Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Leaves Iraq : इराक सोडताना अमेरिकेची मोठी कबुली; सामूहिक संहारक शस्त्रांशिवाय अशी उलथवली सद्दाम हुसेनची सत्ता

US Leaves Iraq : अमेरिकेने दोन दशकांनंतर इराकमधून आपले सर्व सैन्य मागे घेतले आहे. आघाडीचे सैन्य मागे घेतल्यामुळे, इराक 1 ऑक्टोबर हा 'सार्वभौमत्व दिन' म्हणून साजरा करेल. यायबत जाणून घ्या सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 30, 2026 | 02:08 PM
US military withdrawal Iraq US troops leave Baghdad 2026

US military withdrawal Iraq US troops leave Baghdad 2026

Follow Us
Follow Us:
  • २ दशकांनंतर अमेरिकन सैन्याची पूर्ण माघार
  • इराकमध्ये १ ऑक्टोबर ‘सार्वभौमत्व दिन’
  • भूराजकीय स्थित्यंतर आणि सुरक्षेचे आव्हान

मध्य पूर्वेतील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा राजकीय आणि युद्धजन्य घडामोडींमध्ये आज एका मोठ्या युगाचा अंत झाला आहे. अमेरिकेने (America) इराकमधून आपले लष्करी अभियान अधिकृतपणे पूर्णपणे समाप्त करून बगदाद सोडले आहे. तब्बल दोन दशकांनंतर अमेरिकन सैन्याने इराकमधून काढता पाय घेतला असून, या ऐतिहासिक माघारीनंतर इराकचे सरकार १ ऑक्टोबर हा दिवस अधिकृतपणे ‘सार्वभौमत्व दिन’ (Sovereignty Day) म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करणार आहे.

दरम्यान, सध्या मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात अत्यंत तणावपूर्ण वातावरण आणि युद्धजन्य परिस्थिती कायम असताना अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय युती सैन्याने इराक देशाला दहशतवादी आणि अतिरेकी गटांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असली, तरी या सैन्याच्या उपस्थितीमुळेच प्रादेशिक तणाव वाढल्याचा आरोपही त्यांच्यावर सातत्याने केला जात होता.(US Leaves Iraq)

२००३ चे आक्रमण आणि सद्दाम हुसेनची फाशी

या युद्धाची सुरुवात २००३ मध्ये झाली, जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन प्रशासन आणि मित्रांनी इराकी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्यावर ‘सामूहिक संहारक शस्त्रे’ (Weapons of Mass Destruction) विकसित केल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर अमेरिकेने ब्रिटन, कॅनडा आणि फ्रान्ससारख्या नाटो (NATO) मित्र राष्ट्रांच्या सैन्याला सोबत घेऊन इराकवर थेट लष्करी आक्रमण केले. इराकचे सैन्य आणि अमेरिकन आघाडीच्या सैन्यादरम्यान हे भीषण युद्ध जवळपास तीन वर्षे सतत चालले. शेवटी ३० डिसेंबर २००६ रोजी सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आल्यावर या पहिल्या टप्प्यातील युद्धाची समाप्ती झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

मात्र, सद्दाम हुसेन यांच्या निधनानंतर अमेरिकन सैन्याने राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यांसह संपूर्ण इराकमध्ये कसून पाहणी केली, परंतु संपूर्ण शोधाशोध करूनही अमेरिकेला तिथे कोणत्याही प्रकारची विनाशकारी किंवा रासायनिक शस्त्रे सापडली नाहीत.

अराजकता, मोठी चूक आणि ‘इस्लामिक स्टेट’चा उदय

सद्दाम हुसेनच्या मृत्यूनंतर इराकमध्ये प्रचंड राजकीय व सामाजिक अराजकता माजली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकन सैन्याने तिथे कायमस्वरूपी लष्करी तळ स्थापन करून सैन्य तैनात केले. एका टप्प्यावर इराकमध्ये तब्बल १,५०,००० अमेरिकन सैनिक तैनात होते.

