Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्याची भीती होती तेच झालं! इराणवर अमेरिकेचा पुन्हा हल्ला; केशम बेटावर गुप्त कारवाई, ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेने चिंता वाढली

US Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने सोमवारी इराणच्या केशम बेटावर गुप्त आणि मर्यादित हल्ला केल्याचे वृत्त 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राजनैतिक चर्चा आणि तणाव कमी करण्याचे संकेत दिले जात....

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 03, 2026 | 03:00 PM
ज्याची भीती होती तेच झालं! इराणवर अमेरिकेचा पुन्हा हल्ला; केशम बेटावर गुप्त कारवाई, ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेने चिंता वाढली

ज्याची भीती होती तेच झालं! इराणवर अमेरिकेचा पुन्हा हल्ला; केशम बेटावर गुप्त कारवाई, ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेने चिंता वाढली

Follow Us
Follow Us:
  • ज्याची भीती होती तेच झालं!
  • इराणवर अमेरिकेचा पुन्हा हल्ला
  • केशम बेटावर गुप्त कारवाई
  • ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेने चिंता वाढली
US Iran War: मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमेरिकेने सोमवारी, 2 नोव्हेंबर रोजी इराणच्या केशम बेटावर मर्यादित लष्करी हल्ला केल्याची माहिती समोर आली. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने अमेरिकन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणसोबत राजनैतिक चर्चा आणि संभाव्य कराराचे संकेत दिले जात असतानाच ही कारवाई करण्यात आली.

केशम बेटावर नेमके काय घडले?

इराणच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात केशम बेट आहे. या बेटाचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक तेल वाहतुकीचा मोठा हिस्सा जात असल्याने या परिसरातील कोणतीही लष्करी हालचाल आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची ठरते.

Helicopter Accident: एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान मोठी दुर्घटना; नेपाळमधील हेलिकॉप्टर अपघातात भारतीय नागरिक दगावला!

इराणच्या सरकारी माध्यमांनी केशम बेटावर अनेक स्फोट झाल्याची माहिती समोर आली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला मर्यादित आणि बचावात्मक कारवाई असे संबोधले आहे. अमेरिकेने इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेतील क्षेपणास्त्रांशी संबंधित लक्ष्यांवर कारवाई केल्याचेही समोर आले आहे.

ट्रम्प यांची दुहेरी भूमिका चर्चेत

एकीकडे ट्रम्प प्रशासन इराणसोबत संभाव्य करार आणि राजनैतिक चर्चेच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे संकेत देत आहे. दुसरीकडे, इराणच्या लष्करी क्षमतेवर मर्यादा आणण्यासाठी अमेरिकेकडून गुप्त आणि मर्यादित हल्ले करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. या कारवाया सार्वजनिकरीत्या जाहीर न करण्यामागे मोठ्या प्रमाणावर युद्ध पुन्हा सुरू करण्याचा संकेत टाळण्याचा उद्देश असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अमेरिकेच्या धोरणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मध्यपूर्वेतील सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम

होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या परिसरात अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढल्यास तेल वाहतूक, व्यापारी जहाजांची सुरक्षा आणि जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होऊ शकतो. केशम बेटावरील हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याऐवजी पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर युद्ध पुन्हा सुरू झाले आहे, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक चर्चांना कितपत यश मिळते, तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरक्षा परिस्थिती कशी बदलते, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेत आज मध्यावधी निवडणुका; संसदेतील 435 आणि सिनेटमधील 35 जागांसाठी मतदान होणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणवर कुठे हल्ला केला?

    Ans: अमेरिकेने सोमवारी, 2 नोव्हेंबर 2026 रोजी इराणच्या केशम बेटावर मर्यादित लष्करी हल्लाची माहिती समोर आली.

  • Que: अमेरिकेने केशम बेटावर हल्ला का केला?

    Ans: अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई बचावात्मक स्वरूपाची होती. इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेतील क्षेपणास्त्रांशी संबंधित लक्ष्यांवर कारवाई करण्यात आली.

  • Que: केशम बेटावरील हल्ल्यामुळे मध्यपूर्वेत युद्ध पुन्हा सुरू होणार का?

    Ans: सध्या मोठ्या प्रमाणावर युद्ध पुन्हा सुरू झाल्याची अधिकृत घोषणा नाही. मात्र, अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे मध्यपूर्वेतील सुरक्षा परिस्थिती नाजूक बनली आहे.

Web Title: Us strikes iran keshm island trump diplomacy middle east tensions sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Donald Trump
  • iran
  • US Iran war

संबंधित बातम्या

अमेरिकेत आज मध्यावधी निवडणुका; संसदेतील 435 आणि सिनेटमधील 35 जागांसाठी मतदान होणार
1

अमेरिकेत आज मध्यावधी निवडणुका; संसदेतील 435 आणि सिनेटमधील 35 जागांसाठी मतदान होणार

H-1B Visa : अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! व्हिसा एक्स्टेंशनचे नियम होणार कडक
2

H-1B Visa : अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! व्हिसा एक्स्टेंशनचे नियम होणार कडक

Strait Of Hormuz: सौदी-इराण वादाची किनार; इराण जलक्षेत्रातून जाणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांमध्ये भूसुरुंगाला धडकून भीषण स्फोट
3

Strait Of Hormuz: सौदी-इराण वादाची किनार; इराण जलक्षेत्रातून जाणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांमध्ये भूसुरुंगाला धडकून भीषण स्फोट

US News: ‘मेडे, मेडे’चा तो शेवटचा कॉल; ट्रम्प यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर विमान कोसळून 9 ठार, हवाई संरक्षण यंत्रणा तैनात
4

US News: ‘मेडे, मेडे’चा तो शेवटचा कॉल; ट्रम्प यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर विमान कोसळून 9 ठार, हवाई संरक्षण यंत्रणा तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.