
5 Affordable Hatchback Cars: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
किंमत – 3.70 लाख ते 5.45 लाख
अल्टो म्हणजे भारताची सगळ्यात जास्त विकली जाणारी गाडी असून यामध्ये फक्त 2 एअरबॅग मिळत होत्या. पण 2025 मध्ये मारुतीने मोठा बदल केला आणि आता बेस मॉडेलपासूनच 6 एअरबॅग स्टॅण्डर्ड दिल्या आहेत. कमी खर्चात फॅमिलीसाठी सुरक्षित गाडी हवी असेल तर अल्टोला पर्याय नाही. जुन्या मॉडेलला GNCAP मध्ये 2 स्टार मिळाले होते, पण आता 6 एअरबॅगमुळे सेफ्टी वाढली आहे.
किंमत – 4.70 लाख ते 6.75 लाख
सेलेरिओ पण अल्टो सारखीच गोष्ट आहे. 2021 ला लॉन्च झाली तेव्हा 2 एअरबॅग होत्या. परंतू आता 2025 च्या नवीन अपडेटमध्ये सगळ्या व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग मिळत आहेत. याचा थेट फायदा क्रॅश टेस्टमध्ये दिसला आहे. आधी 2 एअरबॅग असताना फक्त 1 स्टार मिळायचा, आता 6 एअरबॅग आल्यावर 3 स्टार रेटिंग मिळालं आहे. म्हणजे पैशाच्या मानाने सेफ्टी डबल झाली.
किंमत – 4.77 लाख ते 8.62 लाख
टाटा म्हटलं की सेफ्टीचा काय विषय उरत नाही. टियागो ही टाटाची सगळ्यात छोटी गाडी असली तरी सेफ्टीमध्ये ती मोठ्या गाड्यांना टक्कर देते. कंपनीने या गाडीत पण 6 एअरबॅग स्टॅण्डर्ड केल्या आहेत. टाटाने तर बॉडी पण जास्त मजबूत केली. जुन्या मॉडेलला 2020 मध्ये 4 स्टार मिळाले होते. नवीन मॉडेलची अजून टेस्ट झाली नाही पण त्याला अजून चांगले स्टार मिळतील असं कंपनी सांगते. मजबूत गाडी हवी असेल तर टियागो डोळे झाकून घेऊ शकता.
किंमत – 4.99 लाख ते 7.24 लाख
वॅगनआर म्हणजे उंची आणि स्पेससाठी प्रसिद्ध फॅमिली कार म्हणून तिला खूप पसंती आहे. आता 2025 पासून वॅगनआरमध्ये पण 6 एअरबॅग स्टॅण्डर्ड येऊ लागल्या आहेत. 2023 मध्ये 2 एअरबॅग असलेल्या मॉडेलला फक्त 1 स्टार मिळाला होता, पण आता 6 एअरबॅगमुळे ती जास्त सुरक्षित झाली आहे. रोजच्या वापरासाठी आणि लांबच्या प्रवासासाठी हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.
किंमत – 5.60 लाख ते 8.09 लाख
ह्युंदाईची ही गाडी 2019 ला आली तेव्हा 2 एअरबॅग होत्या. नंतर टॉप मॉडेलमध्ये 6 केल्या. पण 2023 च्या अपडेटनंतर आता सगळ्या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग मिळतात. या गाडीमध्ये सेफ्टी बरोबरच भरपूर फीचर्स पण मिळतात. स्टायलिश लूक आणि सुरक्षितता दोन्ही हवं असेल तर निओस एक चांगला ऑप्शन आहे. 2020 मध्ये या गाडीला 2 स्टार मिळाले होते.