America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America Shutdown : वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेत मोठे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प फंडिंग बिल पास करण्यात चौथ्यांदा अपयशी ठरले आहेत. हे बिल पास होण्यासाठी ६० मतांची आवश्यकता असते, पण सिनेटमध्ये या बिलाला केवळ ५४ मते मिळाली आहेत. यामुळे सरकारला आवश्यक निधी मिळू शकलेला नाही. यामुळे अमेरिकेत सर्वत्र सरकारी कामकाज ठप्प झाले आहे.
मंगळवारी (३० सप्टेंबर) मतदान झाल्यानंतर बुधवारी(०१ ऑक्टोबर) अमेरिकेत शटडाऊन सुरु झाले होते. आता हे शटडाऊन १४ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या फडिंग बिलाला डेमोक्रॅट्स पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला आहे. डेमोक्रॅट पक्षाने मागणू केली आहे की, कोव्हिड महामारीच्या काळात दिल्या गेलेल्या हेल्थ केअर सबसिडी (Tax Credit) वाढवण्यात याव्या. यामुळे लाखो अमेरिकन नागरिकांना परवडणारा आरोग्य विमा मिळू शकले. मात्र ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने याला विरोध करत, सबसिडी वाढवली तर सरकारला जास्त खर्च करावा लागेल ज्यामुळे इतर विभागांवर याचा विपरीत परिणाम होईल.
अमेरिकेत सध्या साडेसात लाख सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. यातील तीन लाख कर्माचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या केवळ काही आवश्य सेवा सुरु आहेत. लष्करी कर्मचारी, सीमा एजंट आणि हवाई वाहतूक नियंत्रक. पण यांना देखील विनावेतन काम करावे लागत आहे.
या शटडाउनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. अनेक शासकीय सेवा थांबल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने यासाठी डेमोक्रॅट्स पक्षाला जबाबदार धरले आहे. मात्र डेमोक्रॅट्स पक्षाने ट्रम्प आरोग्य विषयक योजना सुरक्षित करत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेत दरवर्षी १ ऑक्टोबरपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होते. याआधी निधी विधेयक मंजूर होणे महत्त्वाचे असते. पण दोन्ही पक्षात निधी विधेयकावर एकमत होऊन ते मंजूर झाले नाही, तर शटडाऊन लागू होते. ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात २०१९ मध्ये सलग ३५ दिवस सरकारी कामकाज ठप्प झाले होते.
काही तज्ज्ञांच्या मते, या लहान कालावधीच्या शटडाऊनचा ट्रम्प यांना राजकीय फायदा होऊ शकतो. ट्रम्प आपल्या अजेंड्यानुसार आवश्यक आणि अनावश्यक सेवा ठरवू शकतात. मात्र यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच याचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेच्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर होत आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. अमेरिकेत का सुरु आहे शटडाऊन?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सादर केलेल निधी विधेयक (Funding Bill) सिनेटमध्ये केवळ ५४ मते मिळाल्याने पास झालेले नाही, यामुळे शटडाऊन सुरु आहे.
प्रश्न २. अमेरिकेत निधी विधेयक मंजूर होण्यासाठी किती मतांची आवश्यकता असते?
अमेरिकेत निधी विधेयक मंजूर होण्यासाठी ६० किंवा त्याहून अधिक मतांची आवश्यकता असते.
प्रश्न ३. अमेरिकेच्या डेमोक्रॅट पक्षाने रिपब्लिकन पक्षाकडे निधी विधेयकासाठी काय मागणी केली आहे?
रिपब्लिकन पक्षाने सादर केलेल्या निधी विधेयकाला डेमोक्रॅट्सने विरोध केला आहे. त्यांनी विधेयकात कोव्हिड महामारीच्या काळात दिल्या गेलेल्या हेल्थ केअर सबसिडी (Tax Credit) वाढवण्यात याव्या अशी मागणी केली आहे.
प्रश्न ४. रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट्सच्या मागणीवर काय म्हटले आहे?
रिपब्लिकनने डेमोक्रॅट्सची मागणी मान्य करण्यास नकार देत. सबसिडी वाढवल्यास सरकारला जास्त खर्च करावा लागेल ज्यामुळे इतर विभागांवर याचा विपरीत परिणाम होईल, असे म्हटले.
अखेर युद्ध संपणार! गाझातील योजनेला हमासची मंजुरी मिळताच ट्रम्पचे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश