Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Voyager 2 : व्हॉयेजर 2 चा जगाला अखेरचा नजराणा; नेपच्यून व ट्रायटनचे खास छायाचित्र 36 वर्षांनी आले समोर

हे छायाचित्र १९८९ मध्ये नासाच्या व्हॉयेजर २ अंतराळयानाने पृथ्वीपासून ४.७ अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून काढले होते. या छायाचित्रानंतर, अंतराळयानाचे कॅमेरे कायमचे बंद करण्यात आले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 29, 2025 | 03:05 PM
Voyager 2 NASA shares last solar system photo after 36 years

Voyager 2 NASA shares last solar system photo after 36 years

Follow Us
Close
Follow Us:

Voyager 2 last photo Neptune Triton : मानवाच्या जिज्ञासेने अंतराळाचा प्रवास केला आणि नासाच्या दोन महत्त्वाच्या मोहिमांनी आपल्याला सूर्यमालेच्या बाह्य टोकापर्यंत पोहोचवले. त्यातील एक म्हणजे व्हॉयेजर २ अंतराळयान. आज या अंतराळयानाने घेतलेल्या एका फोटोची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कारण हा फोटो केवळ एक चित्र नव्हे, तर मानवाच्या अंतराळयात्रेतील टप्प्याचे प्रतीक ठरला.

 ४.७ अब्ज किमीवरून घेतलेला शेवटचा फोटो

२८ ऑगस्ट १९८९ रोजी व्हॉयेजर २ ने पृथ्वीपासून तब्बल ४.७ अब्ज किलोमीटर अंतरावरून सूर्यमालेच्या बाहेरच्या भागाचे छायाचित्र घेतले. या फोटोत डावीकडे नेपच्यून ग्रह आणि उजवीकडे त्याचा मोठा व गूढ चंद्र ट्रायटन दिसतो. नेपच्यूनकडे जाताना हा क्षण ऐतिहासिक ठरला, कारण हा व्हॉयेजर २ चा शेवटचा फोटो ठरला. यानंतर लगेचच नासाने या यानाचे कॅमेरे कायमचे बंद केले. यामागे कारण होते ऊर्जा बचत. अवकाशात जशी यानाची लांब प्रवासयात्रा वाढत गेली, तसा त्याचा ऊर्जा पुरवठा कमी होऊ लागला. वैज्ञानिकांनी ठरवले की कॅमेरे बंद करून ऊर्जा फक्त डेटा संकलन व सिग्नल पाठवण्यासाठी वापरली जावी.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US–Japan Trade Deal: जागतिक राजकारण ‘असे’ फिरले, पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यामुळे अमेरिकेने अब्जावधी रुपये झटक्यात गमावले

 व्हॉयेजर २ चा भव्य प्रवास

१९७७ मध्ये प्रक्षेपित झालेले व्हॉयेजर २ हे एकमेव अंतराळयान आहे ज्याने चारही बाह्य ग्रहांचा (गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून) जवळून अभ्यास केला.

  • गुरूच्या महान लाल ठिपक्याचा बारकाईने अभ्यास

  • शनीच्या भव्य कड्यांचे अद्भुत फोटो

  • युरेनसचा झुकलेला अक्ष व त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप

  • नेपच्यूनचे सुपरसॉनिक वारे व ट्रायटनवरील गूढता

या सर्व निरीक्षणांमुळे मानवाला सूर्यमालेबद्दलची दृष्टीच बदलली.

Voyager 2’s last image was taken on this day in 1989. Here Neptune is on the left, and its moon Triton on the right. From this position, farther from the Sun than Neptune, most of the sunlit sides face away from the departing spacecraft. With no more targets for the optical… pic.twitter.com/ThYKClTJE5

— NSFVoyager2 (@NSFVoyager2) August 27, 2025

credit : social media

 व्हॉयेजर १ आणि व्हॉयेजर २ : जुळे प्रवासी

व्हॉयेजर मोहिमेतील दुसरे यान म्हणजे व्हॉयेजर १. दोन्ही यानांना बहुतेकदा “जुळे” मानले जाते. मात्र, त्यांच्या मार्गांमध्ये फरक होता. व्हॉयेजर १ ने फक्त गुरू आणि शनि ग्रहांना भेट दिली आणि नंतर तो सूर्यमालेबाहेर निघून गेला. तर व्हॉयेजर २ ने अधिक दीर्घ प्रवास करत चारही ग्रहांचा अभ्यास केला.

 शेवटचा फोटो इतका खास का?

या चित्रात नेपच्यून आणि ट्रायटनचे सूर्यप्रकाशित भाग अंतराळयानाच्या दिशेने नव्हते, त्यामुळे फोटोत भयावह आणि गूढ छटा निर्माण झाली होती. या क्षणाने जणू व्हॉयेजर २ च्या ग्रह अभ्यासाचा एक अध्याय संपवून, आंतरतारकीय अवकाशातील नव्या प्रवासाची सुरुवात घोषित केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MAGA Heir : जेडी व्हान्स लवकरच होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष? ट्रम्पच्या प्रकृतीवरून चर्चांना उधाण; उपाध्यक्षांचे मोठे विधान

आजही सुरू आहे संवाद

कॅमेरे बंद झाले तरी व्हॉयेजर २ आजही नासाशी संवाद साधत आहे. तो सौरमालेच्या बाहेर म्हणजेच आंतरतारकीय अवकाशात प्रवास करत आहे. ४७ वर्षांनंतरही हे यान आपल्याला महत्त्वपूर्ण वैज्ञानिक माहिती पाठवत आहे, ही मानवजातीसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. व्हॉयेजर २ चा शेवटचा फोटो हा केवळ एक छायाचित्र नाही, तर मानवाच्या विज्ञानयात्रेचा अमर पुरावा आहे. आज ३६ वर्षांनंतर नासाने हा फोटो जगासमोर पुन्हा आणला आणि मानवाला आठवण करून दिली की आपली जिज्ञासा व ज्ञानाची भूकच आपल्याला अवकाशाच्या नव्या टप्प्यांकडे घेऊन जाते.

Web Title: Voyager 2 nasa shares last solar system photo after 36 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • NASA
  • nasa news
  • NASA Space Agency
  • Space News

संबंधित बातम्या

आजची रात्र खास ठरणार! अवकाशात पाहायला मिळणार ‘Black Moon’ चा दुर्मीळ नजारा
1

आजची रात्र खास ठरणार! अवकाशात पाहायला मिळणार ‘Black Moon’ चा दुर्मीळ नजारा

Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स
2

Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स

National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा
3

National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती
4

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.