Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये भाग घेणार 34 वाहन उत्पादक कंपन्या, वाचा पूर्ण लिस्ट

नवीन तंत्रज्ञान वैशिष्ट्यांसह नवीन कारचे प्रदर्शन करण्यासाठी भारतात दर दोन वर्षांनी ऑटो एक्स्पो आयोजित केले जाते. चला जाणून घेऊया या खास कार्यक्रमात नेमके कोणती वाहनं भाग घेणार आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 15, 2024 | 08:17 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दिवसेंदिवस ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक उत्तम आणि अत्याधुनिक वाहनं लाँच होताना दिसत आहे. ऑटो कंपनीज ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार कार्स डिझाइन करत आहे. काही वेळेस आपल्या दमदार कार्स मार्केटमध्ये लाँच करण्यापूर्वी कंपनी त्या एका कार्यक्रमात त्याची झलक दाखवत असतात.

आपल्या देशात एक असा देखील कार्यक्रम होतो, ज्यात स्वदेशी आणि विदेशी कंपनीज भाग घेऊन आपल्या आगामी वाहनांचे प्रदर्शन करत असतात. या कार्यक्रमाचे नाव म्हणजे Bharat Mobility Global Expo 2025. चला जाणून घेऊया, जानेवारी 2025 मध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये कोणत्या कंपन्या सहभागी होतील.

वर्षाअखेरीस EV खरेदी करणे झाले स्वस्त, ‘या’ कंपनीज देत आहे आतापर्यंतचे बेस्ट डिस्काउंट

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये 34 कंपन्या सहभागी

आगामी ऑटो एक्स्पोमध्ये 34 वाहन निर्माते सहभागी होणार आहेत, ही 1986 मधील प्रीमियर इव्हेंटच्या पहिल्या कार्यक्रमानंतरची सर्वाधिक संख्या आहे. ACMA आणि CII च्या भागीदारीत सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) भारत मंडपम येथे 17-22 जानेवारी दरम्यान इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ऑटो एक्स्पो ‘द मोटर शो’ च्या 17 व्या आवृत्तीचे आयोजन होईल.

कोणकोणत्या कंपनीजचा असणार सहभाग

सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी पीटीआयला सांगितले की सुमारे 34 वाहन निर्माते या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत आणि अनेक पॉवरट्रेनशी संबंधित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करतील. या स्पर्धेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वाहन उत्पादकांमध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा किर्लोस्कर मोटर, ह्युंदाई मोटर इंडिया, किया मोटर इंडिया, जेएसडब्ल्यू एमजी मोटर आणि स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया यांचा समावेश आहे.

BMW, Mercedes, Porsche India आणि BYD सारख्या लक्झरी कार उत्पादक कंपन्या देखील या कार्यक्रमादरम्यान त्यांची उत्पादने प्रदर्शित करतील. दुचाकी विभागात TVS मोटर कंपनी, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया, सुझुकी मोटरसायकल आणि इंडिया यामाहा यांचा सहभाग दिसेल. त्याचप्रमाणे व्होल्वो आयशर कमर्शिअल व्हेइकल्स, अशोक लेलँड, जेबीएम आणि कमिन्स इंडिया देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

मेनन पुढे म्हणाले की, एथर एनर्जी, टीआय क्लीन मोबिलिटी, एका मोबिलिटी, ओला इलेक्ट्रिक आणि विनफास्ट सारख्या काही बेस्ट ईव्ही कंपन्या देखील ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होतील.

इथे होणार आयोजन

इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 पुढील वर्षी 17 ते 22 जानेवारी दरम्यान भारत मंडपम, यशोभूमी (इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्सपो सेंटर) द्वारका आणि इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट, ग्रेटर नोएडा येथे एकाच वेळी हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. मागील वर्षी 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

Web Title: 34 auto companies will be participating in bharat mobility global expo 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 05:05 PM

Topics:  

  • auto news

संबंधित बातम्या

चांगलाच फटका बसला! धो धो पावसाने 10 कोटींची Rolls-Royce खराब, युझरने Social Media वर व्यक्त केली नाराजी
1

चांगलाच फटका बसला! धो धो पावसाने 10 कोटींची Rolls-Royce खराब, युझरने Social Media वर व्यक्त केली नाराजी

Ola Electric Scooter: फक्त ९ दिवसांची संधी ! ४९,९९९ रुपयांमध्ये ओला स्कूटर आणि बाईक घरी आणा, काय आहे ऑफर?
2

Ola Electric Scooter: फक्त ९ दिवसांची संधी ! ४९,९९९ रुपयांमध्ये ओला स्कूटर आणि बाईक घरी आणा, काय आहे ऑफर?

GST 2.0 मुळे ग्राहकांचे अच्छे दिन आलेत! Jawa Yezdi Motorcycles झाल्या स्वस्त
3

GST 2.0 मुळे ग्राहकांचे अच्छे दिन आलेत! Jawa Yezdi Motorcycles झाल्या स्वस्त

GST कमी झाल्यानंतर ‘ही’ लोकप्रिय बाईक आरामात यईल तुमच्या बजेटमध्ये, किंमत 73 हजार रुपयांपासून सुरु
4

GST कमी झाल्यानंतर ‘ही’ लोकप्रिय बाईक आरामात यईल तुमच्या बजेटमध्ये, किंमत 73 हजार रुपयांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.