फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पने दणदणीत विजय नोंदवला. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र अमेरिकेतून एक विचित्र घटना समोर आहे. अमेरिकन मुलींनी एक अजब चळवळ चालवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदारमतवादी महिलांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान दिलेल्या पुरूषांशी लग्न करू नका आणि प्रेम करू नका असे तरूणींना आवाहन केले आहे.
ट्रम्प समर्थक पुरुषांशी नातेसंबंध टाळण्याचा निर्णय
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे उदारमतवादी महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन महिलांनी एक अनोखी चळवळ सुरू केली आहे. या चळवळीमध्ये त्यांनी ट्रम्प समर्थक पुरुषांशी नातेसंबंध टाळण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलांचा दावा आहे की, ज्या पुरुषांनी ट्रम्प यांना मतदान केले आहे, त्यांच्याशी त्या कोणत्याही प्रकारचे भावनिक, शारीरिक किंवा सामाजिक नाते ठेवणार नाहीत. विशेष म्हणजे, पुढील चार वर्षांसाठी ही शपथ घेण्यात आली आहे, यामुळे अमेरिकेत सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा- बलुचिस्तानमध्ये क्वेटा रेल्वे स्थानकावर आत्मघाती विस्फोट; 21 ठार तर 30 जखमी
‘4B चळवळ’
मिळालेल्या माहितीनुसार,या चळवळीला ‘4B चळवळ’ म्हणून ओळखले जाते. “4B” या शब्दाचा अर्थ आहे सेक्स नाही, डेटिंग नाही, लग्न नाही आणि पुरुषांसोबत मुलेही नाहीत सर्व.सोशल मीडियावर महिलांनी या विषयावर व्हिडिओ पोस्ट करून समर्थन दर्शवले आहे. काही महिलांनी डेटिंग ॲप्स हटवण्याचे आवाहन केले आहे. तर, काहींनी ब्रह्मचर्याचा अवलंब करण्याची घोषणा केली आहे. या चळवळीचे समर्थन करताना महिलांचा असा दावा आहे की, यामुळे लिंग समानतेचे नवीन परिमाण ठरवले जाईल.
कोरियन स्त्रीवादी चळवळींपासून प्रेरणा
अहवालानुसार, ट्रम्प यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यास उदारमतवादी महिलांनी लैंगिक संपावर जाण्याचे ठरवले होते. या महिलांच्या मते, ट्रम्प यांच्या विरोधातील हा असंतोष त्यांच्या महिलाविरोधी धोरणांवर आधारित आहे. विशेष करून, गर्भपाताचे हक्क आणि महिलांच्या संरक्षणाच्या मुद्द्यांवरून या चळवळीचा जन्म झाला आहे. या चळवळीला कोरियन स्त्रीवादी चळवळींपासून प्रेरणा मिळाली आहे. या टवलीत स्त्रिया आपले हक्क साध्य करण्यासाठी याचप्रकारे संघर्ष करतात.
सामाजिक बदलासाठी
कमला हॅरिस यांचा पराभव झाल्यानंतर आणि ट्रम्प यांचे पुनरागमन झाल्यानंतर या चळवळीत आणखी जोमाने सहभागी होण्याची प्रेरणा महिलांना मिळाली आहे. हे पाऊल केवळ राजकीय नसून सामाजिक बदलासाठीचे आहे, अशी त्यांची भूमिका आहे. अमेरिकेत महिलांच्या या नव्या विरोधी चळवळीची जोरदार चर्चा सुरू असून, समाजात मोठ्या प्रमाणावर याचे पडसाद उमटत आहेत.
हे देखील वाचा- उत्तरी गाझामध्ये इस्त्रायलची हल्ल्यांची मालिका सुरूच; बॉम्बफेकमध्ये 10 जणांचा मृत्यु