Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पचा ॲरिझोनामध्ये विजय: रिपब्लिकनने सातही स्विंग राज्ये केली काबीज, नवीन आकेडवारी समोर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्र्म्प यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच डोनाल्ड ट्र्म्प यांनी ॲरिझोनामध्येही विजय मिळवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2024 | 11:32 AM
ट्रम्पचा ॲरिझोनामध्येही विजय: रिपब्लिकनने सातही सिंग राज्ये केली काबीज, नवीन आकेडवारी समोर

ट्रम्पचा ॲरिझोनामध्येही विजय: रिपब्लिकनने सातही सिंग राज्ये केली काबीज, नवीन आकेडवारी समोर

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्र्म्प यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. आता आणखी एक नवीन आकडेवारी समोर आली आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांनी ॲरिझोनामध्येही विजय मिळवला आहे. या विजयासह रिपब्लिकन पक्षाने सातही स्विंग राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. याआधीही 2020 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी ॲरिझोना मध्ये विजय मिळवला होता. मात्र आता ट्रम्प यांनी हे राज्य जिंकत आपला प्रभाव कायम ठेवला आहे.

2016 च्या निवडणुकीत मिळालेल्या 304 मतांच्या आकड्यापेक्षा अधिक

ताज्या आकडेवारीनुसार, ट्रम्प यांना या निवडणुकीत 312 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. हा आकडा ट्रम्प यांना 2016 च्या निवडणुकीत मिळालेल्या 304 मतांच्या आकड्यापेक्षा अधिक आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी किमान 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते. यामुळे ट्रम्प यांच्या या यशाने रिपब्लिकन पक्षाचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. तर दुसरीकडे, या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार कमला हॅरिस यांना केवळ 226 इलेक्टोरल मते मिळाली आहेत.

हे देखील वाचा- ‘ट्रम्प समर्थकांशी लग्न-प्रेम करणार नाही’; अमेरिकन महिलांची डोनाल्ड ट्रम्प विरोधात चळवळ

सातही स्विंग राज्यावर रिपब्लिकन पक्षाला विजय

मीडिया रिपोर्टनुसार, रिपब्लिकन पक्षाने यावेळी मिशिगन, जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, विस्कॉन्सिन, आणि ऍरिझोनासह स्विंग राज्यांवर नियंत्रण मिळवत, नेवाडा आणि नॉर्थ कॅरोलिनासारखी महत्त्वाची राज्येही जिंकली आहेत. या विजयामुळे अमेरिकेत मोठ्या राजकीय उलथापालथी घडवून आणणारे परिणाम दिसू लागले आहेत. ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वाढ होत असून रिपब्लिकन पक्षाच्या पुढील धोरणांवरही याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

सिनेटवरही रिपब्लिकन पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने 52 जागा जिंकल्या आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे 47 जागा आहेत. प्रतिनिधीगृहात बहुमत मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या रिपब्लिकन पक्षाने 216 जागा जिंकल्या आहेत, बहुमतासाठी त्यांना केवळ दोन जागांची आवश्यकता आहे. हे यश रिपब्लिकन पक्षाच्या आगामी धोरणांसाठी निर्णायक ठरणार आहे.

या मुद्द्यांवर दिला भर

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान सीमा सुरक्षा, इमिग्रेशन आणि बेकायदेसीर घुसखोरी या मुद्यांवर भर दिला होता. तसेच अमेरिकेत वाढत्या अवेध स्थलांकरांमुळे आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे ट्रम्प यांच्या अनेक सभांमधून बोलले गेले. ट्रम्प यांच्या आश्वासनानुसार, सत्तेत परतल्यास त्यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेला सुमारे 10 हजार सैनिकांची सुरक्षा दिली जाईल.

तसेच अवैध स्थलांतरितांवर कठोर कारवाई केली जाईल. या विजयासह डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारीला शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाने मिळवलेले हे यश अमेरिकेच्या पुढील राजकीय वातावरणासाठी निर्णायक ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हे देखील वाचा- युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; मॉस्कोच्या शस्त्रास्त्र कारखान्यावर ड्रोनचा कहर

Web Title: Us election 2024 donald trump wins arizona too republican hold 7 swing states new report nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 11:32 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.