण हल्ला
  • ट्रम्प यांनी म्हटले ‘Love Tap’
US Attack Iran News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडू शकतो. अमेरिकेने इराणवर हल्ला करत शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. इराणने युद्धविरामासाठी हिरवा कंदिल दाखवला होता. पाकिस्तानच्या मध्यस्थीने येत्या २४ तासांत अमेरिकेला अंतिम प्रस्ताव मिळणार असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र हा प्रस्ताव पोहोचण्यापूर्वीच अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहे. यामुळे चर्चेची दरवाजे बंद होण्याची शक्यता आहे.

Iran US Peace Deal : युद्धबंदीसाठी इराणचा ग्रीन सिग्नल! २४ तासांत अमेरिकेला पाठवणार अंतिम प्रस्ताव, महायुद्धाचा धोका टळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने वाढता तणाव पाहता आपल्या भूमिकेत मवाळपणा आणत युद्धबंदीसाठी तयारी दर्शवली होती. पाकिस्तानमार्फत अमेरिकेला गुप्त प्रस्ताव पाठवण्यात येणार होता. ज्यामध्ये होर्मुध खाडीतील संघर्षाबाबत काही अटी मान्य करण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. राजकीय तज्ज्ञांच्या मते, हा प्रस्ताव मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेम चेंजर ठरला असता. परंतु हा शांतता प्रस्ताव पोहोचण्याआधीच इराणवर हल्ला करण्यात आला.

इराणचा हल्ला अन् अमेरिकेचा पलटवार

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणच्या केशम आणि बंदर अब्बास या महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या कारवाईमुळे इराणचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ०७ मे रोजी इराणने होर्मुझमधून जाणाऱ्या अमेरिकेच्या डिस्ट्रॉयर जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही करावई केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला Love Tap असे संबोधले आहे.

इराणमध्ये हाय अलर्ट जारी

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने इराणच्या नौदलाचे ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत. इराण ड्रोन मरणाऱ्या फुलपाखरप्रमाणे समुद्रात कोसळले असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे. दुसरीकडे इराणमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत.

इराणची प्रत्युत्तराची धमकी

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) ने अमेरिकेच्या या कृत्याला सागरी युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. याचा तीव्र निषेध करण्यात आला असून इराणचे सर्वाच्च नेते मोजतबा खामेनेई या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे IRGC ने म्हटले आहे. इराणने प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्रालयाने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही शांततेचा हात पुढे केला होता, पण अमेरिकेला युद्ध हवे आहे,’ असे इराणने म्हटले आहे. प्रत्युत्तरात अमेरिकेच्या लष्करी तळांवर पुन्हा हल्ल्याची धमकी दिली आहे.

युद्धबंदीच्या प्रयत्नांना धक्का?

अमेरिकेने इराणच्या शांतता प्रस्तावला अशा पद्धतीने धुडकावून लावल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे मध्यपूर्वे पुन्हा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा संघर्ष आता दोन देशांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगाला युद्धात खेचत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.


Hantavirus Update : जगावर दुसऱ्या महामारीचे संकट? अटलांटिकमध्ये क्रूझवर Hantavirus चा उद्रेक, ३ जणांच्या मृत्यूनंतर WHO चा ‘अर्लट’

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणवर हल्ला का केला?

    Ans: 07 मे रोजी इराणने होर्मुझच्या खाडीत अमेरिकेच्या डिस्ट्रायरवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी केशम आणि अब्बास बंदरावर हल्ले करण्यात आले असल्याचे अमेरिकेने म्हटले.

  • Que: ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याबाबत काय म्हटले?

    Ans: ट्रम्प यांनी इराणवरील भीषण हल्ला केवळ लव्ह टॅप असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, इराणचे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले असून ते एखाद्या मरणाऱ्या फुलपाखराप्रमाणे समुद्रात कोसळले.

  • Que: अमेरिकेच्या हल्ल्यावर इराणने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: इराणने अमेरिकेच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून प्रत्युत्तरात अमेरिकेच्या लष्करी तळांवर पुन्हा हल्ल्याची धमकी दिली आहे. इराणने म्हटले आहे की, 'आम्ही शांततेचा हात पुढे केला होता, पण अमेरिकेला युद्ध हवे आहे.'

Web Title: Us attack iran us airstrike on qeshm and bandar abbas port trump calls it love tap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Iran-US War : ‘…तर आम्ही चर्चा, बैठका रद्द करू’; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी
1

Iran-US War : ‘…तर आम्ही चर्चा, बैठका रद्द करू’; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी

BrahMos Deal : इराण-इस्रायल तणावात यूएईची भारताकडे धाव; ब्रह्मोस खरेदीसाठी चर्चा सुरु
2

BrahMos Deal : इराण-इस्रायल तणावात यूएईची भारताकडे धाव; ब्रह्मोस खरेदीसाठी चर्चा सुरु

War Deaths : इराण युद्धाचा भारतावर कहर! अमेरिका-इस्रायलपेक्षा अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू, अहवालामुळे खळबळ
3

War Deaths : इराण युद्धाचा भारतावर कहर! अमेरिका-इस्रायलपेक्षा अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू, अहवालामुळे खळबळ

होर्मुझ उघडताच शत्रूची धुर्त खेळी; पाकिस्तानच्या ‘या’ निर्णयामुळे भारतावर ओढवणार महाभंयकर संकट
4

होर्मुझ उघडताच शत्रूची धुर्त खेळी; पाकिस्तानच्या ‘या’ निर्णयामुळे भारतावर ओढवणार महाभंयकर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.