इराणमधील महिला 9 दिवसांपासून रस्त्यावर उतरल्या आहेत. या आंदोलनात अनेक महिलांना ताब्यात घेतले जात आहे. गोळीबारात आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या कुर्दिस्तानमध्येच 15 लोक मारले गेले आणि सुमारे 750 जण जखमी झाले. एक हजाराहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
[read_also content=”कुल्लूमध्ये ट्रॅव्हल्स बस दरीत कोसळली, ७ जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/travels-bus-falls-into-ravine-in-kullu-so-7-dead-nrgm-329826.html”]
16 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय तरुणी मेहसा अमिनीच्या मृत्यूनंतर या आंदोलनाला सुरुवात झाली. हिजाब नीट न घातल्याने महसाला ताब्यात घेण्यात आले होते. कोठडीत तिचा मृत्यू झाल्यानंतर या आंदोलनाला सुरुवात झाली. हिजाबच्या विरोधात, धार्मिक कायद्याच्या इराणच्या महिलांच आंदोलन सुरू आहे.सरकारही आंदोलकर्त्यांना रोखण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे. इराणचे विशेष दल शस्त्रास्त्रांसह रस्त्यावर गस्त घालत आहेत. या दरम्यान, 4 4 महिलांची हत्या झाल्याचा दावा मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. हदीस नजाफी, गझला चेलावी, हनाना किया आणि महशा मोगोई अशी त्यांची नावे आहेत.
[read_also content=”गरबा स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्या, आधार कार्ड तपासा; विश्व हिंदू परिषदेची अजब मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/allow-only-devout-hindus-to-enter-garba-site-check-aadhaar-card-demand-of-vishwa-hindu-parishad-nrps-329799.html”]
या दरम्यान, ही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यात इराणी सैन्याने घरांवर हल्ले केल्याच दिसत आहेत. इंटरनेट बंद झाल्यामुळे बाहेरच्या जगाला पोलिसांच्या कारवाईची फारशी माहिती मिळत नाही आहे. तर, दुसरीकडे राजधानी तेहरानमधील प्रमुख चौकांवर महिला मोठ्या प्रमाणावर आंदोलन करताना दिसत आहेत त्यांच्यासोबत पुरुषही आहेत.या दरम्यान, ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व महिला करत आहेत. इराणच्या अधिकाराला आव्हान देत महिलांनी हिजाब काढले आणि केसही कापले. या आंदोलनाला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे.
इराणमध्ये हिजाबच्या निषेधार्थ शुक्रवारी कट्टरतावादी विचारसरणीच्या लोकांनी मोर्चा काढला. या आंदोलकांवर कडक कारवाई केली जाईल, असे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी म्हटले आहे. यानंतर आंदोलन चिरडण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे.
इराणमधील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सांगितले की, सर्व कुर्द बहुल शहरांमध्ये सुरक्षा दल खूप अत्याचार करत आहेत. आंदोलकांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. असे काही व्हिडिओही समोर आले आहेत ज्यात पोलीस कर्मचारी बंद घरांवर गोळीबार करताना दिसत आहेत.
अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे इराणची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. महागाई 50% पेक्षा जास्त वाढली आहे. इराणच्या सोशल सिक्युरिटी ऑर्गनायझेशन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, देशातील 25 दशलक्षाहून अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत.
इराणही आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडला आहे. पाश्चात्य देशांसोबतचा अण्वस्त्र करार अडचणीत आहे. या कारणांमुळे लोकांमध्ये निराशा पसरली आहे. इराणच्या 80 दशलक्ष लोकांपैकी 60% लोक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.