US withdraws from UNESCO, Donald Trump accuses it of discriminating against Israel
वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघटना युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंगळवारी (२२ जुलै) या निर्णायाची माहिती दिली. यामागचे कारण देताना ट्रम्प प्रशासनाने युनेस्को संघटना राष्ट्रीय हिताच्या विरोधात काम करते आणि इस्रायविरोधी विचारसरणीची आहे, या कारणामुळे अमेरिका युनेस्कोमधून बाहरे पडत आहे. असे ट्रम्प प्रशासाने सागंतिले.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी सोशल मीडियावर यांदर्भात माहिती दिली. त्यांनी आपल्या एक्सवसरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडत आहे. अमेरिकेचा विश्वास आहे की, ही संस्था आता निष्पक्षतेच्या मार्गापासून दूर गेली आहे.
Today, the United States announced our decision to withdraw from UNESCO. Like many UN organizations, UNESCO strayed from its founding mission. Going forward, U.S. participation in international organizations must make America safer, stronger, and more prosperous.
— Tammy Bruce (@statedeptspox) July 22, 2025
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युनेस्कोवर गंभीर आरोप केले आहे. ट्रम्प यांच्या मते, युनेस्को इस्रायलविरोधी धोरणाचा अवलंब करत आहे. एकतर्फी वृत्ती युनेस्कोने स्वीकारली असून इस्रायलचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अधिकार नाकारले आहे. यामुळे पुढी वर्षी डिसेबंर पासून अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडेल. इस्रायलविरोधी प्राचर केंद्र बनल्याचा आरोप या संघनेवर करण्यात आला आहे.
शिवाय युनेस्कोने पॅलेस्टाईला संघटनेचे पूर्ण सदस्यत्व दिले आहे. यामुळे देखील ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी म्हटले आहे की, युनेस्कोने पॅलेस्टाईनला सदस्यत्व देणे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधात नाही, तर संघटनेत इस्रायलविरोधी प्रवृत्तींना पाठिंबा देणे आहे. हा निर्णय अत्यंत चिंताजनक आणि समस्याप्रधान असल्याचे वर्ण ब्रूस यांनी केले आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या या निर्णयावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, विज्ञान, महासागर, शिक्षण, संस्कृती आणि जागतिक वारसांचे सर्वात्रिक संरक्षण म्हणून फ्रान्सचा युनेस्कोला पूर्ण पाठिंबा राहील. अमेरिकेच्या बाहेर पडण्याने आमचा संकल्प आणि या मोहिमेतील लोकांचे मनोबल कमी होणार नाही.
युनेस्कोमधून अमेरिकेने तिसऱ्यांदा माघार घेतली आहे. यापूर्वी देखील ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात युनेस्को सोडण्याची घोषणा केली होती. २०१८ मध्ये अमेरिका संघटनेतून बाहेरही पडला होता. मात्र, बायडेन प्रशानाच्या काळात अमेरिकेचा पुन्हा एकदा युनेस्कोमध्ये सहभाग झाला. तसेच १९८० च्या दरम्यान देखील तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी देखील येनेस्कोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी देखील संघटनेवर भ्रष्टाचाराचा आणि सोव्हिएत युनियनला समर्थन केल्याचा आरोप केला होता.