यामाहा आर2 यामाहा आर2 ऑगस्ट 2026 मध्ये लाँच झाली असून, तिची एक्स-शोरूम किंमत ₹2.30 लाख ते ₹2.53 लाख आहे. यात 204cc लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 26.1 bhp पॉवर आणि 19.1 Nm टॉर्क देते. बाईकमध्ये 17-इंच व्हील्स, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल-चॅनल ABS आणि 3 रायडिंग मोड्स आहेत. 149 किलो वजनामुळे ही बाईक हाताळणे सोपे होऊ शकते.
हिरो करिझ्मा एक्सएमआर 210 हिरो करिझ्मा एक्सएमआर 210 ची एक्स-शोरूम किंमत ₹1.87 लाख आहे, तर कॉम्बॅट एडिशनसाठी ₹1.88 लाख मोजावे लागतात. यात 210cc लिक्विड-कूल्ड इंजिन असून, ते 25.1 bhp पॉवर आणि 20.4 Nm टॉर्क देते. 6-स्पीड गिअरबॉक्स, स्लिप-अँड-असिस्ट क्लच आणि 4.2-इंच TFT स्क्रीन ही तिची खास वैशिष्ट्ये आहेत. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीमुळे नेव्हिगेशन, कॉल अलर्ट आणि म्युझिक कंट्रोलची सुविधाही मिळते.
अप्रिलिया आरएस 457 अप्रिलिया आरएस 457 ची फेब्रुवारी 2026 मध्ये लाँच झालेल्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत महाराष्ट्रात ₹4.22 लाख होती. यात 457cc पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन असून, 47.6 bhp पॉवर आणि 43.5 Nm टॉर्क मिळतो. 5-इंच TFT स्क्रीन, राइड-बाय-वायर, रायडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल-चॅनल ABS यामुळे ही बाईक स्पोर्ट्स रायडर्ससाठी आकर्षक ठरते.
बजाज पल्सर एनएस200 2026 बजाज पल्सर एनएस200 ची एक्स-शोरूम किंमत ₹1.60 लाख आहे. यात 199.5cc लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते, जे 25.1 bhp पॉवर देते. नवीन मॉडेलमध्ये 5-इंच TFT स्क्रीन, गुगल मॅप्स मिररिंग, क्विकशिफ्टर, ट्रॅक्शन कंट्रोल आणि रायडिंग मोड्स यांसारखी फीचर्स आहेत. USB Type-C पोर्ट, अॅडजस्टेबल लीव्हर्स आणि हॅझर्ड स्विचमुळे दैनंदिन वापरातही सोय होते.
सुझुकी जिक्सर एसएफ 250 सुझुकी जिक्सर एसएफ 250 ची एक्स-शोरूम किंमत ₹1.93 लाख आहे, तर E85 फ्लेक्स-फ्युएल व्हर्जनची किंमत ₹1.98 लाख आहे. सामान्य मॉडेलमध्ये 250cc इंजिन 26.1 bhp पॉवर आणि 22.2 Nm टॉर्क देते. फ्लेक्स-फ्युएल व्हर्जनमध्ये 27.5 bhp पॉवर आणि 22.5 Nm टॉर्क मिळतो. हे व्हर्जन 85% इथेनॉल मिश्रण असलेले E85 इंधन वापरू शकते. त्यामुळे स्पोर्टी डिझाइनसोबत वेगळ्या इंधनाचा ऑप्शनही मिळतो.