US Government shutdown enters 6th day trump negotiating with democrate
America Shutdown update in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) सरकारी कामकाज ठप्प होण्याचा सहावा दिवस सुरु आहे. परिस्थिती तणापूर्ण असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) गोंधळात आहेत. यामुळे लाखो सरकारी कर्मचारी प्रभावित झाले आहेत. यावर लवकर उपाय काढण्यात आला नाही तर, सरकारी कर्मचारी, नागरिक आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. या शटडाउनमुळे सध्या ७,५०,००० सरकारी कर्चारी पगाराशिवाय सुट्टीवर आहेत.
फंडिग बिल पास न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या शटडाऊनमुळे डोनाल्ड ट्रम्प चिंतेत असून त्यांनी डेमोक्रॅट्स चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. डेमोक्रॅट्स पक्षाने कोव्हिड महामारीच्या काळात दिल्या गेलेल्या हेल्थ केअर सबसिडी वाढवण्याची मागणी केली आहे. पण याला नकार दिला आहे.
ट्रम्प यांनी यामुळे सरकारला जास्त खर्च करावा लागेल ज्याचा इतर क्षेत्रांवर परिणाम होईल असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मते डेमोक्रॅट्स मुळे सरकारी कामकाज बंद पडले आहे. पण ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्स सोबत आरोग्य धोरणांवर आणि इतर मुद्यांवर चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे.
ट्रम्प यांच्या बिग ब्युटीफुल धोरणात आरोग्य सेवांमधील नागरिकांच्या खर्चात कपात करण्यात आली आहे. याला डेमोक्रॅट्सने विरोध केला आहे. त्यांनी ही कपात रद्द करण्याची मागणी करत अवैध प्रवाशांसाठी आरोग्य सेवांमध्ये निधी देण्याचीही मागणी केली आहे. अमेरिकेत दरवर्षी १ ऑक्टोबरपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होते. याआधी निधी विधेयक मंजूर होणे महत्त्वाचे असते. ट्रम्प यांच्या निधी विधेयकाला सिनेटमध्ये केवळ ५४ मते मिळाली आहे, अजून ८ मते मिळाल्यास ट्रम्प यांचे निधी विधेयक मंजुर होईल.
ट्रम्प प्रशासनाने डेमोक्रॅट्स समकर्थ १६ राज्यांचा २६ अब्ज डॉलर्स निधी राखथला आहे. यामध्ये वाहतूक प्रकल्पांसाठी १८ अब्ज डॉलर्स समाविष्ट आहेत. तसेच हवाई वाहतूक नियंत्रण भरती आणि प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. शटडाउन असेच सुरु राहिले तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे अमेरिकेतील सात वर्षानंतरचे शटडाऊन आहे. यापूर्वी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ३५ दिवसांसाठी शटडाऊन सुरु होते. हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि लांब शटडाऊन आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. अमेरिकेत किती दिवसांपासून सुरु आहे शटडाऊन?
गेल्या सहा दिवसांपासून अमेरिकेत शटाडऊन सुरु आहे.
प्रश्न २. अमेरिकेत का सुरु आहे शटडाऊन?
ट्रम्प प्रशासनाचे निधी विधेयक मंजुर न झाल्याने अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे.
प्रश्न ३. अमेरिकेतील शटडाऊनमुळे किती लोक प्रभावित?
या शटडाऊनमुळे अमेरिकेतील ७,५०,००० सरकारी कर्मचारी प्रभावित झाले आहेत.
प्रश्न ४. शटडाऊन हटवण्यासाठी ट्रम्प काय प्रयत्न करत आहेत?
शटडाऊन हटवण्यासाठी ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्स पक्षाशी आरोग्य धोरणांवर आणि इतर मुद्यांवर चर्चेची तयारी दर्शवली आहे.