Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत राजकीय व आर्थिक वादळाची शक्यता; नक्की काय आहे हे ट्रम्प यांचे ‘One Big Beautiful Bill’?

One Big Beautiful Bill : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील महत्वाकांक्षी विधेयक ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ काँग्रेसमध्ये संमत झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 02, 2025 | 11:32 AM
Will Trump's 'One Big Beautiful Bill' spark a U.S. crisis

Will Trump's 'One Big Beautiful Bill' spark a U.S. crisis

Follow Us
Close
Follow Us:

One Big Beautiful Bill : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील महत्वाकांक्षी विधेयक ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ काँग्रेसमध्ये संमत झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला एलोन मस्क यांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे. या विरोधामुळे दोघांमधील संबंधात दरी निर्माण झाली असून, अमेरिकेच्या राजकीय आणि आर्थिक भविष्यावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

विधेयकाची संक्षिप्त रूपरेषा

‘वन बिग ब्युटीफुल’ हे विधेयक २२ मे २०२५ रोजी अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात अवघ्या एका मताने (२१५-२१४) संमत झाले, तर सिनेटमध्ये उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या टायब्रेकिंग मतामुळे ५१-५० च्या फरकाने ते पारित झाले. हे विधेयक ट्रम्प यांच्या देशांतर्गत धोरण अजेंड्याचा भाग मानले जात आहे.

विधेयकातील मुख्य मुद्दे

1. कर कपात: एकूण ४.५ ट्रिलियन डॉलर्सच्या कर सवलती, ज्यामध्ये उत्पन्न कर आणि मालमत्ता करात कपात यांचा समावेश आहे.

2. संरक्षण आणि सीमा सुरक्षा: १५० अब्ज डॉलर्सची अतिरिक्त तरतूद, विशेषतः बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी.

3. सामाजिक कल्याणात कपात: काही सामाजिक योजनांमध्ये निधी कपात, ज्यामुळे अल्पसंक्यांक आणि गरीब वर्गावर परिणाम होण्याची शक्यता.

4. ईव्ही सबसिडी रद्द: इलेक्ट्रिक वाहनांवरील कर क्रेडिट बंद करण्याचा प्रस्ताव, जो ईव्ही उद्योगासाठी धोका ठरू शकतो.

5. कर्ज मर्यादा वाढ: संघीय सरकारच्या तुटीचा धोका अधिक गडद.

6. परदेशी रेमिटन्सवर शुल्क: अमेरिका ते भारतासारख्या देशांत पाठवले जाणारे पैसे आता ५% शुल्काच्या कक्षेत येणार; यामुळे भारताचे १२-१८ अब्ज डॉलर नुकसान होऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिका भारतावर लादणार 500% कर? ट्रम्प समर्थित प्रस्तावामुळे व्यापार धोका झपाट्याने वाढला

Elon Musk यांचा विरोध

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलोन मस्क यांनी या विधेयकाला “अर्थव्यवस्थेसाठी घातक” असे ठरवले आहे. त्यांचा दावा आहे की, हे विधेयक आर्थिक असमतोल निर्माण करेल, नोकऱ्या नष्ट करतील, आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचा गळा घोटेल. मस्क यांनी सरकारला इशारा देत सांगितले की, “हा कायदा केवळ श्रीमंत उद्योगपतींचा फायदा करून गरीब आणि मध्यमवर्गीयांवर अन्याय करणारा आहे.” त्यांनी एवढेही सूचित केले की, जर सरकारने लक्ष न दिल्यास ते स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करू शकतात.

🚨#BREAKING: Trump’s “Big, Beautiful Bill” just passed its first Senate hurdle but behind the scenes, it’s a disaster in the making. It boosts war budgets, kills clean energy, adds trillions in debt, and even Elon Musk is calling it “insane.”
Here’s what’s really happening:⤵️ pic.twitter.com/noOz0px0uL
— TAM (@Awakeningmedia1) June 29, 2025

credit : social media

राजकीय समीकरणात बदल

माजी मित्र असलेले ट्रम्प आणि मस्क यांच्यातील ही तणावपूर्ण स्थिती अमेरिकेच्या राजकारणात मोठा फेरबदल घडवू शकते. एकीकडे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी या विधेयकाचे समर्थन केले असले तरी मस्कसारख्या प्रभावशाली उद्योगपतीचा विरोध नवीन राजकीय आघाडी उघडण्याचे संकेत देतो. मस्कचा विरोध केवळ आर्थिक मुद्द्यापुरता मर्यादित नसून, त्यामध्ये राजकीय स्वायत्ततेचा मुद्दाही आहे. विश्लेषकांचे मत आहे की, “मस्क ट्रम्पच्या पुढील प्रचार मोहिमेला असहकार देऊ शकतात, ज्याचा प्रभाव २०२८ च्या निवडणुकांवरही दिसू शकतो.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांत नवा अध्याय; एस. जयशंकर-पेनी वोंग भेटीत द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा

One Big Beautiful Bill

‘वन बिग ब्युटीफुल बिल’ हे ट्रम्प सरकारचे महत्त्वाचे आर्थिक धोरण ठरणार असले, तरी एलोन मस्क यांच्या विरोधामुळे अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक वाद अधिक गहिरा होण्याची शक्यता आहे. या विधेयकामुळे मध्यमवर्गीयांवर करभार वाढण्याची, आणि भारतासारख्या देशांतील परदेशी रेमिटन्सवर नकारात्मक परिणाम होण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेतील हे नव्या संघर्षाचे लक्षण आहे – एकीकडे राजकीय धोरण, तर दुसरीकडे उद्योग आणि उद्योजकांचे भविष्य. आणि यामध्ये देशाचे आर्थिक स्थैर्य आणि जागतिक प्रभाव दोघेही तारेवरची कसरत करत आहेत.

Web Title: Will trumps one big beautiful bill spark a us crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • elon musk

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
3

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
4

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.