Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Covid 19 : कोरोनाच्या नव्या लाटेची चाहूल? PJ.2.1 खतरनाक व्हेरियंट 8 देशांमध्ये पसरला; जाणून घ्या लक्षणे आणि घ्यायची काळजी

Covid 19 : कोविड-१९ चा एक नवीन प्रकार, पीजे.२.१, सर्वत्र लक्ष वेधून घेत आहे. तो या वर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा ओळखला गेला होता, परंतु आता तो आठ देशांमध्ये पसरला आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, या नवीन प्रकाराच्या स्पाइक प्रोटीनमध्ये एक असामान्य उत्परिवर्तन झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 11, 2026 | 02:25 PM
Covid-19 PJ.2.1 variant Canada Ontario covid variant

Covid-19 PJ.2.1 variant Canada Ontario covid variant

Follow Us
Follow Us:
  • PJ.2.1 व्हेरियंटचा प्रसार
  • जलद संसर्गाचे कारण
  • धोक्याची पातळी व लक्षणे

जगभरात अजूनही कोरोना विषाणूचे संकट पूर्णपणे टळलेले नाही, यातच आता कोविड-१९ (Covid 19) च्या एका नवीन आणि वेगाने पसरणाऱ्या प्रकाराने (Variant) आरोग्य यंत्रणा आणि शास्त्रज्ञांची चिंता वाढवली आहे. ‘PJ.2.1’ असे नाव असलेला हा नवीन उत्परिवर्तित विषाणू सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा ओळखण्यात आलेला हा प्रकार आता एकापाठोपाठ एक अशा तब्बल आठ देशांमध्ये पाय पसरत आहे. उत्तर अमेरिकेपासून ते युरोप आणि आशियापर्यंतच्या प्रवासाने पुन्हा एकदा संसर्गाच्या लाटेची भीती निर्माण केली आहे. या नवीन प्रकाराचा मानवी शरीरावर नेमका कसा परिणाम होत आहे आणि नागरिकांनी कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे, याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

 ‘PJ.2.1’ व्हेरियंट कुठे आणि कसा पसरला? जाणून घ्या सविस्तर

आरोग्य संस्थांच्या अहवालानुसार, या नवीन कोविड स्ट्रेनची सुरुवात कॅनडामधील ओंटारियो प्रांतात झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा संसर्ग आता वेगाने सीमा ओलांडून इतर देशांमध्ये पोहोचला आहे. सध्या अमेरिका, स्पेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल आणि सिंगापूरसह एकूण आठ देशांमध्ये या व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण अधिकृतपणे नोंदवले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था या विषाणूच्या प्रत्येक हालचालीवर आणि त्याच्या वेगाने पसरण्याच्या क्षमतेवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हा विषाणू एका देशातून दुसऱ्या देशात इतक्या कमी वेळात कसा पोहोचला, याचे संशोधन वैज्ञानिक करत आहेत.

 स्पाइक प्रोटीनमधील बदलांमुळे वाढला संसर्ग

‘द जर्नल ऑफ इन्फेक्शन’ (The Journal of Infection) मध्ये प्रकाशित झालेल्या एका प्राथमिक अभ्यासामध्ये यामागचे वैज्ञानिक कारण समोर आले आहे. या अहवालानुसार, PJ.2.1 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये असामान्यपणे जास्त प्रमाणात म्युटेशन्स (उत्परिवर्तने) झाली आहेत. स्पाइक प्रोटीन हा विषाणूचा तो मुख्य भाग असतो, ज्याच्या मदतीने तो मानवी शरीरारोग्य पेशींमध्ये सहजगत्या प्रवेश करतो. या नवीन बदलामुळे हा विषाणू मानवी पेशींच्या ‘ACE2 रिसेप्टर’शी अधिक वेगाने आणि मजबуतीने जोडला जातो. इतर जुन्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत हा मानवी पेशींमध्ये खूप सहजासहजी शिरकाव करू शकतो, ज्यामुळे याचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने होतो. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे हा विषाणू लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजला पूर्णपणे हुलकाणी देण्यास सक्षम असल्याचे कोणतेही पुरावे संशोधकांना अद्याप सापडलेले नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात नेमकं चाललंय काय? इम्रान खाननंतर आता माजी परराष्ट्रमंत्री कोसळले, हातांना आणि पायांना दुखापत

 लक्षणे आणि किती धोकादायक आहे हा नवीन प्रकार?

लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हा नवा प्रकार किती जीवघेणा आहे? यावर वैद्यकीय तज्ज्ञांचे स्पष्ट म्हणणे आहे की, कोविड महामारीच्या सुरुवातीच्या काळात जसे गंभीर आजार, ऑक्सिजनची गरज किंवा मृत्यूचे प्रमाण पाहायला मिळायचे, तशी भीती सध्या तरी या नवीन प्रकारामुळे नाही. हा नवीन प्रकार पूर्वीच्या omicron किंवा इतर अलीकडील सब-व्हेरिएंट्सपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झालेले नाही.

