US-EU Trade Deal America's Will impose 15 percent tariff on European Union
वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्कॉटलॅंडच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) मध्ये एक मोठा व्यापार करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या बहुतांश वस्तुंवर केवळ १५% कर लादणार आहे. यामध्ये कार, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश आहे. यामुळे युरोपियन युनियन आणि अमेरिकेतील व्यापारी भागीदारीला चालना मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
याबदल्यात युरोपियन युनियन येत्या तीन वर्षात अमेरिकेकडून ७५० अब्ज डॉलर्सची उर्जा खरेदी करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्कॉटलंडदौऱ्यादरम्यान याची घोषणा केली आहे. EU चे अध्यक्ष वर्सुला वॉन डेरा यांच्यासौबत ट्रम्प यांनी बैठक घेतली. या बैठकीत अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापार कराराचा पहिला टप्प्यावर हा निर्णय घेण्यातआला आहे.
याशिवाय युरोपियन युनियनअमेरिकेत ६०० अब्ज डॉलर्स म्हणजेच ५१ लाख कोटी रुपये गुंतवणार आहे. अमेरिकेच्या फार्मा, ऑटो आणि संरक्षण क्षेत्रात ही गुंतवणूक केली आहे. तसेच या व्यापार कराराअंतर्गत विमाने, विमानांचे पार्ट्स, सेमीकंडक्टर उपकरणे, कृषी उत्पादने आणि जेनेरिक मेडिसिन्सवरील कर पूर्णत: रद्द केला जाणार आहे. मात्र स्टील आणि ॲल्युमिनियमवरील कर ५०% राहणार आहे.
अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये गेल्या ७ महिन्यांपासून ही चर्चा सुरु होती. युरोपियन युनियनने कोणत्याही महत्वपूर्ण सवलती देण्यास नकार दिला होता. यामुळे ट्रम्प यांनी ३०% कर लादण्याची धमकी दिली होती. यानंतर युरोपियन युनियने माघार घेत अमेरिकेसोबत व्यापार करार केला.
यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. युरोपियन युनियन जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था असून यामध्ये २७ देशांचा समावेश आहे. या देशांमधून जवळपास ३.५ अब्जाचा व्यापर रोज होतो. यामुळे हा करार अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. सध्या युरोपियन युनियनमधील मेक्सिको हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ युरोपियन देशांवरच नव्हे, भारत, बांगलादेश, चीन यांसारख्या अनेक देशांवर कर लादले आहे. सध्या भारतही अमेरिकेसोबत व्यापार कारारावर वाटाघाटीची चर्चा करत आहे. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाण होत आहे. अमेरिका फर्स्ट धोरणांमुळे अमेरिका जागतिक व्यापारात अधिक आक्रमक भूमिका घेत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.