इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहम्मद रजा सादिघी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान : गेल्या महिन्यात इराण आणि इस्रायलमध्ये मोठा लष्करी संघर्ष झाला होता. १२ दिवसांच्या या संघर्षाने संपूर्ण मध्य पूर्वेत अस्थिरता निर्माण झाली होती. इराणच्या अणु कार्यक्रमाविरोधात इस्रायलने हल्ले सुरु केले होते. या संघर्षादरम्यान इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलने इराणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या केली आहे. यामध्ये अणु शास्त्रज्ञांची देखील हत्या करण्यात आली आहे. यामुळे इराणच्या अणु प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे.
शिवाय अमेरिकेच्या अणु केंद्रांवरील हल्ल्याने देखील इराणचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान एक मोठी माहिती समोरआली आहे. इराणच्या अणु प्रकल्पावर कार्य करणाऱ्या एका मोठ्या वरिष्ठ अणु शास्त्रज्ञाची हत्या देखील इस्रायलने केली आहे. एका क्षेपणास्त्र हल्ल्यात इराण अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याचे इराण इंटनॅशनलने म्हटले आहे. हा इराणच्या अणु प्रकल्पासाठी मोठा धोका मानला जात आहे.
इराण इंटरनॅशनलने दिलेल्या अहवालानुसार, युद्धविराम होण्याच्या तीन तास आधी इराणच्या वरिष्ठ अणु शास्त्रज्ञाची हत्या करण्यात आली होती. अणुशास्त्रज्ञ मोहम्मद रजा सादिघी यांना तीन लक्ष्य करण्यात आले होते. त्यांच्यावर क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला होता. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या अणुबॉम्बची सर्वात मोठी साखळी म्हणून रझा सादिघी यांना ओळखले जायचे.
मात्र त्यांच्या हत्येने इराणला मोठा धक्का बसला आहे. इराणच्या गुप्त अणु प्रकल्पात त्यांचा मोठी भूमिका होती. युद्धाच्या पहिल्या दिवशी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. परंतु त्यावेळी सादिघी थोडक्यात बचावले. मात्र, युद्धविराच्या एक दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्यात त्यांचा बळी गेला. तेहरानवरील गिलान प्रांतात झालेल्या हल्लात त्यांची हत्या करण्यात आली.
इराणने त्यांचे काम अनेक काळापासून पूर्णपणे गुप्त ठेवले होते. अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ लसीच्या विकासात त्यांना प्रमुख संशोधक म्हणून ओळख करुन देण्यात आली होती. याव्यतिरिक्त त्यांची सर्व माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. इराणच्या अणु प्रकल्पाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घरातील सदस्यांना देखील त्यांच्या कामाची कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. यामुळे त्यांची माहिती लीक होऊन त्यांची हत्या झाल्याने इराणला मोठा धक्का बसला आहे.
त्यांनी इराणीच्या जर्नलसमध्ये स्फोटके आणि अण्वस्त्रांच्या विकासावर कामे केली आहेत. याचे अहवाल देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. १९७४ मध्ये गिलान प्रांतातील गावात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी अणु इंजिनियरींगमध्ये आपली डॉक्टरेट पदवी घेतली होती. तेहरानच्या अश्कार युनिव्हर्सिटीमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते.
दरम्यान त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इस्रायलच्या हल्ल्यात आणखी ८ अणु शास्त्रज्ञ मारले गेले आहेत.