Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola: पर्यावरणपूरक खरेदीसाठी ‘वेटिंग’; अकोल्यात १० महिन्यांत २७९७ ई-वाहने रस्त्यावर, विक्रीत दुप्पट वाढ!

शहरातील जवळपास प्रत्येक वाहन विक्री केंद्रावर जीएसटी कपातीची माहिती दिली जात होती. याचा सकारात्मक परिणाम वाहन विक्रीवरही झालेला दिसतो. गत १० महिन्यात ई-वाहनांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 01, 2025 | 03:44 PM
पर्यावरणपूरक खरेदीसाठी 'वेटिंग'; अकोल्यात १० महिन्यांत २७९७ ई-वाहने रस्त्यावर (Photo Credit - AI)

पर्यावरणपूरक खरेदीसाठी 'वेटिंग'; अकोल्यात १० महिन्यांत २७९७ ई-वाहने रस्त्यावर (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘ई-वाहनां’साठी वेटिंग!
  • पर्यावरणास पूरक खरेदीमुळे विक्री दुप्पट
  • १० महिन्यांत २७९७ ई-वाहने रस्त्यावर
अकोला: इंधनाची सातत्याने होणारी दरवाढ आणि वाहनांच्या वाढत्या किमतीमुळे गत काही वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत २७९७ ई वाहनांची नोंद करण्यात आली आहे. दिवाळी निमित्ताने दरवर्षी वाहन खरेदी होत असते. यावर्षी केंद्र सरकाराने दुचाकी आणि चारचाकी वाहन प्रकारामधील कमी क्षमतेच्या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर कपात करण्याचा निर्णय घेतला होता.

शहरातील जवळपास प्रत्येक वाहन विक्री केंद्रावर जीएसटी कपातीची माहिती दिली जात होती. याचा सकारात्मक परिणाम वाहन विक्रीवरही झालेला दिसतो. गत १० महिन्यात ई-वाहनांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. शहरातील रस्त्यांवर इलेक्ट्रक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी नागरिकांनी इलेट्रिक दुचाकींना अधिक पसंती दिली आहे.

मागील वर्षी २०२३ मध्ये इलेट्रिक दुचाकी वाहनांच्या विक्रीत सुमारे ५ टक्क्यांनी वाढ झाली होती, जी २०२४ मध्ये दुप्पट झाली होती. यावर्षी सुध्दा इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत वाढ झालेली पाहायला मिळाली. प्रदूषणाची चिंता आणि दररोज वाढणाऱ्या इंधन दरांमुळे इलेक्ट्रक वाहनांची मागणी दरवर्षी वाढत आहे.

Akola News: उरळ पोलिसांचा ‘दणका’! एकाच दिवशी पाच दारू विक्रेत्यांवर धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सध्या शहरात इलेक्ट्रक वाहनांची संख्या एक लाखापर्यंत पोहोचली आहे. हे वाहन पर्यावरणपूरक असून ध्वनी प्रदूषणही करीत नाहीत. त्यामुळे त्यांना पर्यावरणासाठी अनुकूल मानणे चुकीचे ठरणार नाही. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट कोलमडत आहे. पर्यावरणपूरक वाहन असल्याने सवलती: पर्यावरणपूरक वाहनांवर सरकारकडून विविध सवलती दिल्या जात आहेत. वीज तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असल्यामुळे इंधनाची बचत होते. भारत सरकारकडून प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. सबसिडी, माफक व्याजदरावर कर्ज आणि घराच्या गॅरेजमध्ये चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी अनुदान यांचा समावेश आहे.

देखभालीचा खर्च कमी

इलेक्ट्रक वाहनांचे इंजिन पारंपरिक वाहनांच्या इंजिनच्या तुलनेत सोपे असते, त्यामुळे देखभालीचा खर्च कमी येतो. भविष्यात किंमती कमी होण्याची शक्यता लक्षात घेता इलेट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. मात्र काही अडचणी अजूनही आहेत. चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि तुलनात्मकदृष्ट्या अधिक किंमती या प्रमुख अडचणी आहेत. मात्र सरकार आणि खाजगी कंपन्या चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच तंत्रज्ञानाच्या सुधारणेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवर नागरिकांचा जोर

सध्या बाजारात ५० हजार रुपयांपासून इलेट्रिक दुचाकी वाहनांच्या किंमती सुरू होतात. इलेक्ट्रिक वाहनांची गुणवत्ता आणि बॅटरीच्या क्षमतेनुसार ४ लाख रुपयांपर्यंतच्या इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांवर नागरीकांचा जोर पाहावयास मिळत आहे. आता शहरात हळुहळु इलेक्ट्रीक गाड्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. काही प्रमुख कंपन्यांच्या गाड्यांना अधिक मागणी आहे. सध्याच्या स्थितीत खरेदीसाठी वेटिंगही पाहायला मिळत आहे.

फसू नका! Second Hand EV खरेदी करताना ‘या’ 5 गोष्टींकडे लक्ष द्या

Web Title: 2797 e vehicles on the road in akola in 10 months sales double

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Akola
  • Electrical Vehical

संबंधित बातम्या

Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव
1

Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.