फोटो सौजन्य: istock
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सना मोठी मागणी मिळताना दिसत आहे. सततच्या इंधन वाढीमुळे अनेक ग्राहक सध्या इलेक्ट्रिक कार्सना प्राधान्य देत आहेत. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पदनावर लक्ष केंद्रित करत आहे. मार्केटमध्ये लाँच होणाऱ्या जास्तीतजास्त इलेक्ट्रिक कार्स या महागड्या आहेत, त्यामुळे कित्येक ग्राहक इलेक्ट्रिक कार घेण्यास कचरतात. पण आता डिसेंबर 2024 मध्ये इलेक्ट्रिक कार्सवर दमदार डिसोकॉउंटस मिळत आहे.
मार्केटमध्ये कंपनीकडून अनेक उत्तम फीचर्स असणाऱ्या उत्तम EVs विकल्या जातात. वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील उरलेल्या काही दिवसांत या कार्सवर लाखो रुपयांची बचत होऊ शकते. चला जाणून घेऊया, कोणती कंपनी आपल्या कार्सवर डिस्कॉउंट्स देत आहे.
नववर्षात लाँच होणार Mercedes ची ‘ही’ 5 सीटर कार, किंमत एकदा वाचाच
XUV 400 ही महिंद्राने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस कंपनीने दोन नवीन ईव्ही लाँच केल्यानंतर आता या एसयूव्हीच्या खरेदीवर लाखो रुपयांची सूट दिली जात आहे. माहितीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये XUV 400 खरेदी करून 3.10 लाख रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते.
टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत अनेक उत्कृष्ट इलेक्ट्रिक वाहने देखील ऑफर करते. माहितीनुसार, डिसेंबर 2024 च्या उरलेल्या दिवसांत जर कंपनीची ईव्ही खरेदी केली तर जास्तीत जास्त 3 लाख रुपयांची बचत होऊ शकते. ही ऑफर कंपनीने Tata Tigor EV च्या 2023 मॉडेल्सवर दिली आहे. याशिवाय 2024 Tata Tigor आणि Tiago वर 1.15 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या जात आहेत. कंपनी टाटा पंचवर 25 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफरही देत आहे. Tata Nexon EV च्या 2024 मॉडेल्सवर कोणतीही ऑफर दिली जात नसली तरी 2023 मध्ये तयार केलेल्या मॉडेल्सवर या महिन्यात 3 लाख रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते.
कोटींच्या किंमतीत विकल्या जाणाऱ्या Mercedes च्या ‘या’ कारमध्ये झाला बिघाड, परत मागवल्या कार्स
एमजी कॉमेट ईव्ही आणि झेडएस ईव्ही एमजीने कमी बजेटमध्ये ऑफर केल्या आहेत. डिसेंबरच्या महिन्यात या दोन्ही ईव्हीवर 2.25 लाख रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शोरूम्समध्ये MG Comet EV वर 75 हजार रुपयांची ऑफर दिली जात आहे, तर ZS EV वर 1.5 ते 2.25 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहेत.
तुम्ही या महिन्यात Mahindra, MG आणि TATA ची कोणतीही EV खरेदी करणार असाल, तर विविध शोरूम, शहरे आणि व्हेरियंटच्या उपलब्धतेनुसार सूट ऑफर बदलू शकते. अशा परिस्थितीत प्रथम शोरूममधून संपूर्ण माहिती मिळवणे गरजेचे.