Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zardari Kashmir Speech : झरदारींचा पुन्हा काश्मीरवर विषारी प्रहार; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतावर खोटारडे आरोप

Pakistan Independence Day 2025: पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आसिफ अली झरदारी यांनी खोटे बोलणे सोडले नाही. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 14, 2025 | 03:10 PM
Zardari spews Kashmir venom on Pakistan's Independence Day

Zardari spews Kashmir venom on Pakistan's Independence Day

Follow Us
Close
Follow Us:

Zardari Kashmir Speech :  पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन म्हणजे एकीकडे स्वतःच्या तथाकथित “यशोगाथा” रंगवण्याचा आणि दुसरीकडे भारताविरोधात कटु प्रचार करण्याचा नेहमीचा साचा. यंदाही यात काही बदल झाला नाही. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी 14 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या भाषणात पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून भारतावर खोट्या आरोपांचा भडिमार केला.

झरदारी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानच्या अलीकडील पराभवाला विजयाचे रूप देण्याचा प्रयत्न केला. “भारताने पाकिस्तानवर हल्ला करून चूक केली, परंतु पाकिस्तानने धैर्याने आणि संयमाने उत्तर दिले. आमचा देश शांततेचा समर्थक आहे, मात्र आपली अखंडता रक्षण करण्यासाठी सदैव सक्षम आहे,” असे ते म्हणाले. याच वेळी त्यांनी “पाकिस्तान कधीही कोणाच्याही दबावाला झुकत नाही” असा ठोकताळाही लावला.

ऑपरेशन सिंदूरवरील दिशाभूल

अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याने मोठा यश मिळवला. या कारवाईत शंभराहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, तर पाकिस्तानकडून भारतीय शहरांवर केलेला प्रतिहल्ला पूर्णतः अयशस्वी ठरला. मात्र, झरदारी यांनी या पराभवाचे चित्र वेगळे रंगवले. त्यांनी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात “विजय मिळवला” असल्याचे दावे करत, “या विजयाने आम्हाला एकजुटीचे स्मरण करून दिले” असे सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Pakistan चे वाढले प्रेम; मात्र असीम मुनीरच्या धमकीनंतरही अमेरिकेने का पाळले आहे मौन? भारताची सावध भूमिका

काश्मीर मुद्द्यावर पुन्हा भडकावणारी भाषा

झरदारी यांनी आपल्या भाषणाचा महत्त्वाचा भाग काश्मीरवर खर्च केला. त्यांनी म्हटले, “पाकिस्तान सदैव काश्मीरच्या लोकांसोबत आहे. त्यांचा न्यायासाठीचा संघर्ष आणि धाडस आमच्या मनाच्या जवळ आहे. त्यांचा आत्मनिर्णयाचा अधिकार मिळेपर्यंत आम्ही राजनैतिक, नैतिक आणि राजकीय पाठिंबा देत राहू.”
ही भाषा पाकिस्तानकडून नेहमीच केली जाणारी भडकावणारी आणि भावनांना पेटवणारी वक्तव्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

स्वत:च्या देशाची अवास्तव स्तुती

झरदारींनी पाकिस्तानची स्तुती करत, “प्रत्येक क्षेत्रात आम्ही यशस्वी ठरलो आहोत” असा दावा केला. वास्तवात, पाकिस्तान आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता, दहशतवादाचा वाढता धोका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी अलगद होणारी प्रतिमा यामुळे तग धरत आहे. अशा परिस्थितीत स्वातंत्र्यदिनाच्या व्यासपीठावरून दिलेले खोटारडे दावे हे केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे साधन असल्याचे स्पष्ट होते.

भारतावरील आरोपांचे राजकारण

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केवळ राष्ट्रपतीच नव्हे तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही भारतावर दोषारोप लावले. त्यांनी संघर्षाची जबाबदारी भारतावर ढकलली. या दोन्ही नेत्यांची भाषणे पाहता, पाकिस्तानचे उच्चस्तरीय नेतृत्व देशातील समस्यांकडून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी भारताविरोधात विषारी प्रचार करण्याच्या जुन्या डावावरच चालत असल्याचे दिसते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Karachi Aerial Firing : पाकिस्तानमध्ये हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक जखमी

पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन

पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन हा प्रत्यक्षात शेजारी देशांविरोधात द्वेषाची भाषा पसरवण्याचा मंच बनला आहे. झरदारींची विधाने ही केवळ राजकीय दिखावा असून त्यामागे देशातील जनतेला बाह्य शत्रू दाखवून एकजूट ठेवण्याचा प्रयत्न आहे. पण सत्य असे की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानला जबर पराभवाचा सामना करावा लागला आणि भारताने दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.
इतिहास, वास्तव आणि आकडेवारी हे काही झरदारींसारख्या नेत्यांच्या खोटारड्या विधानांना साथ देत नाहीत, हेच यंदाच्या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनातून अधोरेखित झाले.

Web Title: Zardari spews kashmir venom on pakistans independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • pakistan
  • Pakistan News
  • Pakistan Politics

संबंधित बातम्या

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान
1

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ
2

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…
3

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…

पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ
4

पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.