Will Japan's PM Ishaba resign Lost majority in both houses
टोकियो : जपानमध्ये पंतप्रधान शिगेरु इशाबा यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने वरिष्ठ सभागृहात बहुमत गमावले आहे. तसेच त्यांच्या मित्रपक्षांची देखील हार झाली आहे. सोमवारी जपानमध्ये संसदीय निवडणुका पार पडल्या. यामध्ये पंतप्रधान इशाबा यांच्या सत्ताधारी पक्षाला परिष्ठ सभागृत बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. ऑक्टोबरच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत देखील इशाबा यांचा पराभव झाला होता.
जपानच्या वरिष्ठ सभागृहात एकूण २४८ जागा आहेत. पंतप्रधान इशिबा यांच्या पक्षाकडे आधीच ७५ जागा होत्या. परंतु बहुमत टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आणखी किमान ५० जागांची गरज होती. मात्र त्यांच्या पक्षाला केवळ ४७ जागांमध्ये समाधान मानवे लागले. यातील ३९ जागा एलडीपी पक्षाला मिळाल.
१९५५ नंतर पहिल्यांदाच संसदेत दोन्ही सभागृहात एलडीपी पक्षाने बहुमत गमावले आहे. यामुळे राजकीय अस्थिरता वाढली होती. दरम्यान आता दोन्ही सभागृहांमध्ये कमी मतामुळे इशाबा यांच्या पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे.
दरम्यान पराभव झाला असूनही पंतप्रधान इशाबा यांना राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी देशासाठी काम करत राहिल आणि अमेरिकेच्या टॅरिफ समस्या देखील सोडवण्याचा प्रयत्न करील. सध्या जपानमध्ये महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच अमेरिकेकडून टॅरिफही लादला जात आहे. यामुळे देशभर चिंतेचे वातावरण आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाविरोधात लोकांमध्ये आक्रोश पसरला आहे
गेल्या अनेक काळापासून एलडीपी जपानमधील सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. परंतु ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणूकीत एलडीबीचा पराभव झाला होता. यावेळी एलडीपीला ४६५ जागांपैकी २१५ जागा मिळाल्या होत्या, परंतु त्यांना २३३ जागांचा आवश्यकता होती. पण दोन्ही सबागृहातील परभाव पंतप्रधान इशिबा यांच्यासाठी मोठा राजकीय अपयश मानला जात आहे. सध्या पंतप्रधान इशाबा यांच्या समोर आणि त्यांच्या पक्षासमोर सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे. सध्या एलडीपीच्या पायउताराची शर्यत सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी जपानच्या तीन पंतप्रधानांनीही वरिष्ठ सभागृहात बहुमत गमावले होते. यानंतर त्यांना राजीनमा द्यावा लागला होता. यामुळे सध्याचे पंतप्रधान इशाबा यांच्यावरीलही दबाव वाढण्याची शक्यता आहे.