Hindi Diwas 2025 : हिंदी राष्ट्रभाषा की अधिकृत भाषा? गोंधळ दूर करण्यासाठी जाणून घ्या संविधानातील 'हे' महत्वाचे मुद्दे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हिंदी केवळ संवादाचे साधन नाही, तर ती भारताच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. भारतात सर्वाधिक लोक ही भाषा बोलतात. उत्तरेपासून पश्चिमेकडे, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत, हिंदीने भारतीय संस्कृतीला एकत्र बांधले आहे. स्वातंत्र्यलढ्यात हिंदीने महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधींनी तर हिंदीला जनतेची भाषा मानले होते आणि तिच्या प्रसाराला चालना दिली होती.
हे देखील वाचा : Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य
“राष्ट्रभाषा” म्हणजे देशातील सर्व घटकांना जोडणारी, जनतेने स्वाभाविकपणे स्वीकारलेली भाषा. पण महत्वाचे म्हणजे भारतीय संविधानात कोणत्याही भाषेला ‘राष्ट्रभाषा’चा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा नसून फक्त अधिकृत भाषा आहे. “अधिकृत भाषा” म्हणजे अशी भाषा जी शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि संसदेच्या कामकाजासाठी वापरली जाते. त्यामुळे हिंदी ही भारताची अधिकृत भाषा आहे, राष्ट्रभाषा नाही.
१४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेत झालेल्या चर्चेत हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली. ही चर्चा सहज झाली नाही. अनेकांना वाटत होते की हिंदी लादली गेल्यास दक्षिण भारतातील भाषांना धोका निर्माण होईल. तमिळ, तेलगू, कन्नड यांसारख्या प्रादेशिक भाषांच्या रक्षणासाठी तीव्र भूमिका घेण्यात आली. परंतु व्यापक विचारानंतर, हिंदीला देवनागरी लिपीत अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आले.
हिंदी है गंगा ज्ञान की, जो ‘अ’ से ‘ज्ञ’ तक बहती है, हर मोड़ पर शिक्षा की अविरल गाथा कहती है, यह भाषा नहीं, है संस्कारों की दिव्य माला, जिसने ‘अ’ से अनपढ़ को ‘ज्ञ’ से ज्ञानी बना डाला!#HindiDiwas2025 #IndianCulture #CharaivetiSeriesDJJS pic.twitter.com/hVIlohzeQa — Divya Jyoti Jagrati Sansthan (@djjsworld) September 14, 2025
credit : social media
हिंदी दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे या भाषेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे.
आजच्या डिजिटल युगातही हिंदीचा प्रभाव कमी झालेला नाही. उलट, सोशल मीडिया, चित्रपट, दूरदर्शन, साहित्य आणि सरकारी पातळीवर हिंदीचा वापर वाढत आहे. हिंदी शिकणाऱ्यांची संख्या केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही झपाट्याने वाढते आहे.
लोकप्रियतेमुळे आणि व्यापक वापरामुळे अनेकांना वाटते की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. पण संविधानानुसार हिंदी ही अधिकृत भाषा आहे, राष्ट्रभाषा नाही. त्यामुळे हिंदी दिवसाच्या निमित्ताने हा गोंधळ दूर करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा : Positive Thinking Day : प्रत्येक नवा दिवस नवीन विचारांसोबत जगा, जीवन बदलायचे तर आधी मन बदला
हिंदी ही केवळ संवादाची भाषा नाही तर ती आपल्या राष्ट्रीय ओळखीचा एक भाग आहे. जरी ती राष्ट्रभाषा नसली तरी, तिच्या माध्यमातून देशातील विविध भाषा, संस्कृती आणि प्रांत यांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य हिंदीमध्ये आहे. म्हणूनच हिंदी दिवस आपल्याला भाषिक विविधतेतून एकतेचा संदेश देतो. हिंदी दिवस हा केवळ एका भाषेचा उत्सव नसून भारताच्या संविधानिक व्यवस्थेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा द्योतक आहे. राष्ट्रभाषा आणि अधिकृत भाषा यातला गोंधळ टाळून, हिंदीला तिच्या खरी ओळखीत अधिकृत भाषेच्या स्वरूपात सन्मान देणे हेच या दिवसाचे खरे उद्दिष्ट आहे.






