Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Osama Bin Laden : पाकिस्तानने ओसामा बिन लादेनच्या पत्नींसोबत काय केले? झरदारींच्या सहकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

Osama Bin Laden : 2 मे 2011 रोजी अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला ठार मारले. फरहतुल्ला बाबरच्या पुस्तकानुसार, सीआयएने त्याच्या पत्नींची तात्काळ चौकशी केली आणि...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 14, 2025 | 12:41 PM
What did Pakistan do with Osama bin Laden's wives president zardari aide reveals

What did Pakistan do with Osama bin Laden's wives president zardari aide reveals

Follow Us
Close
Follow Us:
  • ओसामा बिन लादेनच्या हत्येनंतर पाकिस्तानने त्याच्या पत्नींना ताब्यात घेतले, पण काही दिवसांतच CIA ला थेट चौकशीची मुभा दिली.

  • या परवानगीमुळे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आणि देशाला राष्ट्रीय अपमान सहन करावा लागला.

  • नव्या पुस्तकात धक्कादायक खुलासे झाले असून, सीआयएला आधीपासूनच बिन लादेनच्या अबोटाबादमधील ठिकाणाबद्दल गुप्त माहिती होती.

Pakistan Osama bin Laden wives : २ मे २०११ हा दिवस जगाच्या इतिहासात एका कायमस्वरूपी जखमेप्रमाणे कोरला गेला. त्या रात्री अमेरिकेच्या नेव्ही सील्स कमांडोंनी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अल-कायदाचा प्रमुख व ९/११ हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याचा वध केला. तब्बल ४० मिनिटे चाललेल्या या कारवाईने संपूर्ण जग हादरून गेले. मात्र, या कारवाईनंतर पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला. “बिन लादेन एवढ्या वर्षांपासून पाकिस्तानी लष्करी चौक्यांच्या जवळ कसा लपून बसला होता?” हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला. पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे आली ती त्याच्या पत्नींसोबत घडलेल्या घटनांमुळे.

पत्नींना चौकशीसाठी दिली थेट CIA ला

माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे प्रवक्ते फरहतुल्लाह बाबर यांनी नुकतेच प्रकाशित केलेल्या ‘द झरदारी प्रेसिडेन्सी: नाऊ इट मस्ट बी टोल्ड’ या पुस्तकात मोठे खुलासे केले आहेत. बाबर यांच्या मते, ओसामाच्या मृत्यूनंतर पाकिस्तान सरकारने त्याच्या पत्नींना ताब्यात घेतले. पण काही दिवसांतच सीआयएच्या अधिकाऱ्यांना अबोटाबाद छावणीत प्रवेश देऊन थेट चौकशी करण्याची परवानगी दिली गेली. ही परवानगी पाकिस्तानसाठी केवळ लाजिरवाणी नव्हे तर सार्वभौमत्वाला तडा देणारी ठरली. कारण अमेरिकन एजंटना आपल्या भूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वावरू देणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे होय.

हे देखील वाचा : Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य

पाकिस्तानचा राष्ट्रीय अपमान

बाबर स्पष्टपणे लिहितात की, या घटनेमुळे पाकिस्तानचा राष्ट्रीय अपमान झाला. देशाचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व अमेरिकेच्या दबावाखाली झुकलेले दिसले. अमेरिकन अधिकाऱ्यांना पूर्ण मुभा मिळाली आणि पाकिस्तान एक प्रकारे “बाह्य नियंत्रणाखालील देश” असल्याचे भासले. त्याच काळात तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन आणि सिनेटर जॉन केरी इस्लामाबादला आले. पाकिस्तान सरकारला अमेरिकेकडून हमी हवी होती की भविष्यात अशा एकतर्फी कारवाया पुन्हा होणार नाहीत. मात्र, अमेरिकेने कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.

6. He had lots of wives and children.

– Osama Bin Laden was married to at least five women and fathered around 20 children. His marriages were arranged and often linked to strategic alliances within his radical network.

– His family life was complex, with his wives and children… pic.twitter.com/9yxn2SRSr5

— Manifest_Lord (@Manifest_Lord) July 22, 2024

credit : social media

CIA चा गुप्त डाव

या पुस्तकात आणखी एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. बिन लादेनच्या हत्येपूर्वीच सीआयएने त्याच्या अबोटाबादमधील लपण्याच्या ठिकाणाबद्दल बारीक माहिती गोळा केली होती. इतकेच नव्हे, तर ओसामासाठी बांधलेल्या कॉम्प्लेक्सचा कंत्राटदार कोण होता याचीही माहिती सीआयएकडे होती. यावरून स्पष्ट होते की अमेरिकेने केवळ एका रात्रीत कारवाई न करता वर्षानुवर्षे योजनेची आखणी केली होती. मात्र, या सगळ्या घडामोडींनी पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण केले आणि त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा पूर्णपणे डळमळीत झाली.

हे देखील वाचा : Hindi Diwas 2025 : हिंदी राष्ट्रभाषा की अधिकृत भाषा? गोंधळ दूर करण्यासाठी जाणून घ्या संविधानातील ‘हे’ महत्वाचे मुद्दे

एका अध्यायाला पूर्णविराम

ओसामाच्या मृत्यूने जरी दहशतवादाच्या एका अध्यायाला पूर्णविराम दिला, तरीही त्यानंतरच्या घडामोडींनी पाकिस्तानला कायमची कलंकित छाप दिली. पत्नींच्या चौकशीसाठी सीआयएला दिलेली थेट परवानगी ही केवळ सुरक्षा यंत्रणेची कमकुवत बाजू नव्हे, तर सार्वभौमत्वावरचा मोठा आघात मानला जातो. आजही या प्रकरणाचा उल्लेख झाला की पाकिस्तानच्या लष्करी व राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि राहतील.

Web Title: What did pakistan do with osama bin ladens wives president zardari aide reveals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • America
  • International Political news
  • Osama bin Laden
  • pakistan army

संबंधित बातम्या

Trump-Putin : ‘पुतिनबाबत संयम संपत चालला’; ट्रम्प यांचा रशियाला इशारा म्हणाले, ‘खूप कठोर पावले उचलावी लागतील’
1

Trump-Putin : ‘पुतिनबाबत संयम संपत चालला’; ट्रम्प यांचा रशियाला इशारा म्हणाले, ‘खूप कठोर पावले उचलावी लागतील’

India-US trade tariffs : सर्जियो भारतातील राजदूत होण्यास अयोग्य, नवारो मूर्ख…ट्रम्पच्या निर्णयांवर बोल्टन कडाडले
2

India-US trade tariffs : सर्जियो भारतातील राजदूत होण्यास अयोग्य, नवारो मूर्ख…ट्रम्पच्या निर्णयांवर बोल्टन कडाडले

भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…; कुठे घडली घटना?
3

भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…; कुठे घडली घटना?

SCO summit 2027 : पाकिस्तान 2027 मध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन करणार; शाहबाज शरीफ यांची घोषणा
4

SCO summit 2027 : पाकिस्तान 2027 मध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन करणार; शाहबाज शरीफ यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.