Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : अमेरिकेवर ‘डर्टी बॉम्ब’ हल्ल्याचा इराणचा कट? वॉशिंग्टन डीसीला लक्ष्य करण्याची योजना; ट्रम्प यांचा थेट इशारा

World News : वॉशिंग्टन डीसीमध्ये डर्टी बॉम्ब किंवा रासायनिक शस्त्रांच्या माध्यमातून हल्ल्याचे नियोजन इराण करत असल्याचा दावा सीएनएनने केला आहे. ट्रम्प यांनी इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला असून, इराणने हे आरोप फेटाळले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 17, 2026 | 07:45 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • वॉशिंग्टन डीसीमधील वरिष्ठ अधिकारी लक्ष्यावर
  • ट्रम्प यांचा इराणला कठोर इशारा
  • इराणचा आरोपांना नकार; डर्टी बॉम्ब म्हणजे काय
World News : इराण आणि अमेरिकेमध्ये सुरु असलेले युद्ध आत्तापर्यन्त हे मध्य पूर्वेत सुरु होते . आखातातील अमेरिकेच्या सैन्यावर इराण हमाल करत असे . कारण अमेरिका इराण पासून लांब अंतरावर आहे . आता इराण अमेरिके मधील संघर्ष आता वेगळ्या वळणावर जात आहे . चक्क अमेरिकेच्या जमिनीवर इराण पोहचू शकतंय अशा बातम्या येत आहेत .
इराण वॉशिंग्टन डीसीमध्ये ‘डर्टी बॉम्ब’ किंवा रासायनिक शस्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचे पर्याय तपासत असल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे.या येणाऱ्या बातम्यानंतर ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे . मात्र, अमेरिकेच्या भूमीवर सध्या कोणताही विश्वसनीय तातडीचा धोका नसल्याचे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे. इराणनेही हे आरोप फेटाळले आहेत.

वॉशिंग्टन डीसीमधील वरिष्ठ अधिकारी लक्ष्यावर

सीएनएनने अमेरिकेच्या सात अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणकडून ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी संभाव्य हल्ल्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये रेडिओॲक्टिव्ह पदार्थांचा वापर करून डर्टी बॉम्ब स्फोट घडवणे किंवा रासायनिक शस्त्रांचा वापर करणे अशा पर्यायांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीत वॉशिंग्टनमधील संभाव्य ठिकाणे आणि लक्ष्यांचाही उल्लेख असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी हालचाली वाढवल्या आहेत. गेल्या आठवड्यात या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

World News : पोप लिओ चौदावे यांची मनाची श्रीमंती; डोळ्याला जपमाळ लागली, तरी फेकणाऱ्या व्यक्तीला केले माफ

ट्रम्प यांचा इराणला कठोर इशारा

या वृत्ताबाबत पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे प्रशासन या संभाव्य धोक्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे सांगितले. इराणकडून अमेरिकेवर हल्ला झाल्यास त्यांना आतापर्यंत कोणत्याही देशाने न भोगलेली किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

ट्रम्प यांनी मंगळवारी मनिला येथे पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या लॉरेन बिस यांनी अमेरिका सर्व संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सध्या अमेरिकेच्या मुख्य भूमीवर कोणताही विश्वसनीय तातडीचा धोका नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांच्या माहितीवरून सुरक्षा नियोजन वाढवण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष हल्ला होणार असल्याची पुष्टी झालेली नाही.

Yemen News : एडनजवळ हौथींची हालचाल; दक्षिण येमेनमधील भूभागावर कब्जा केल्याचा दावा

इराणचा आरोपांना नकार; डर्टी बॉम्ब म्हणजे काय

अमेरिकेच्या या दाव्यांवर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याच्या आरोपांनाही इराणने विरोध दर्शवला आहे.

डर्टी बॉम्ब हे अणुबॉम्बपेक्षा वेगळे असते. यामध्ये पारंपरिक स्फोटकांसोबत किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर केला जातो. स्फोटामुळे हे पदार्थ परिसरात पसरू शकतात आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे मोठ्या भागात दूषित वातावरण, भीती आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या वृत्तामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Web Title: World news iran dirty bomb trump warning cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Marathi News
  • US Iran war

संबंधित बातम्या

Satara News : पाणीबचतीचे आदेश कागदावरच; धोम उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
1

Satara News : पाणीबचतीचे आदेश कागदावरच; धोम उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

Geeken Furniture: गीकेन फर्निचरचा मोठा धमाका! 2030 पर्यंत 3,000 कोटींचे लक्ष्य, ग्राहकांसाठी उत्पादनांची नवी रेंज
2

Geeken Furniture: गीकेन फर्निचरचा मोठा धमाका! 2030 पर्यंत 3,000 कोटींचे लक्ष्य, ग्राहकांसाठी उत्पादनांची नवी रेंज

December 2026 Marriage Dates:डिसेंबरमध्ये लग्नाचा बार उडणार! विवाहासाठी कोणत्या तारखा शुभ? पाहा मुहूर्तांची संपूर्ण यादी
3

December 2026 Marriage Dates:डिसेंबरमध्ये लग्नाचा बार उडणार! विवाहासाठी कोणत्या तारखा शुभ? पाहा मुहूर्तांची संपूर्ण यादी

World News : पोप लिओ चौदावे यांची मनाची श्रीमंती; डोळ्याला जपमाळ लागली, तरी फेकणाऱ्या व्यक्तीला केले माफ
4

World News : पोप लिओ चौदावे यांची मनाची श्रीमंती; डोळ्याला जपमाळ लागली, तरी फेकणाऱ्या व्यक्तीला केले माफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.