Viral Video Why was a reporter thrown out during Antony Blinken's speech
हमास : इस्रायल आणि हमास यांच्यात अखेर युद्धविरामाचा करार झाला असून त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी या करारासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल भाषण दिले. मात्र, या भाषणादरम्यान झालेल्या वादामुळे एका पत्रकाराला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्याचे दृश्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
ब्लिंकन यांचे भाषण आणि पत्रकाराने उपस्थित केलेले प्रश्न
अँटोनी ब्लिंकन आपल्या शेवटच्या भाषणात इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाबाबत बोलत होते. ते 15 महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षातील युद्धबंदीच्या करारामागे केलेल्या कामावर प्रकाश टाकत होते. मात्र, या भाषणादरम्यान पत्रकार सॅम हुसैनी यांनी अमेरिकी धोरणांवर टीका करत प्रश्न विचारला. हुसैनी यांच्या प्रश्नांनी परराष्ट्रमंत्री अस्वस्थ झाले. त्यानंतर हुसैनी यांनी मोठ्याने बोलणे सुरू केले, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पत्रकाराला कॉन्फरन्स रूममधून बाहेर काढले, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओत हुसैनी मोठ्याने ओरडत असल्याचे दिसत आहे. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप केला. या घटनेने कार्यक्रमात गोंधळ उडाला, मात्र भाषण पूर्ण करण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशिया तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत! व्लादिमीर पुतिन यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तीने दिला इशारा
इस्रायल-हमास युद्धविराम करार अंतिम
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीचा करार अंतिम झाला असून लवकरच त्याची औपचारिक घोषणा होणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने याची पुष्टी केली आहे. या करारानुसार ओलीसांची सुटका आणि तात्पुरता युद्धविराम सुनिश्चित होईल. पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले की, अमेरिकेने या करारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या युद्धबंदीनंतर 15 महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला तात्पुरता विराम मिळणार आहे. कराराच्या तपशिलांबाबत चर्चा करणाऱ्या टीमने पंतप्रधान नेतन्याहू यांना अहवाल दिला आहे. या करारामुळे दोन्ही बाजूंना शांततेसाठी नवा मार्ग शोधण्याची संधी मिळेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेच्या H-1B व्हिसातील बदलांचा भारतीय व्यावसायिकांना होणार मोठा फायदा; अमेरिकन कंपनीत नोकरीच्या संधी
अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
सॅम हुसैनी यांच्या टीकेमुळे अमेरिकेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांवर कठोर टीका केली. त्यांचे आरोप आणि त्यानंतर घडलेली घटना या दोन्ही गोष्टींमुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.
राजकीय वर्तुळात गोंधळ
अँटोनी ब्लिंकन यांचे हे भाषण विद्यमान बिडेन प्रशासनाच्या अखेरच्या टप्प्यातील होते. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ड