तथापि, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमकुवत आहे किंवा जे आधीपासूनच इतर गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी मात्र हा त्रासदायक ठरू शकतो. या व्हेरिएंटची लागण झाल्यास प्रामुख्याने सामान्य सर्दी, खोकला, अंगदुखी आणि हलका ताप यांसारखी फ्लू सारखीच लक्षणे दिसून येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, वरवर पाहता याची लक्षणे साध्या सर्दीसारखीच असतात, त्यामुळे अचूक निदान करण्यासाठी अँटीजेन चाचणी किंवा जीनोमिक सिक्वेन्सिंग करणेच उत्तम ठरते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : North Korea : किम जोंग उनच्या घराण्यात मुलगी विरुद्ध बहीण; उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जाणार?

 भारतीयांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?

जरी या नवीन प्रकारामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचा किंवा जास्त गंभीर आजार झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसला, तरी त्याची अतिशय वेगाने पसरण्याची क्षमता ही धोक्याची घंटा मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, यावर घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही, परंतु निष्काळजीपणा करणे महागात पडू शकतो.

स्वसंरक्षणासाठी काही साध्या गोष्टी पाळणे गरजेचे आहे:

  • गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्या: बाजारपेठ, सार्वजनिक वाहने किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना चेहऱ्यावर मास्क आवर्जून लावा.
  • स्वतःला आच्छादित किंवा विलगीकरणात ठेवा: जर तुम्हाला हंगामी फ्लू, घसा खवखवणे किंवा सर्दीची लक्षणे दोन दिवसांपेक्षा जास्त काळ जाणवत असतील, तर घराबाहेर पडणे टाळा आणि स्वतःला काही दिवस विलगीकरणात ठेवा.
  • वेळेवर चाचणी करा: लक्षणे अंगावर न काढता नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविड चाचणी करून घ्या, जेणेकरून वेळेवर योग्य उपचार मिळू शकतील.

सतर्कता आणि योग्य ती स्वच्छता बाळगून आपण या नवीन संकटापासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोविड-१९ च्या नवीन प्रकाराचे नाव काय आहे?

    Ans: कोविड-१९ च्या या नवीन उत्परिवर्तित (Mutated) प्रकाराचे नाव PJ.2.1 असे आहे.

  • Que: हा नवा PJ.2.1 व्हेरियंट प्रथम कुठे आणि कधी आढळला?

    Ans: हा व्हेरियंट या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वप्रथम कॅनडातील ओंटारियो येथे ओळखला गेला होता.

  • Que: PJ.2.1 व्हेरियंटची प्रमुख लक्षणे कोणती आहेत?

    Ans: याची लक्षणे प्रामुख्याने सामान्य सर्दी, खोकला, अंगदुखी आणि फ्लू सारखीच आहेत, जी पूर्वीच्या कोविड प्रकारांसारखीच आढळतात.

Web Title: Covid 19 new variant pj 2 1 spreads 8 countries symptoms hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Covid-19 Update
  • WHO
  • World news

संबंधित बातम्या

Italy Capri double waterspout : इटलीच्या समुद्रात घडली अद्भूत घटना, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ ‘डबल वॉटरस्पाउट’, VIDEO VIRAL
1

Italy Capri double waterspout : इटलीच्या समुद्रात घडली अद्भूत घटना, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ ‘डबल वॉटरस्पाउट’, VIDEO VIRAL

Board Exam 2027: 12वीच्या अकाउंटन्सी परीक्षेत कॅल्क्युलेटर वापरता येणार? दिल्ली उच्च न्यायालयाची CBSE आणि केंद्र सरकारला नोटीस
2

Board Exam 2027: 12वीच्या अकाउंटन्सी परीक्षेत कॅल्क्युलेटर वापरता येणार? दिल्ली उच्च न्यायालयाची CBSE आणि केंद्र सरकारला नोटीस

Strait of Hormuz : होर्मुझमधील 3 तेलवाहू जहाजांमध्ये प्रचंड स्फोट; इराणचे थेट भाष्य, ‘आमच्या मार्गात आलात तर…’
3

Strait of Hormuz : होर्मुझमधील 3 तेलवाहू जहाजांमध्ये प्रचंड स्फोट; इराणचे थेट भाष्य, ‘आमच्या मार्गात आलात तर…’

North Korea : किम जोंग उनच्या घराण्यात मुलगी विरुद्ध बहीण; उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जाणार?
4

North Korea : किम जोंग उनच्या घराण्यात मुलगी विरुद्ध बहीण; उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जाणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.