US troops WITHDRAW from Iraq as 23-year military presence NEARS END Withdrawal set to be completed by SEPTEMBER 30 pic.twitter.com/W33Np2IDRj — RT (@RT_com) September 29, 2026

credit – social media and Twitter

परंतु, सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर अमेरिकन प्रशासनाकडून एक ऐतिहासिक चूक घडली. तत्कालीन इराकी सैन्य हे सद्दाम यांच्याशीच एकनिष्ठ राहील असा चुकीचा अंदाज बांधून अमेरिकेने इराकचे संपूर्ण अधिकृत सैन्य तडकाफडकी बरखास्त केले. या एकाच निर्णयामुळे सुमारे ३,५०,००० इराकी सैनिक एका रात्रीत बेरोजगार झाले. संतापलेल्या या सैनिकांनी नंतर ‘इस्लामिक स्टेट’ (IS) या कुख्यात दहशतवादी संघटनेत आणि इतर जहाल गटांमध्ये प्रवेश केला. पुढे याच माजी सैनिकांच्या मदतीने आयसिसने केवळ इराकमध्येच नव्हे, तर सीरियासह संपूर्ण मध्य पूर्वेत भीषण रक्तपात आणि दहशतवादी हल्ले घडवून आणले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

आयसिसविरुद्ध लढा आणि २०२४ चा ऐतिहासिक करार

२०१४ मध्ये, जेव्हा इस्लामिक स्टेटने इराक आणि सीरियातील मोठा भूभाग आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा आयसिसला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय युतीचे सैन्य पुन्हा एकदा इराकमध्ये उतरले. २०१७ मध्ये इराकमध्ये आणि २०१९ मध्ये सीरियामध्ये आयसिसचा प्रादेशिक पराभव झाला. तरीही या अतिरेकी संघटनेच्या उरलेल्या छुप्या गटांचा नायनाट करण्यासाठी युतीचे सैन्य इराकमध्येच तळ ठोकून होते.

परिस्थिती सामान्य होत असताना, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी २०२४ मध्ये त्यांच्या कार्यकाळात बगदादमधून अमेरिकन सैन्य टप्प्याटप्प्याने मागे घेण्याच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. या ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि करारानुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी अमेरिकन सैन्याने अधिकृतपणे इराकमधून आपली पूर्ण माघार पूर्ण केली आहे.

१ ऑक्टोबर ‘सार्वभौमत्व दिन’ आणि इराकपुढील नवी आव्हाने

इराकी प्रशासनाचा असा विश्वास आहे की, परदेशी आघाडीच्या सैन्याची माघार झाल्यामुळे आता स्थानिक अतिरेकी गटांना शस्त्रे बाळगण्याचे किंवा हिंसाचार करण्याचे कोणतेही निमित्त उरणार नाही. चालू वर्षात सत्तेवर आलेले इराकचे नवे पंतप्रधान अली अल-जैदी यांनी घोषणा केली की, अमेरिकन सैन्य बाहेर पडल्यानंतरचा पहिला दिवस म्हणजेच १ ऑक्टोबर हा ‘सार्वभौमत्व दिन’ म्हणून साजरा केला जाईल. इराकच्या कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेच्या प्रमुखांनी या निर्णयाचे स्वागत करत, हा राष्ट्रीय प्रसंग इराकच्या पूर्ण स्वावलंबनाचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या पंतप्रधान अल-जैदी यांचे सरकार विविध बंडखोर आणि सशस्त्र गटांना शस्त्रे आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करत आहे. सुरुवातीला ३० सप्टेंबरची अंतिम मुदत देण्यात आली असली, तरी शस्त्रांच्या नियमनावर वाटाघाटी सुरू असल्याने ती मुदत मागे घेण्यात आली आहे. अनेक शक्तिशाली गटांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला असला, तरी वरिष्ठ राजकारणी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Us completes military withdrawal from iraq baghdad celebrates sovereignty day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • America
  • Islamic Country
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी
1

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
2

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
3

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

अरे वाह… America मध्ये इतिहास रचायला भारत सज्ज; ‘ही’ कंपनी उभारणार सर्वात मोठा Steel Plant, डोनाल्ड ट्रम्प थेट म्हणाले…
4

अरे वाह… America मध्ये इतिहास रचायला भारत सज्ज; ‘ही’ कंपनी उभारणार सर्वात मोठा Steel Plant, डोनाल्ड ट्रम्प थेट म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.