Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे ‘Cloud Seeding’ तंत्रज्ञान? वाचा कशी करता येईल कृत्रिम पावसाने प्रदूषणावर मात

Cloud seeding technology : दिल्ली सरकारच्या प्रस्तावित क्लाउड सीडिंग प्रकल्पावर सुमारे ३.२१ कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून विशेष परवानग्या घेण्यात आल्या आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 02, 2025 | 10:22 PM
What is ‘Cloud Seeding’ technology

What is ‘Cloud Seeding’ technology

Follow Us
Close
Follow Us:

Cloud seeding technology : दिवाळीनंतर दिल्ली आणि एनसीआर प्रदेशात वायू प्रदूषणाचा स्तर अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचतो. पावसाच्या कमतरतेमुळे धूळ, धुरकं आणि धोकादायक कण हवेत स्थिर राहतात, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर, दिल्ली सरकारने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृत्रिम पावसाचे प्रयोग ‘क्लाउड सीडिंग’ तंत्राच्या साहाय्याने करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या दिल्ली सरकार पावसाळ्यानंतर ही चाचणी घेण्याच्या तयारीत आहे. ही चाचणी पूर्वी ४ ते ११ जुलै दरम्यान प्रस्तावित होती, मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. या चाचणीमागचा मुख्य उद्देश म्हणजे हवेतिल धूळ आणि प्रदूषणकारी कण खाली आणणे, जेणेकरून लोकांचा श्वास घेण्यास त्रास कमी होईल.

क्लाउड सीडिंग म्हणजे काय?

क्लाउड सीडिंग ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे, जिच्यात वातावरणातील ढगांवर विशिष्ट रसायनांचा फवारा केला जातो, ज्यामुळे कृत्रिम पाऊस पाडता येतो. या प्रक्रियेत सिल्व्हर आयोडाइड (AgI), पोटॅशियम आयोडाइड किंवा कोरडा बर्फ (dry ice) यांचा वापर केला जातो. ही रसायने ढगांमध्ये बर्फाचे स्फटिक किंवा जलकण तयार करण्यास मदत करतात, जे नंतर पावसात रूपांतरित होतात. या रसायनांचा फवारा विशेषतः हवाई जहाजे किंवा हेलिकॉप्टरद्वारे ढगांवर केला जातो. यामुळे हवेतिल वाफ जमून पावसाचे थेंब तयार होतात आणि सुमारे ३० मिनिटांमध्ये कृत्रिम पाऊस पडतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गनपावडरच्या सावलीत ‘Hormuz’! भारत-चीन तेल मार्ग नष्ट करण्याचा इराणचा हेतू, समोर आले भयानक सत्य

क्लाउड सीडिंगचे प्रकार

क्लाउड सीडिंग मुख्यतः दोन प्रकारांमध्ये केला जातो –

  1. हायग्रोस्कोपिक क्लाउड सीडिंग
1. या पद्धतीत मीठाचे कण ढगांच्या तळाशी सोडले जातात.

2. हे कण पाण्याच्या वाफेशी संलग्न होतात आणि मोठे थेंब तयार करतात, ज्यामुळे पावसाची शक्यता वाढते.

हिमनदीयुक्त क्लाउड सीडिंग

1. यामध्ये सुपरकूल्ड (अतिथंड) ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाइड किंवा कोरडा बर्फ पसरवला जातो.

2. यामुळे बर्फाचे स्फटिक तयार होतात आणि ढगांच्या पृष्ठभागावरून पाऊस पडतो.

क्लाउड सीडिंगचा खर्च किती?

दिल्ली सरकारच्या प्रस्तावित क्लाउड सीडिंग प्रकल्पावर सुमारे ३.२१ कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून विशेष परवानग्या घेण्यात आल्या आहेत. याशिवाय आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी यासाठी विशिष्ट सूत्र आणि योजना तयार केली आहे. या चाचणीचे यशस्वी होणे हे दिल्लीसारख्या प्रदूषणग्रस्त शहरासाठी क्रांतिकारी ठरू शकते. जर हे प्रयोग प्रभावी ठरले, तर भविष्यात प्रदूषण नियंत्रणासाठी क्लाउड सीडिंगचा वापर एक पर्याय म्हणून समोर येऊ शकतो.

जगात इतरत्र क्लाउड सीडिंगचा वापर

अमेरिका, चीन, संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांनी याआधीच क्लाउड सीडिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. दुबईसारख्या कोरड्या प्रदेशात या तंत्रज्ञानामुळे पावसाची शक्यता वाढवून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उत्तराधिकारी कोण? दलाई लामा यांनी केला खुलासा आणि चीनला दिले जशास तसे उत्तर

क्लाउड सीडिंग

दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि हवामानातील अस्थिरता पाहता, क्लाउड सीडिंग हे एक संभाव्य पर्याय म्हणून समोर आले आहे. याचे आर्थिक आणि तांत्रिक भान राखून योग्य नियोजन केल्यास कृत्रिम पावसाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच, पर्यावरणीय धोरणांमध्येही याचा समावेश होण्याची शक्यता आहे.

Web Title: What is cloud seeding technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • delhi
  • navarashtra special story
  • rain
  • special story

संबंधित बातम्या

Stambheshwar Mahadev: श्रद्धा आणि विज्ञानाचा अनोखा संगम! दिवसातून दोनदा समुद्रात जलाभिषेक घेते ‘हे’ शिवमंदिर; भारतातील चमत्कारच
1

Stambheshwar Mahadev: श्रद्धा आणि विज्ञानाचा अनोखा संगम! दिवसातून दोनदा समुद्रात जलाभिषेक घेते ‘हे’ शिवमंदिर; भारतातील चमत्कारच

Armed Forces Flag Day 2025 : आजचा ‘हा’ खास दिवस आहे शूर सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण आणि राष्ट्रकर्तृत्वाचा आदर करण्याचा
2

Armed Forces Flag Day 2025 : आजचा ‘हा’ खास दिवस आहे शूर सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण आणि राष्ट्रकर्तृत्वाचा आदर करण्याचा

Indian Home Guard Day : देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मजबूत कणा म्हणजे ‘होमगार्ड’; वाचा ‘या’ मौन योद्धयांची संघर्षगाथा
3

Indian Home Guard Day : देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मजबूत कणा म्हणजे ‘होमगार्ड’; वाचा ‘या’ मौन योद्धयांची संघर्षगाथा

चंद्रावरच नव्हे, सूर्यावरही पिंपल्स! पुढील दहा दिवस दिसणार दुर्मीळ खगोलीय दृश्य
4

चंद्रावरच नव्हे, सूर्यावरही पिंपल्स! पुढील दहा दिवस दिसणार दुर्मीळ खगोलीय दृश्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.