१. अमेरिकेने भारतावर लादला २५ टक्के टॅरिफ
२. अमेरिकेने पाकिस्तानसोबत व्यापारी करार केल्याचे समजते आहे.
३. कदाचित पाकिस्तान भारताला तेल विकेल असे ट्रम्प म्हणाले आहेत.
काल अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ (Tarrif) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशिया आणि चीनसोबत व्यापार करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान भारतावर २५ टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा धक्का दिल्याचे म्हटले जात आहे. कारण अमेरिकेने पाकिस्तानबरोबर एक व्यापारी करार केल्याचे समजते आहे.
अमेरिका पाकिस्तानसोबत व्यापार करणार?
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यावर एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिका पाकिस्तानसोबत व्यापार करण्याची शक्यता आहे. दक्षिण आशियामध्ये तेलाचे साठे निर्माण करण्यासाठी अमेरिका भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानबरोबर काम करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाकिस्तानला तेलाचे साठे शोधण्यासाठी मदत करू असे सांगितल्याचे म्हटले जात आहे. एक दिवस असाही येईल की पाकिस्तान (pakistan) भारताला तेल विकेल, असे देखील ट्रम्प म्हणाले होते.
व्हाईट हाऊस करार करण्यात व्यस्त
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दक्षिण कोरियातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांशी आमची बैठक होणार असल्याचे सांगितले. दक्षिण कोरियावर २५ टक्के टॅरिफ आहे. मात्र तो कमी करण्यासाठी त्यांच्याकडे एक प्रस्ताव आहे. मला उत्सुकता आहे की, त्यांच्याकडे कोणता पर्याय आहे. तसेच आज व्हाईट हाऊस व्यापारी करार करण्यात खूप व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक देश त्यांच्यावरील टॅरिफ कमी करण्याची मागणी घेऊन आमच्याकडे येत आहेत. आम्ही त्यांचा प्रस्ताव पाहून योग्य तो निर्णय घेऊ. मेक अमेरिका ग्रेट अगेन.. अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प?
भारत रशियासोबत किती व्यापार करतो, यामुळे मला काहीही फरक पडत नाही. दोन्ही देशांमध्ये काही ठीक सुरु नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशिया आणि चीनसोबत व्यापार करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. रशियाचे ते सर्वात मोठे खरेदीदार आहेत. त्यामुळे भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे.
रशिया आणि भारताचे फार जुने संबंध आहे. भारत आणि राहसीय खुले मित्र आहेत. रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणात व्यापार करतो. संरक्षण क्षेत्रातील खरेदी भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून करताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आता याच मैत्रीमुळे ट्रम्प नाराज झाले आहेत? की त्यांना भारत रशियाची असलेली मैत्री खुपत आहे असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.